मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
उदक

तृतीयपरिच्छेद - उदक

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां उदक सांगतो -

अथजलम् ‍ याज्ञवल्क्यः शुचिगोतृप्तिकृत्तोयंप्रकृतिस्थंमहीगतं वर्ज्यंजलमुक्तंहेमाद्रौब्रह्मांडे दुर्गंधिफेनिलंक्षारंपंकिलंपल्वलोदकम् ‍ नभवेद्यत्रगोतृप्तिर्नक्तंयच्चाप्युपाह्रतम् ‍ यन्नसर्वार्थमुत्सृष्टंयच्चाभोज्यनिपानजम् ‍ तद्वर्ज्यंसलिलंतातसदैवश्राद्धकर्मणि निपानोजलाशयः शुद्धितत्त्वेशंखः स्नानमाचमनंदानंदेवता पितृतर्पणं शूद्रोदकैर्नकुर्वीततथामेघाद्विनिः सृतैः हेमाद्रावादित्यपुराणे चिरंपर्युषितंवापिशूद्रस्पृष्टमथापिवा जाह्नव्याः स्नानदानादौपुनात्येवसदापयः कात्यायनः अपोनिशिनगृह्णीयान्नपिबेच्चकदाचन उद्धृत्याग्निमुपर्यग्नेर्धाम्नोधाम्न इतीरयेत् ‍ रजोदोषेतुप्रागुक्तं नारदीये त्यजेत्पर्युषितंपुष्पंत्यजेत्पर्युषितंजलम् ‍ नत्यजेज्जाह्नवीतोयंतुलसीबिल्वपद्मकम् ‍ ।

याज्ञवल्क्य - " जेथें गाईंची तृप्ति होत असते त्या ठिकाणचें भूमिगत न बिघडलेलें उदक शुद्ध आहे . " वर्ज्य उदक सांगतो हेमाद्रींत ब्रह्मांडपुराणांत - " दुर्गंधयुक्त , फेंसयुक्त , खारट , गढूळ , अल्पसरोवरांतील , जेथें गाईंची तृप्ति होत नाहीं तें व रात्रीं आणलेलें उदक वर्ज्य ज्या उदकाचा सर्वांकरितां उत्सर्ग केलेला नाहीं तें आणि अभोज्य जे शूद्रादिक त्यांच्या जलाशयांतील असलेलें उदक श्राद्धकर्माचे ठायीं सदा वर्ज्य करावें . " शुद्धितत्त्वांत शंख - " स्नान , आचमन , दान , देव , आणि पितर यांचें तर्पण हीं कृत्यें शूद्रोदकांनीं करुं नयेत . तशींच पावसाच्या पाण्यानें करुं नयेत . " हेमाद्रींत आदित्यपुराणांत - " भागीरथीचें उदक बहुत दिवस राहिलेलें असलें तरी अथवा शूद्रस्पष्ट झालें तरी स्नानदानादिकर्माविषयीं सदा पवित्रच करणारें आहे . " कात्यायन - " उदक रात्रीं आणूं नये . व रात्रीं कधींही पिऊं नये . प्यालावांचून गति नसेल तर अग्नीचा उद्धार ( प्रज्वलन ) करुन त्याजवर उदक ठेऊन ‘ धाम्नो धाम्नो० ’ हा मंत्र म्हणून नंतर प्यावें . " उदकाला रजोदोष असेल तर पूर्वीं ( द्वितीयपरिच्छेदांत ) सांगितला आहे . नारदीयांत - " पर्युषित पुष्प टाकावें व पर्युषित उदक टाकावें . परंतु भागीरथीचें उदक , तुलसीपत्र , बिल्वपत्र , आणि कमल हीं पर्युषित टाकूं नयेत . "

अन्यान्यपिपृथ्वीचंद्रोदयेमात्स्ये मध्याह्नः खड्गपात्रंचतथानेपालकंबलः रौप्यंदर्भास्तिलागावोदौहित्रश्चाष्टमः स्मृतः पापंकुत्सितमित्याहुस्तस्यसंतापकारिणः अष्टावेतेयतस्तस्मात्कुतपाइतिविश्रुताः ब्राह्मे यतिस्त्रिदंडः करुणाराजतंपात्रमेवच दौहित्रंकुतपः कालश्छागः कृष्णाजिनंतथा शस्तानीतिशेषः दौहित्रंखड्गपात्रमितिकल्पतरुः अपरार्केस्मृत्यंतरे अपत्यंदुहितुश्चैवखड्गपात्रंतथैवच घृतंचकपिलायागोर्दौहित्रमितिकीर्तितम् ‍ ब्रह्मांडे अमावास्यागतेसोमेयातुखादतिगौस्तृणम् ‍ तस्यागोर्यद्भवेक्षीरंतद्दौहित्रमुदाह्रतम् ‍ स्मृतिसंग्रहे उच्छिष्टंशिवनिर्माल्यंवांतंचमृतकर्पटम् ‍ श्राद्धेसप्तपवित्राणिदौहित्रः कुतपस्तिलाः उच्छिष्टंवत्सस्यदुग्धमित्यर्थः शिवनिर्माल्यंगंगोदकं वांतंमधु मृतकर्पटंतसरीपट्टम् ‍ तिलेष्वापस्तंबः अटव्यांयेसमुत्पन्नाअकृष्टफलितास्तथा तेवैश्राद्धेपवित्राः स्युस्तिलास्तेनतिलास्तिलाः अभावेग्राम्याः गौराः कृष्णास्तथारण्यास्तथैव त्रिविधास्तिलाइतिब्राह्मोक्तेः ।

इतरही सांगतो पृथ्वीचंद्रोदयांत मात्स्यांत - " मध्याह्न , खड्गपात्र , नेपालकंबल ( शाल ), रौप्य , दर्भ , तिल , गाई , आठवा दुहितापुत्र , हे आठ कुतप आहेत ; कारण , पापाला ‘ कु ’ म्हणजे कुत्सित म्हणतात . त्याला ताप ( नाश ) करणारे हे आठ पदार्थ आहेत म्हणून हे कुतप म्हटले आहेत . " ब्राह्मांत - " त्रिदंडसंन्यासी , दया , रुप्याचें पात्र , दौहित्र , कुतपकाल ( आठवा मुहूर्त ), बोकड , आणि कृष्णाजिन हीं प्रशस्त आहेत . " दौहित्र म्हणजे खड्गपात्र असें कल्पतरु सांगतो . अपरार्कांत स्मृत्यंतरांत - " कन्येचें अपत्य , खड्गपात्र , कपिलागाईचें घृत , यांना दौहित्र म्हटलें आहे . " ब्रह्मांडपुराणांत - " अमावास्येच्या दिवशीं सोम तृणांत गेला असतां जी गाय तृण भक्षण करिते त्या गाइचें जें दूध तें दौहित्र म्हटलें आहे . " स्मृतिसंग्रहांत - " उच्छिष्ट ( वत्सोच्छिष्टदुग्ध ), शिवनिर्माल्य ( गंगोदक ), वांत ( मध ), मृतकर्पट ( तसरीपट्ट ), दौहित्र , कुतप आणि तिल हे सात पदार्थ श्राद्धाविषयीं पवित्र होत . " तिलांविषयीं आपस्तंब - " नांगरल्यावांचून अरण्यांत जे उत्पन्न झालेले ते तिल श्राद्धांत पवित्र आहेत . इतर तिल ते तिल नव्हत . " त्यांच्या अभावीं ग्राम्य घ्यावेत ; कारण , " गौर , कृष्ण आणि आरण्य ( अरण्यांत उत्पन्न ) असे तीळ तीन प्रकारचे . " असें ब्राह्मवचन आहे .

आतां वर्ज्य सांगतो -

अथवर्ज्यानि चंद्रिकायांयमः कक्कुटोविड्वराहश्चकाकश्चाथबिडालकः वृषलीपतिश्चवृषलः षंढोवीरारजस्वला एतेतुश्राद्धकालेवैवर्जनीयाः प्रयत्नतः खंजः काणः कुणिः श्वित्रीदातुः प्रेष्यकरस्तथा न्यूनांगोप्यतिरिक्तांगस्तमप्यपनयेत्ततः वायवीये अन्नंपश्येयुरेतेतुयदिवैहव्यकव्ययोः उत्सृष्टव्यंप्रधानार्थंसंस्कारस्त्वापदिस्मृतः सुमंतुः चांडालादिवीक्षितमन्नमभोज्यमन्यत्रमृद्भस्महिरण्योदकस्पर्शात् ‍ तत्रैवजमदग्निः शुद्धवत्योथकूष्मांड्यः पावमान्यस्तरत्समाः पूतेनवारिणादर्भैरन्नदोषमपानुदेत् ‍ चंद्रोदये पादुकोपानहौछत्रंचित्ररक्तांबरंतथा रक्तपुष्पंचमार्जारंश्राद्धभूमौविवर्जयेत् ‍ निर्णयदीपे घंटानिनादोहयसंनिधानंशंबूकशंखंकदलीदलंच उन्मत्तजात्यर्कहयारिजानिश्राद्धस्यवैगुण्यकराण्यमूनि हयारिजंमहिषीक्षीरादि ।

चंद्रिकेंत यम - " कोंबडा , गांवडुकर , कावळा , मार्जार , शूद्रिणीचा पति , शूद्र , नपुंसक , पतिपुत्ररहित स्त्री , रजस्वला , हे श्राद्धकालीं प्रयत्नानें वर्ज्य करावे . लुला , काणा , हात गेलेला , पांढर्‍या कोडाचा , चाकर , अंगविकल , अधिक अवयवाचा , यांना श्राद्धस्थानापासून दूर करावे . " वायवीयांत - " हे पूर्वोक्त वृषलादिक जर देवपितरांचें अन्न पाहातील तर तें अन्न टाकावें . आपत्कालीं ( न पाहाण्यासारखें स्थल नसेल तर ) प्रधान अन्नाची शुद्धि करावी . " सुमंतु - " चांडालादिकांनीं पाहिलेलें अन्न अभोज्य आहे . त्याजवर मृतिका , भस्म , सुवर्ण व उदक हीं टाकून शुद्ध केल्यावर तें भोज्य होतें . " तेथेंच जमदग्नि - " शुद्धवती , कूष्मांडी आणि पवमानांतील तरत्समंदी ह्या ऋचांनीं अभिमंत्रित उदक दर्भांनीं शिंपडून अन्नाचा दोष घालवावा . " चंद्रोदयांत - " पादुका , उपानह ( जोडा ), छत्री , चित्र व रक्तवस्त्र , रक्तपुष्प आणि मार्जार हीं श्राद्धभूमीवर वर्ज्य करावीं . " निर्णयदीपांत - " घंटेचा नाद , घोड्याचें सांनिध्य , शिंपला , शंख , केळीचें पान , धोतरा , जाई , रुई यांचीं फुलें हयारिज ( महिषीक्षीरादि ) हीं श्राद्धाला वैगुण्य उत्पन्न करणारीं आहेत . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP