आतां यतिधर्म सांगतों -
अथयतिधर्माः प्रातरुत्थायब्रह्मणस्पतेइतिजपित्वादंडादीनिमृदंचनिधायमूत्रपुरीषयोर्गृहस्थचतुर्गुणं शौचंकृत्वाचम्यपर्वद्वादशीवर्ज्यंप्रणवेनदंतधावनंकृत्वा तेनैवमृदाबहिः कटिंप्रक्षाल्यजलतर्पणवर्ज्यंस्नात्वाजंघेप्रक्षाल्यवस्त्रादीनिगृहीत्वामार्जनांतंकृत्वाकेशवादिनमोंतनामभिस्तर्पयित्वाॐभूस्तर्पयामीत्यादिव्यस्तसमस्तव्याह्रतिभिर्महर्जनस्तर्पयामीतितर्पयेत् ॐभूः स्वाहेतिस्वाहाशब्दांतैः स्वधाशब्दांतैश्चैभिरेवपुनस्तर्पयेदितिकेचित् ततआचम्यांजलिनाप्रणवेनजलमादायव्याह्रतिभिरुद्धृत्यगायत्र्यात्रिः क्षिप्त्वागायत्रींजपेत् उदितेसूर्येप्रणवेन व्याह्रतिभिर्वार्घ्यंत्रिर्दत्वा मित्रस्यचर्षणीत्याद्यैः पूर्वोक्तसौरीभिरिदंविष्णुस्त्रिर्देवोब्रह्मजज्ञानमितिचोपस्थायसर्वभूतेभ्योनमइतिप्रदक्षिणमावर्तते ततोनत्वा आदित्यायविद्महेसहस्त्राक्षायधीमहि तन्नः सूर्यः प्रचोदयादितित्रिर्जपेत् एवंत्रिकालंविष्णुपूजांब्रह्मयज्ञंचकुर्यात् ।
संन्याशानें पहांटेस उठून ‘ ब्रह्मणस्पते० ’ याचा जप करुन दंडादिक पदार्थ आणि मृत्तिका ठेऊन मूत्रपुरीषांविषयीं गृहस्थाहून चतुर्गुणित शौच ( शुद्धि ) करुन आचमन करुन पर्वदिवस व द्वादशी वर्ज्य करुन इतर दिवशीं प्रणवानें दंतधावन करुन प्रणवानेंच माती लावून कमरेचा बाहेरचा भाग धुवून जलतर्पणरहित स्नान करुन जांघा धुवून नंतर वस्त्रादिक घेऊन मार्जनापर्यंत कृत्य करुन ‘ केशवाय नमः ’ अशा नमोंत नामांनीं तर्पण करुन ‘ ॐभूस्तर्पयामि ’ याप्रमाणें व्यस्त व समस्त व्याह्रतींनीं ‘ महर्जनस्तर्पयामि ’ येथपर्यंत तर्पण करावें. केचित् विद्वान् - ‘ ॐभूः स्वाहा, ॐभुवः स्वाहा ’ अशा स्वाहाशब्दांत व्याह्रतिमंत्रांनीं तर्पण करुन स्वधाशब्दांत त्याच मंत्रांनीं पुनः तर्पण करावें, असें सांगतात. तदनंतर आचमन करुन प्रणवानें अंजलीनें उदक घेऊन व्याह्रतिमंत्रांनीं वर करुन गायत्रीमंत्रानें त्रिवार टाकून गायत्रीचा जप करावा. सूर्योदय झाला असतां प्रणवानें किंवा व्याह्रतिमंत्रांनीं तीन वेळां अर्घ्य देऊन ‘ मित्रस्यचर्षणी० ’ इत्यादिक पूर्वीं सांगितलेल्या सूर्यदेवतामंत्रांनीं, व इदंविष्णु०, त्रिर्देवः०, ब्रह्मजज्ञानं०, या मंत्रांनीं उपस्थान करुन ‘ सर्वभूतेभ्योनमः ’ असें म्हणून प्रदक्षिण फिरावें. तदनंतर नमस्कार करुन ‘ आदित्याय विद्महे सहस्त्राक्षाय धीमहि । तन्नः सूर्यः प्रचोदयात् ’ याचा त्रिवार जप करावा. याप्रमाणें त्रिकाल विष्णुपूजा आणि ब्रह्मयज्ञ करावा.