मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
विभक्ताविभक्तांचा निर्णय

तृतीय परिच्छेद - विभक्ताविभक्तांचा निर्णय

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां विभक्ताविभक्तांचा निर्णय सांगतो -

अथविभक्ताविभक्तनिर्णयः पृथ्वीचंद्रोदयेमरीचिः बहवः स्युर्यदापुत्राः पितुरेकत्रवासिनः सर्वेषांतुमतंकृत्वाज्येष्ठेनैवतुयत्कृतं द्रव्येणचाविभक्तेनसर्वैरेवकृतंभवेत् ज्येष्ठस्यकर्तृत्वेपिसर्वेफलभागिनइत्यर्थः तेनयेब्रह्मचर्यादिनियमास्तेफलिसंस्कारत्वात्सर्वैः कार्याः एवंसंसृष्टिनामपि तुल्यवात् मिताक्षरायांनारदः भ्रातृणामविभक्तानामेकोधर्मः प्रवर्तते विभागेसतिधर्मोपिभवेत्तेषांपृथक्पृथक् बृहस्पतिरपि एकपाकेनवसतांपितृदेवद्विजार्चनं एकंभवेद्विभक्तानांतदेवस्याद्गृहेगृहे अत्रयद्यप्यविशेषश्रवणात् ब्रह्मयज्ञसंध्यादिष्वप्यविभक्तानांपृथडनिषेधः प्राप्नोतितथापिद्रव्यसाध्यश्राद्धवैश्वदेवादिष्वेवसः द्रव्यस्यानेकस्वामिकत्वेनैकस्यव्ययेनधिकारात् यानितुद्रव्यासाध्यनिमंत्रजपोपवाससंध्याब्रह्मयज्ञपारायणादीनिनित्यनैमित्तिककाम्यानितेषुपृथगेवाधिकारः द्रव्यव्ययाभावेनुमत्यनपेक्षणात् द्रव्येणचाविभक्तेनेत्यस्याविषयत्वात् पृथगप्येकपाकानांब्रह्मयज्ञोद्विजातिनां अग्निहोत्रंसुरार्चाचसंध्यानित्यंभवेत्तथेतिप्रयोगपारिजातेआश्वलायनस्मृतेश्च अग्निहोत्रशब्दोग्निसाध्यश्रौतस्मार्तनित्यकर्मपरः तेष्वप्यन्यानुमत्यैवाधिकारेणन्यायसाम्यात् पितृश्राद्धादिषुतुल्यफलेषुनित्येष्वनुमतिंविनाप्येकस्याधिकारः एकोपिस्थावरेकुर्याद्दानाध्ययनविक्रयं आपत्कालेकुटुंबार्थेधर्मार्थेचविशेषतइतिवचनात् धर्मार्थेवश्यकर्तव्येपितृश्राद्धादाविति विज्ञानेश्वरः केचित्त्वविभक्तानामपिपृथक् पाकत्वेदेशांतरेचदार्शिकाब्दिकयोः पृथक्त्वमाहुः भ्रातृणामविभक्तानांपृथक् पाकोभवेद्यदि वैश्वदेवादिकंश्राद्धंकुयुस्तेवैपृथक् पृथक् इतिहारीतोक्तेः अविभक्तेनपुत्रेणपितृमेधोमृताहनि देशांतरेपृथक्कार्योदर्शश्राद्धंतथैवचेतियमोक्तेश्चेति तत्रमूलंचित्यं तदयमर्थः पंचमहायज्ञमध्येदेवभूतपितृमनुष्ययज्ञानन्यानुमत्याज्येष्ठएवकुर्यात् होमाग्रदानरहितंनभोक्तव्यंकदाचन अविभक्तेषुसंसृष्टेष्वेकेनापिकृतंकृतमितिव्यासोक्तेश्च यस्यतुज्येष्ठेनाकृतेवैश्वदेवेन्नंसिध्येत्तेनतूष्णीमग्नौकिंचित्क्षिप्त्वाभोक्तव्यं यस्यत्वेषामग्रतोन्नंसिध्येत्सनियुक्तमग्नौकृत्वाग्रेब्राह्मणायदत्वाभुंजीतेत्यविभक्ताधिकारेपृथ्वीचंद्रोदयेगोभिलोक्तेः ।

पृथ्वीचंद्रोदयांत मरीचि - " जेव्हां पित्याचे बहुत पुत्र एके ठिकाणीं ( अविभक्त ) असतील तेव्हां सर्वांच्या मतानें सामायिक द्रव्य खर्च करुन ज्येष्ठानेंच केलेलें श्राद्धादि कर्म सर्वांनीं केल्यासारखें होतें , म्हणजे ज्येष्ठ कर्ता असला तरी त्या कर्माचें फल ( पुण्य वगैरे ) सर्वांना प्राप्त होतें . " यावरुन ब्रह्मचर्य इत्यादिक नियम हे ज्यांना फल प्राप्त व्हावयाचें त्यांचे संस्कार असल्यामुळें ते सर्वांनीं करावे , असें होतें . पूर्वीं विभक्त असून नंतर एकत्र झाले असतील त्यांनाही असेंच समजावें . कारण ते अविभक्तासारखेच आहेत . मिताक्षरेंत नारद - " अविभक्त अशा भ्रात्यांचा एक धर्म प्रवृत्त होतो . द्रव्याचा विभाग झाला असतां धर्म देखील वेगवेगळा होतो . " बृहस्पतीही - " एके ठिकाणीं पाक करुन जेवण करणारे अशा बंधूंचें श्राद्धकर्म , देवपूजा , ब्राह्मणभोजन हें सारें एक होतें . विभक्त असतील त्यांचें आपापल्या घरीं वेगवेगळें होतें . या वचनांत पितृकर्म , देवपूजा इत्यादि कर्म अविभक्तांचें एक होतें , वेगळें नाहीं , असें सामान्यतः सांगितल्यावरुन जरी ब्रह्मयज्ञ , संध्या इत्यादि देखील वेगळीं करुं नयेत , असा निषेध प्राप्त झाला तरी द्रव्याच्या खर्चानें होणारीं अशीं श्राद्ध वैश्वदेव इत्यादि कर्मै त्यांनाच तो ( वेगवेगळें करुं नये हा ) निषेध समजावा . कारण , द्रव्य अनेकांचें असल्यामुळें तें खर्च करण्याविषयीं एकाला अधिकार नाहीं . जीं कर्मै करण्याविषयीं द्रव्याची जरुर नाहीं अशीं - मंत्राचा जप , उपवास , संध्या ब्रह्मयज्ञ , वेदपारायण इत्यादिक नित्य - नैमित्तिक - काम्य कर्मै त्यांच्याविषयीं प्रत्येकाला वेगवेगळा अधिकार आहे . कारण द्रव्याचा खर्च नसला म्हणजे इतरांच्या अनुमोदनाची अपेक्षा नसल्यामुळें ‘ द्रव्येण चविभक्तेन . ’ ( सामायिक द्रव्य खर्च करुन ) हें वरील मरीचिवचन एथें प्राप्त होत नाहीं . आणि " एकपाकानें भोजन करुन राहाणार्‍या द्विजांचे ब्रह्मयज्ञ , अग्निहोत्र , देवपूजा आणि संध्या हीं नित्य वेगवेगळीं होतात " असें प्रयोगपारिजातांत आश्वलायनस्मृतिवचनही आहे . या वचनांतील ‘ अग्निहोत्र ’ या शब्दानें अग्नीनें साध्य होणारीं अशी श्रौत व स्मार्त नित्य कर्मै समजावीं . कारण , जसा अग्निहोत्राविषयीं इतरांच्या अनुमोदनानें अधिकार प्राप्त होतो , तसा इतर अग्निसाध्यकर्माविषयीं देखील इतरांच्या अनुमोदनानें अधिकार असल्यामुळें अग्निहोत्र व इतर अग्निसाध्य कर्मै यांविषयीं न्याय समान आहे . आतां सर्वांना समान फल देणारीं अशीं जीं पिता इत्यादिकांचीं श्राद्धादिक नित्यकर्मै त्यांविषयीं इतरांच्या अनुमतीवांचून देखील एकाला अधिकार प्राप्त होतो . कारण , " आपत्कालीं कुटुंबपोषणासाठीं आणि धर्मासाठीं एका बंधूनें देखील स्थावरपदार्थाचें दान आणि विक्रय विशेषेंकरुन करावा " असें वचन आहे . ‘ धर्मार्थ ’ याचा अर्थ - अवश्य कर्तव्य पितृश्राद्धादिकांविषयीं , असा विज्ञानेश्वर सांगतो . केचित् ग्रंथकार तर - भ्राते अविभक्त असूनही स्वदेशीं त्यांचा पाक वेगवेगळा होत असतां आणि ते देशांतरीं असतां दर्श आणि वार्षिक वेगवेगळें होतें , असें सांगतात . कारण , " अविभक्त अशा भ्रात्यांचा पाक वेगवेगळा होत असेल तर त्यांनीं वैश्वदेवादिकर्म आणि श्राद्ध वेगवेगळें करावें " असें हारीतवचन आहे . आणि " अविभक्त अशा पुत्रानें देशांतरीं बापाच्या मृतदिवशीं सांवत्सरिक पृथक् करावें , दर्शश्राद्धही तसेंच करावें . " असें यमवचनही आहे . ह्या वचनाविषयीं मूल चिंत्य ( अनुपलब्ध ) आहे . वरील सर्व वचनांचा भावार्थ असा - पंचमहायज्ञामध्यें देवयज्ञ , भूतयज्ञ , पितृयज्ञ , आणि मनुष्ययज्ञ हे चार यज्ञ इतरांच्या अनुमतीनें ज्येष्ठानेंच करावे . कारण , याविषयीं वर आरंभीं मरीचिवचन आहे . आणि " होम , आणि अग्रदान ( अन्नांतील वरील अन्नाचें दान ) केल्यावांचून कधींही भोजन करुं नये . भ्राते अविभक्त असतां अथवा विभक्त होऊन नंतर एकत्र झाले असतां तें एकानें जरी केलें तरी सर्वांनीं केलें असें होतें " असें व्यासवचनही आहे . ज्येष्ठ भ्रात्यानें वैश्वदेव केला नसतां ज्याचें अन्न सिद्ध होईल त्यानें मंत्रावांचून अग्नींत थोडें टाकून भोजन करावें . कारण , " ह्या बंधूंमध्यें ज्याचें अन्न वैश्वदेवाच्या पूर्वीं सिद्ध होईल त्यानें नियमानें अग्नींत टाकून अग्र ( पहिलें थोडें अन्न ) ब्राह्मणाला देऊन नंतर भोजन करावें " असें अविभक्ताधिकारीं पृथ्वीचंद्रोदयांत गोभिलवचन आहे . न्

आश्वलायनस्तुपाकपार्थक्येपृथक् त्वंतदेकत्वेऽपृथक् त्वमाह वसतामेकपाकेनविभक्तानामपिप्रभुः एकस्तुचतुरोयज्ञान्कुर्याद्वाग्यज्ञपूर्वकान् अविभक्ताविभक्तावापृथक्पाकाद्विजातयः कुर्युः पृथक्पृथग्यज्ञान्भोजनात्प्राग्दिनेदिनइति ब्रह्मयज्ञसंध्यास्नानतर्पणादितूक्तहेतोः पृथगेव देवपूजातूक्तवचनद्वयादेकत्रपृथग्वा दर्शग्रहणश्राद्धादित्वेकस्यैव तीर्थश्राद्धाद्यपियुगपत्सर्वेषामविभक्तानांप्राप्तावेकस्यभेदेनप्राप्तौभिन्नं गयाश्राद्धेप्येवं एष्टव्याबहवः पुत्राः शीलवंतोगुणान्विताः तेषांतुसमवेतानांयद्येकोपिगयांव्रजेत् तारिताः स्मोवयंतेनसयातिपरमांगतिमितिहेमाद्रौकौर्मोक्तेः काम्येपिदानहोमादावन्यानुमत्यैवाधिकारः द्रव्यासाध्यजपादौतांविनापि अपरार्केपैठीनसिः विभक्तैस्तुपृथक्कार्यंप्रतिसंवत्सरादिकं एकेनैवाविभक्तेषुकृतेसर्वैस्तुतत्कृतम् सांवत्सरात्पूर्वाणिमासिकान्येकत्रैव तदाहलघुहारीतः सपिंडीकरणांतानियानिश्राद्धानिषोडश पृथडनैवसुताः कुर्युः पृथग्द्रव्याअपिक्कचित् सपिंडनंमासिकोपलक्षणं अर्वाक्संवत्सराज्ज्येष्ठः श्राद्धंकुर्यात्समेत्यतु ऊर्ध्वंसपिंडीकरणात्सर्वेकुर्युः पृथक्पृथगितिव्यासोक्तेः उशनाः नवश्राद्धंसपिंडत्वंश्राद्धान्यपिचषोडश एकेनैवतुकार्याणिसंविभक्तधनेष्वपि मघात्रयोदशीश्राद्धंत्वविभक्तानामपिपृथगित्युक्तंप्राक् यत्तुवृद्धवसिष्ठः मासिकंचवृषोत्सर्गंसपिंडीकरणंतथा ज्येष्ठेनैवप्रकर्तव्यमाब्दिकंप्रथमंतथेति तन्निर्मूलं बह्वृचपरिशिष्टेनवश्राद्धंसहदद्युः ।

आश्वलायन - तर पाक वेगळा असेल तर वैश्वदेवादिक वेगळें करावें . एक असेल तर एक करावें , असें सांगतो - " विभक्त असून देखील एकत्र पाक करुन राहणार्‍या बंधूंचे ब्रह्मयज्ञ आहे पूर्वीं ज्यांच्या असे देवयज्ञादिक चार यज्ञ एकानें करावे . भ्राते विभक्त असोत किंवा अविभक्त असोत ते भोजनाचा पाक वेगळा करीत असतील तर त्यांनीं प्रतिदिवशीं भोजनाच्या पूर्वीं वेगवेगळे यज्ञ करावे . " ब्रह्मयज्ञ , संध्या , स्नान , तर्पण इत्यादि कर्म तर वर सांगितलेल्या हेतूस्तव ( द्रव्याचा खर्च नसल्याकारणास्तव ) वेगवेगळेंच करावें . देवपूजा वर सांगितलेल्या दोन प्रकारच्या ( बृहस्पतिवचनानें एकत्र , आश्वलायनवचनानें पृथक् ) वचनावरुन एकत्र किंवा पृथक् करावी . दर्श , ग्रहणांतील श्राद्ध इत्यादिक तर एकानेंच करावें . तीर्थश्राद्धादिकही सार्‍या अविभक्त भ्रात्यांना एकदम प्राप्त असतां एकालाच अधिकार . भिन्न भिन्न प्राप्त असतां भिन्न भिन्न करावें . गयाश्राद्धांतही असेंच समजावें . कारण , " पितर म्हणतात - सुशील गुणवंत असे बहुत पुत्र इच्छावे . त्यांमध्यें एकादा तरी गयेस जाईल आणि आह्मांला तारील व तो परम गतीस जाईल " असें हेमाद्रींत कौर्मवचन आहे . कामनिक अशा दान होम इत्यादिकांविषयीं देखील इतरांच्या संमतीनें अधिकार आहे . द्रव्याच्या खर्चावांचून होणार्‍या जपादिकांविषयीं इतरांच्या संमतीवांचूनही अधिकार आहे . अपरार्कांत पैठीनसि - विभक्तांनीं प्रतिसांवत्सरादिक श्राद्ध वेगवेगळें करावें . अविभक्त असतां एकानेंच केलें म्हणजे सर्वांनीं तें केलें असें होतें . " संवत्सराच्या पूर्वींचीं मासिकें एकत्र करावीं . तेंच सांगतो लघुहारीत - " पुत्र विभक्त झालेले असले तरी त्यांनीं आईबापांनीं सपिंडीकरणापर्यंत होणारीं जीं षोडशश्राद्धें तीं कधींही वेगवेगळीं करुंच नयेत " या वचनांत सपिंडीकरण हें मासिकांचें बोधक आहे . कारण , " संवत्सराच्या आंत पडलेलें श्राद्ध ( मासिक ) सारे भ्राते एकत्र मिळून ज्येष्ठानें करावें . सपिंडीकरणानंतर ( वर्षानंतर ) सर्वांनीं वेगवेगळें करावें " असें व्यासवचन आहे . उशना - " बंधु विभक्त झाले असतांही नवश्राद्ध , सपिंडीकरण , आणि षोडशमासिकें हीं एकानेंच करावीं . " मघात्रयोदशीश्राद्ध तर अविभक्तांनीं देखील वेगवेगळें करावें , असें पूर्वीं ( द्वितीयपरिच्छेदांत ) सांगितलें आहे . आतां जें वृद्धवसिष्ठ - " मासिक , वृषोत्सर्ग , सपिंडीकरण , आणि प्रथमाब्दिक हीं ज्येष्ठानेंच करावीं असें सांगतो , तें निर्मूल आहे . बह्वृचपरिशिष्टांत - " नवश्राद्ध सर्वांनीं एकत्र मिळून द्यावें " असें आहे .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP