आतां कितीएक कर्मांविषयीं आशौच नाहीं , तो प्रकार सांगतो -
अथकर्मतः त्रिंशच्छ्लोक्यां तत्तत्कार्येषुसत्रिव्रतिनृपनृपवद्दीक्षितर्त्विक्स्वदेशभ्रंशापत्स्वप्यनेकश्रुतिपठनभिषक्कारुशिल्प्यातुराणां संप्रारब्धेषुदानोपनयनयजनश्राद्धयुद्धप्रतिष्ठाचूडातीर्थार्थयात्राजपपरिणयनाद्युत्सवेष्वेतदर्थे नाशौचमितिशेषः सत्रीअन्नसत्रवान् मुख्यसत्रस्यदीक्षितपदात्सिद्धेः व्रतीअनंतव्रतादिनियमवान् नव्रतिनांव्रतेइतिविष्णूक्तेः प्रचेताः कारवः शिल्पिनो वैद्यादासीदासास्तथैवच राजानोराजभृत्याश्चसद्यः शौचाः प्रकीर्तिताः कारवः सूपकाराद्याः शिल्पिनश्चैलनिर्णेजकाद्याः आतुरस्यव्याधिनाशार्थेदानादौतुलादानादेः प्रारंभोनांदीश्राद्धंसंकल्पोवा यजनंतडागोत्सर्गकोटिहोमादिः लघुविष्णुः व्रतयज्ञविवाहेषु श्राद्धेहोमेर्चनेजपे आरब्धेसूतकंनस्यादनारब्धेतुसूतकं प्रारंभोवरणंयज्ञेसंकल्पोव्रतसत्रयोः नांदीश्राद्धंविवाहादौश्राद्धेपाकपरिक्रियेति पाकस्यपरिसमंतात्क्रियापाकप्रोक्षणमिति शुद्धिप्रदीपः तन्मंदं रुढेर्योगाद्वलत्वात् तीर्थेतिआशौचेआकस्मिकतीर्थप्राप्तौ विवाहदुर्गयज्ञेषुयात्रायांतीर्थकर्मणि नतत्रसूतकंतद्वत्कर्मयज्ञादिकारयेदिति पैठीनसिस्मृतेः अत्रविशेषः प्रागुक्तः जपः पुरश्चरणादिः स्तोत्रपाठः अविच्छेदेन संकल्पितहरिवंशश्रवणादिश्च अतएवोक्तंब्राह्मे गृहीतनियमस्यापिनस्यादन्यस्यकस्यचिदिति एवंदेवपूजादि मदनपारिजातेयमोपि शिवविष्ण्वर्चनंदीक्षायस्यचाग्निपरिग्रहः श्रौतकर्माणिकुर्वीतस्नातः शुद्धिमवाप्नुयात् गौडशुद्धितत्त्वेमंत्रमुक्तावल्यां जपोदेवार्चनविधिः कार्योदीक्षान्वितैर्नरैः नास्तिपापंयतस्तेषांसूतकंवायतात्मनाम् राघवभट्टीयेनारदः अथसूतकिनः पूजांवक्ष्याम्यागमचोदिताम् स्नात्वानित्यंचनिर्वर्त्यमानस्याक्रिययातुवै बाह्यपूजाक्रमेणैवध्यानयोगेनपूजयेत् यदिकामोनचेत् कामीनित्यंपूर्ववदाचरेत् यत्तुनृसिंहकल्पे सदामंत्रजपंमुक्त्वायदिस्यादशुचिर्नरः मनसावहितस्तत्रस्मरेन्मंत्रंनतूच्चरेत् तन्मूत्राद्याशौचपरं रामार्चनचंद्रिकायां अशुचिर्वाशुचिर्वापिगच्छंस्तिष्ठन्स्वपन्नपि मंत्रैकस्मरणोविद्वान् मनसैवसदाभ्यसेत् कालनियमाभावेतुहेयमेव उत्सवोरथयात्रादिः एषुनाशौचं अयंचाशौचाभावोनन्यगतित्वेआर्तौचज्ञेयः अत्रमूलमाकरेस्पष्टम् ।
त्रिंशच्छ्लोकींत - " अन्नसत्री , व्रती , राजा , राजसेवक , दीक्षित ( यज्ञदीक्षा घेतलेला ), ऋत्विक् , स्वदेशाचा विनाश , आपत्काल , अनेक वेदपठण , वैद्य , स्वयंपाकी ( आचारी ), धोबी वगैरे , आतुर ( रोगग्रस्त ), यांचे ठिकाणीं त्यांच्या त्यांच्या कर्मांविषयीं आशौच नाहीं . मोठें दान , उपनयन , कोटिहोम वगैरे , श्राद्ध , युद्ध , देवादिप्रतिष्ठा , चूडाकर्म , तीर्थयात्रा , जप , विवाह आणि उत्सव हीं कर्मै आरंभिलीं असतां त्या त्या कर्मांविषयीं आशौच नाहीं . " ह्या श्लोकांत ‘ सत्री ’ म्हणजे अन्नसत्रवान् समजावा . कारण , यज्ञांतील जें मुख्यसत्र त्याविषयीं ‘ दीक्षित ’ या पदानें आशौच नाहीं हें सिद्ध झालें आहे . व्रती म्हणजे अनंतव्रतादिनियमयुक्त समजावा ; कारण , ‘ व्रतींना व्रताविषयीं आशौच नाहीं ’ असें विष्णुवचन आहे . प्रचेता - " कारु ( स्वयंपाकी वगैरे ), शिल्पी ( धोबी वगैरे ), वैद्य , दासी , दास , राजे , आणि राजसेवक यांना सद्यः शौच सांगितलें आहे . " आतुराला व्याधिनाशाकरितां दानादिकांविषयीं आशौच नाहीं . दानादिकांचा प्रारंभ असतां आशौच नाहीं , तो प्रारंभ नांदीश्राद्ध किंवा संकल्प समजावा . यजन म्हणजे तडागाचा उत्सर्ग , कोटिहोम इत्यादि समजावें . लघुविष्णु - " व्रत , यज्ञ , विवाह , श्राद्ध , होम , पूजा , जप , हीं आरंभ केलीं असतां सूतक नाहीं . आरंभ केलीं नसतील तर सूतक आहे . यज्ञाचा प्रारंभ म्हणजे ऋत्विग्वरण होय . व्रत व सत्र्त्र यांचा संकल्प हा प्रारंभ होय . विवाहादिकर्मांत नांदीश्राद्ध हा प्रारंभ . आणि श्राद्धाचा प्रारंभ म्हणजे पाकपरिक्रिया होय . " पाकाची आसमंतात्क्रिया म्हणजे पाकप्रोक्षण , असें शुद्धिप्रदीप सांगतो , तें सांगणें मंद आहे . कारण , रुढीपेक्षां व्युत्पत्तीनें अर्थ करणें निर्बल आहे . तीर्थाच्या ठिकाणीं आशौच नाहीं तें असें - आशौचांत अकस्मात् तीर्थ प्राप्त असतां आशौच नाहीं . कारण , " विवाहांत , दुर्गांत , यज्ञांत , यात्रेचे ठायीं तीर्थकर्मांविषयीं सूतक नाहीं . तसेंच यज्ञादिकर्मांविषयीं सूतक नाहीं . तें तें कर्म करवावें " असें पैठीनसिस्मृतिवचन आहे . तीर्थाविषयींचा विशेष निर्णय पूर्वीं श्राद्धप्रकरणीं सांगितला आहे . जप म्हणजे पुरश्चरणादिक व सतत स्तोत्रपाठ आणि संकल्प करुन श्रवण करण्याचा हरिवंशादिक समजावा . म्हणूनच ब्राह्मांत सांगतो - " इतर कोणी मनुष्यानें नियम घेतला असेल तर त्यालाही आशौच नाहीं . " देवपूजादिकांविषयींही असेंच समजावें . मदनपारिजातांत यमही - " ज्याला शिवविष्णूच्या पूजेची दीक्षा आहे व ज्यानें अग्न्याधान केलें आहे , त्यानें तीं कर्मै करावीं , आशौच असेल तर स्नान केला म्हणजे तो शुद्ध होतो . " गौडशुद्धितत्त्वांत मंत्र - मुक्तावलींत - " दीक्षा घेतलेल्या मनुष्यांनीं जप व देवपूजा करावी . कारण , नियम धारण करणार्या त्या मनुष्यांना पातक किंवा सूतक नाहीं . " राघवभट्टीयांत नारद - " आतां सुतक्याला आगमोक्त पूजा सांगतों . सुतक्यानें स्नान करुन नित्यकर्म ( संध्या ) करुन निष्काम असेल तर दररोज करावयाच्या बाह्य पूजेच्या अनुक्रमानें मनानें ध्यान करुन मानसपूजा करावी . सकाम असेल तर सुतकाच्या पूर्वींप्रमाणें नित्य करावी . " आतां जें नृसिंहकल्पांत - " जर मनुष्य अशुचि असेल तर त्या वेळीं सर्वदा मंत्राचा जप टाकून समाधानपूर्वक मनानें मंत्राचें स्मरण करावें , उच्चार करुं नये . " असा मंत्रोच्चाराचा निषेध केला तो मूत्रादिकानें प्राप्त झालेल्या आशौचाविषयीं आहे . रामार्चनचंद्रिकेंत - " विद्वान् मनुष्य अशुचि असो किंवा शुचि असो , त्यानें चालत असतां , उभें राहत असतां किंवा निजत असतां मंत्राचेंच स्मरण करीत असून मनानेंच सर्वकाळ अभ्यास करावा . " ज्या कर्माविषयीं काळाचा नियम नसेल असलें कर्म आशौचांत टाकावेंच . वरील त्रिंशच्छ्लोकीच्या वचनांत उत्सव म्हटला तो रथयात्रा इत्यादिक समजावा . यांचेठायीं आशौच नाहीं . हा वर त्रिंशच्छ्लोकींत सांगितलेला आशौचाचा अभाव त्या त्या कडून तें तें कर्म केल्यावांचून दुसरी गति नसेल त्या वेळीं आणि एक प्रकारची पीडा असेल त्या वेळीं जाणावा . याविषयीं मूलवचनें आकरांत स्पष्ट आहेत .
अत्रदीक्षितस्यअवभृथात्पूर्वमेवाशौचाभावः तदादित्वाशौचमस्त्येव तेनवैतानोपासनाः कार्याइतिवैतानत्वेप्यवभृथादिनभवत्येव अतएवोक्तंमाधवीयेब्राह्मे तद्वद्गृहीतदीक्षस्यत्रैविद्यस्यमहामखे स्नानंत्ववभृथेयावत्तावत्तस्यनसूतकमिति वैतानोपासनाः कार्याइत्यनेनैवसिद्धैऋत्विजांदीक्षितानांचेतिपुनर्दीक्षितग्रहणंयजमानेस्वयंकर्तृत्वार्थंस्नानप्राप्त्यर्थंवेतिविज्ञानेश्वरः वस्तुतस्तुदीक्षणीयासंस्कृतस्यप्रागवभृथात्कर्मप्राप्त्यर्थं दीक्षितग्रहणं तेनततः पूर्वंनिषेधएव यत्तु प्रारंभोवरणंयज्ञेइतितदृत्विक्परं तथाचछंदोगपरिशिष्टे नदीक्षिण्याः परंयज्ञेनकृच्छ्रादितपश्चरन्निति शुद्धितत्त्वेप्येवम् ऋत्विजांचमधुपर्कोत्तरमाशौचाभावः गृहीतमधुपर्कस्ययजमानात्तुऋत्विजः पश्चादशौचेपतितेनभवेदितिनिश्चयइतिब्राह्मात् अतएवरामांडारः चतुर्णांवरणपक्षेन्येषामाशौचेन्यआगमयितव्याइत्याह एवंस्मार्तेपितुलाकोटीहोमादौमधुपर्केसतिदोषाभावोज्ञेयः यत्तु प्रारंभोवरणंयज्ञइतितत्रापिमधुपर्कांतंज्ञेयं तेनाधानेष्टिपशुबंधादौतदभावादन्येभवंतीतिसिद्धं ।
येथें दीक्षिताला आशौचाचा अभाव सांगितला तो अवभृथस्नानाच्या पूर्वींच समजावा , अवभृथस्नान धरुन पुढच्या कर्माविषयीं आशौच आहेच . तेणेंकरुन " श्रुतीनें सांगितल्यावरुन श्रौताग्नींच्या उपासना कराव्या " या वचनानें श्रौताग्निसंबंधी कर्म करावें असें झालें तरी , अवभृथ धरुन पुढचीं कर्मे होतच नाहींत . म्हणूनच माधवीयांत ब्राह्मांत असें सांगितलें कीं , " मोठ्या यज्ञाविषयीं ज्यानें दीक्षा घेतली आहे त्याला अवभृथस्नानावधिक कर्मांमध्यें सूतक नाहीं . " " सूतकांत सूतक नाहीं , श्रौताग्नीच्या उपासना कराव्या " या याज्ञवल्क्यवचनावरुन दीक्षिताला आशौच नाहीं , असें सिद्ध झालें असून पुनः ‘ ऋत्विजांना व दीक्षितांना आशौच नाहीं ’ या वचनांत दीक्षितग्रहण केलें हें अशाकरितां कीं , दीक्षिताला आशौच नसल्यामुळें स्वतः कर्तृत्व बोधन करण्याकरितां किंवा स्नान प्राप्त नाहीं तें प्राप्त होण्याकरितां आहे , असें विज्ञानेश्वर सांगतो . वास्तविक म्हटलें तर दीक्षणीयासंस्कारानें ज्याला संस्कार केलेला आहे त्याला सूतकांत अवभृथाच्या पूर्वींचीं कर्मै प्राप्त होण्याकरितां दीक्षितग्रहण आहे . तेणेंकरुन दीक्षणीयासंस्कार नसेल तर निषेधच आहे . आतां जें " यज्ञाला प्रारंभ म्हणजे ऋत्विग्वरण होय , तें झाल्यावर सूतक नाहीं " असें सांगितलें तें ऋत्विजांविषयीं समजावें . तोच प्रक्रार छंदोगपरिशिष्टांत सांगतो - " यज्ञामध्यें दीक्षणीयासंस्कार झाल्यावर पुढें सूतक नाहीं . कृच्छ्र , चांद्रायण इत्यादि तप करणाराला आशौच नाहीं . " शुद्धितत्त्वांतही असेंच आहे . ऋत्विजांनाही मधुपर्क झाल्यावर आशौच नाहीं . कारण , " यजमानापासून ज्यानें मधुपर्क घेतला आहे त्याला नंतर आशौच प्राप्त असतां तें त्याला आशौच होत नाहीं , असा निश्चय आहे " असें ब्राह्मवचन आहे . म्हणूनच रामांडार - " चार ऋत्विजांचें वरण केलें असेल त्यापक्षीं एकांना आशौच असेल तर दुसरे बोलवावे " असें सांगतो . ही श्रौतकर्माविषयीं व्यवस्था सांगितली . याप्रमाणें तुलादान , कोटिहोम इत्यादि स्मार्तकर्मांमध्येंही मधुपर्क झाला असतां ऋत्विजांना दोष नाहीं . आतां जें यज्ञाला प्रारंभ ऋत्विग्वरण असें सांगितलें , तेथेंही तें ऋत्विग्वरण मधुपर्कांत समजावें . मधुपर्क झाल्यावांचून आशौचाभाव नाहीं , असें झाल्यानें ; आधानेष्टि , पशुबंध इत्यादि कर्मामध्यें मधुपर्क नसल्यामुळें सूतक प्राप्त असतां दुसरे ऋत्विज् होतात , असें सिद्ध झालें .
अपवादांतरमाहयाज्ञवल्क्यः वैतानोपासनाः कार्याः क्रियाश्चश्रुतिचोदनात् तत्रत्यागमात्रेस्नानोत्तरं स्वयंकर्तृत्वं श्रौतेकर्मणितत्कालंस्नातः शुद्धिमवाप्नुयादितिस्मृतेः त्यागातिरिक्तेतुश्रौतेस्मार्तेचान्यस्यैवकर्तृत्वं सूतकेमृतकेचैव अशक्तौश्राद्धभोजने प्रवासादिनिमित्तेषुहावयेन्नतुहापयेदितिबृहस्पत्युक्तेः नित्यानिनिवर्तेरन्वैतानवर्जंशालाग्नौचैकेन्यएतानिकुर्युरितिपैठीनसिस्मृतेश्चेतिविज्ञानेश्वरः एकग्रहणंपूजार्थं तेनस्मार्तं कार्यमेवेतिहारलतायां दाक्षिणात्यास्तुविकल्पमाहुः अपरार्कादिनिबंधास्तु श्रौतंसर्वस्वयंकार्यं स्मार्तेतुत्यागातिरिक्तेन्यस्यैवकर्तृत्वं त्यागमात्रेतुस्वस्य कर्मवैतानिकंकार्यंस्नानोपस्पर्शवान्स्वयमितिहारीतोक्तेः दर्शंचपूर्णमासंचकर्मवैतानिकंचयत् सूतकेपित्यजन्मोहात्प्रायश्चित्तीयतेद्विजइतिमरीच्युक्तेः जन्महान्योर्वितानस्यकर्मत्यागोनविद्यते शालाग्नौकेवलोहोमः कार्यएवान्यगोत्रजैरितिजाबालोक्तेश्चेत्याहुः आशार्केप्येवं याज्ञिकाअप्येवं सूतकेतुसमुत्पन्नेस्मार्तंकर्मकथंभवेत् पिंडयज्ञंचरुंहोममसगोत्रेणकारयेदितिजातूकर्ण्योक्तेश्च चरुः स्मार्तस्थालीपाकः श्रवणाकर्मादिश्चेतिविज्ञानेश्वरः प्रारब्धंतुसपिंडेनापिकार्यं नचतत्कर्मकुर्वाणः सनाभ्योप्यशुचिर्भवेदितिमनूक्तेः छंदोगपरिशिष्टेपि होमः श्रौतेतुकर्तव्यः शुष्कान्नेनफलेनवा अकृतंहावयेत्स्मार्तेतदभावेकृताकृतं अकृतंव्रीह्यादि कृताकृतंतंदुलादि स्मार्तहोमादौतुविकल्पोज्ञेयः शालाग्नौचैकइतिप्रागुक्तेः यदाकरणंतदान्यद्वारा ।
दुसरा अपवाद सांगतो याज्ञवल्क्य - " सूतक प्राप्त असलें तरी श्रुतीनें सांगितल्यामुळें श्रौताग्नींच्या उपासना व तत्संबंधी क्रिया कराव्या . " त्यांत त्यागाविषयीं मात्र स्नान केल्यावर स्वतः यजमानाला कर्तृत्व येतें . कारण , " सूतक प्राप्त असतां श्रौतकर्माविषयीं तत्काल स्नान करुन शुद्ध होतो " असें स्मृतिवचन आहे . त्यागावांचून इतर श्रौत व स्मार्त कर्माविषयीं अन्यालाच कर्तृत्व आह्हे . कारण , " जननाशौचांत , मृताशौचांत , अशक्ति असतां , श्राद्धभोजन केलें असतां , आणि आपण प्रवासादिकांत गेलें असतां दुसर्याकडून होम करवावा . होमावांचून दिवस घालवूं नये " असें बृहस्पतिवचन आहे . आणि " श्रौतकर्मावांचून इतर नित्यकर्मै सूतकांत वर्ज्य होतात , हीं नित्य कर्मै शालाग्नीवर ( गृह्याग्नीवर ) इतरांनीं करावीं , असें कितीएक आचार्य सांगतात " अशी पैठीनसिस्मृतीही आहे , असें विज्ञानेश्वर सांगतो . या वचनांत ‘ एके ’ पद पूजेसाठीं आहे , विकल्पासाठीं नाहीं ; त्यामुळें स्मार्तकर्म करावेंच , असें हारलतेंत सांगितलें आहे . दाक्षिणात्य तर - स्मार्तकर्माविषयीं विकल्प सांगतात . अपरार्क इत्यादि निबंधकार तर - सारें श्रौतकर्म यजमानानें स्वतः करावें . त्यागव्यतिरिक्त स्मार्तकर्माविषयीं तर सूतकामध्यें अन्यालाच कर्तृत्व आहे . त्यागाविषयीं मात्र यजमानाला कर्तृत्व आहे . कारण , " सूतकांत स्नान , आचमन करुन स्वतः श्रौतकर्म करावें " असें हारीतवचन आहे . " दर्शपूर्णमासयाग व दुसरें श्रौतकर्म असेल तें सूतकामध्यें देखील जो अज्ञानानें टाकील तो प्रायश्चित्ताला योग्य होतो " असें मरीचिवचन आहे . आणि " जनन व मरण झालें असतां श्रौतकर्माचा त्याग होत नाहीं . स्मार्तकर्माचा अन्यगोत्रजांनीं शालाग्नीवर केवळ होम करावाच " असें जाबालवचनही आहे , असें सांगतात . आशार्कोंतही असेंच आहे . याज्ञिकही असेंच सांगतात . कारण , " सूतक उत्पन्न झालें असतां स्मार्तकर्म कसें होईल ? पिंडपितृयज्ञ , चरु आणि होम अन्यगोत्रजाकडून करवावा " असें जातूकर्ण्यवचनही आहे . या वचनांत ‘ चरु ’ म्हणजे स्मार्त स्थालीपाक आणि श्रवणाकर्मादिक समजावा , असें विज्ञानेश्वर सांगतो . आरंभिलेलें कर्म असेल तर सूतकांत सपिंडानें देखील करावें . कारण , " आरंभिलेलें कर्म करणारा सपिंड देखील अशुचि होत नाहीं " असें मनुवचन आहे . छंदोगपरिशिष्टांतही - " श्रौतांतील होम शुष्क अन्नानें किंवा फलानें करावा . स्मार्तकर्मांतील होम व्रीह्यादिकांचा करावा , त्यांच्या अभावीं तंडुलादिकांचा करावा . " स्मार्तहोमादिकांविषयीं तर विकल्प जाणावा . कारण , " शालाग्नौ चैके " असें पूर्वीं पैठीनसिस्मृतिवचन सांगितलें आहे . करावयाचा असेल तर अन्यद्वारा करावा , स्वतः करुं नये .
अत्रेदंतत्त्वं येषांबह्वृचादीनांद्वादशरात्रमहोमेपिनाग्निविच्छेदः तैर्नकार्यं तैत्तिरीयाद्यैः कार्यं त्रिरात्रमहू यमानोग्निर्लौकिकः संपद्यतेइतिसुदर्शनभाष्येवचनात् समारुढेत्वग्नौतेनापिनकार्यम् किंतुपुनराधानमेव समारोपप्रत्यवरोहयोराशौचापवादाभावादनन्यकर्तृकत्वाच्च अन्यथापुनराधानमपिस्यात् यत्त्वाश्वलायनः तौचापिसूतकेशावेपर्वणीष्टिंमहापदि पुष्पवत्यांचभार्यायांनकुर्यातांकदाचन स्मार्ताग्निः सूतकेशावेस्वयंनजुहुयाद्दिजः श्रौताग्निस्तुसकृद्भुत्वासमाप्तेवास्वयंहुनेदिति तदपिसमारुढपरम् तदाहसएव स्मार्ताग्निरात्मनोन्येषामभावेसूतकादिषु समारोप्यतदंतेषुविह्रत्यजुहुयात्स्वयमिति तथाचमनुः प्रत्यूहेन्नाग्निषुक्रियाइति वैश्वदेवस्यत्वग्निसाध्यत्वेपिवचनान्निवृत्तिः विप्रोदशाहमासीतवैश्वदेवविवर्जितइतिसंवर्तोक्तेः यद्यपि पंचयज्ञविधानंतुनकुर्यान्मृतजन्मनोरितितेनैवोक्तेः पूर्वनिषेधोव्यर्थस्तथाप्यापस्तंबादीनांवैश्वदेवस्यपंचयज्ञभिन्नत्वात्पृथडनिषेधः हरदत्तस्त्वाशौचेपिबह्वृचैर्वैश्वदेवः कार्यः तस्यद्वावनध्यायौयदात्माशुचिर्यद्देशइतिब्रह्मयज्ञस्यैवाशौचेविशिष्यनिषेधात् ।
होमाविषयींचा खरा प्रकार म्हणजे असा कीं , ज्या बह्वृचादिकांचा ( ऋग्वेद्यादिकांचा ) बारा दिवसपर्यंत होम केला नाहीं तरी अग्नीच्या विच्छेद होत नाहीं त्यांनीं सूतकांत होम करुं नये . तैत्तिरीयादिकांनीं करावा . कारण , " तीन दिवस होम केला नाहीं तर तो अग्नि लौकिक ( इतर अग्नीसारखा ) होतो " असें सुदर्शनभाष्यांत वचन आहे . अग्नीचा समारोप केलेला असेल तर तैत्तिरीयानें देखील करुं नये . तर पुनः आधानच करावें . कारण , अग्नीचा समारोप व प्रत्यवरोह यांविषयीं आशौचाचा अपवाद नाहीं , म्हणजे आशौचांत समारोप व प्रत्यवरोह करण्याविषयीं वचन नाहीं . आणि ते समारोप प्रत्यवरोह दुसर्याकडून करितांही येत नाहींत . जर ते दुसर्याकडून करितां येतील तर दुसर्याकडून पुनराधानही होईल . आतां जें आश्वलायन - " जननाशौच किंवा मृताशौच असतां , मोठी आपत्ति प्राप्त असतां , भार्या रजस्वला असतां , पर्वकालीं इष्टि कधींही करुं नये . स्मार्ताग्निमान् असेल त्यानें जननाशौचांत व मृताशौचांत स्वतः होम करुं नये . श्रौताग्निमान् असेल त्यानें प्रथमतः एकवार होम करावा अथवा सूतक समाप्त झाल्यावर स्वतः होम करावा . " या वचनानें सूतकांत स्वतः होम करुं नये म्हणून सांगितलें आहे , तें देखील समारोपबोधक आहे , तें तोच ( आश्वलायन ) सांगतो - " स्मार्ताग्निमंतानें सूतकादिकांत आपला किंवा इतरांचा अभाव असतां अग्नीचा समारोप करुन सूतकांतीं प्रत्यवरोह करुन स्वतः होम करावा . " तसेंच मनु सांगतो - " अग्नीच्या ठिकाणीं क्रियांचा विघात करुं नये . " वैश्वदेव तर अग्नीवरच होणारा असला तरी वचनानें त्याची निवृत्ति होते , तें वचन असें - " सूतक असतां ब्राह्मणानें दहा दिवस वैश्वदेवरहित असावें " असें संवर्तवचन आहे . जरी ‘ मृताशौचांत व जननाशौचांत पंचमहायज्ञ करुं नयेत " असें त्यानेंच सांगितल्यावरुन वैश्वदेवाचा निषेध झाला असतां वर सांगितलेला निषेध व्यर्थ आहे , तरी तो व्यर्थ नाहीं . कारण , आपस्तंबादिकांचा वैश्वदेव पंचयज्ञांहून भिन्न असल्यामुळें पंचयज्ञांच्या निषेधानें वैश्वदेवाचा निषेध होत नाहीं . म्हणून निराळा वैश्वदेवाचा निषेध सांगितला आहे . हरदत्त तर आशौचांत देखील बह्वृचांनीं वैश्वदेव करावा . कारण , " ब्रह्मयज्ञाचे दोन अनध्याय . शरीर अशुद्ध असणें हा एक अनध्याय , व देश अशुचि हा दुसरा अनध्याय . " या सूत्रानें आशौचांत ब्रह्मयज्ञाचाच विशेषेंकरुन निषेध केला आहे .
संध्यादीनामप्यपवादमाहापरार्केपुलस्त्यः संध्यामिष्टिंचरुंहोमंयावज्जीवंसमाचरेत् नत्यजेत्सूतकेवापित्यजन् गच्छेदधोद्विजः सूतकेमृतकेचैवसंध्याकर्मसमाचरेत् मनसोच्चारयेन्मंत्रान्प्राणायाममृतेद्विजः यत्तुचंद्रिकायांजाबालः संध्यापंचमहायज्ञानैत्यकंस्मृतिकर्मच तन्मध्येहापयेत्तेषांदशाहांतेपुनः क्रियेति यच्च संवर्तः सूतकेकर्मणांत्यागः संध्यादीनांविधीयते यच्चविष्णुपुराणं सर्वकालमुपासातुसंध्ययोः पार्थिवेष्यते अन्यत्रसूतकाशौचविभ्रमातुरभीतितइति तत्पूर्णसंध्यापरं अर्घ्यांतामानसीसंध्याकुशवारिविवर्जितेतिशुद्धिदीपेच्यवनोक्तेः पैठीनसिस्त्वर्घ्येमंत्रोच्चारणमाह सूतकेसावित्र्यांजलिंप्रक्षिप्यसूर्यंध्यायन्नमस्कुर्यात् प्रयोगपारिजातेभरद्वाजोपि सूतकेमृतकेकुर्यात् प्राणायामममंत्रकं तथामार्जनमंत्रांस्तुमनसोच्चार्यमार्जयेत् गायत्रींसम्यगुच्चार्यसूर्यायार्घ्यंनिवेदयेत् मार्जनंतुनवाकार्यमुपस्थानंनचैवहि ग्रहणेश्राद्धादावप्याशौचापवादमाहव्याघ्रः स्मार्तकर्मपरित्यागोराहोरन्यत्रसूतकेइति लैंगेपि सूतकेमृतकेचैवनदोषोराहुदर्शने तावदेवभवेच्छुद्धिर्यावन्मुक्तिर्नदृश्यते प्रयोगपारिजातेबृहस्पतिः कन्याविवाहेसंक्रांतौसूतकंनकदाचन वृद्धशातातपः यदाभोजनकालेतुअशुचिर्भवतिद्विजः भूमौनिक्षिप्यतंग्रासंस्नात्वाविप्रोविशुध्यति भक्षयित्वातुतंग्रासमहोरात्रेणशुध्यति अशित्वासर्वमेवान्नंत्रिरात्रेणविशुध्यति इदमविशेषात्सूतकादिपरमिति शुद्धितत्त्वेशूलपाणौच ।
संध्यादिकर्माविषयीं देखील अपवाद सांगतो - अपरार्कांत पुलस्त्य - " संध्या , इष्टि , चरु , होम , हे जोंपर्यंत जीवंत आहे तोंपर्यंत करावे . सूतकामध्येंही ते टाकूं नयेत . टाकणारा द्विज अधोगतीस जातो . जननांत व मृतकांत संध्याकर्म करावें . मंत्रांचा उच्चार मनानें करावा . प्राणायाममंत्रांचा उच्चार मनानेंही करुं नये . " आतां जें चंद्रिकेंत जाबाल - " संध्या पंचमहायज्ञ , आणि नित्यस्मृतिकर्म , हें सूतकामध्यें वर्ज्य करावें . आशौचांतीं पुनः तें कर्म करावें . " आणि जें संवर्त - " सूतकांमध्यें संध्यादिकर्माचा त्याग सांगितला आहे . " आणि जें विष्णुपुराण - " दोन्ही संध्यांची सार्वकाल उपासना इष्ट आहे . परंतु सूतक , आशौच , विभ्रम , रोग , भीति यांमध्यें संध्योपासना इष्ट नाहीं . " या तीन्ही वचनांनीं सांगितलेला संधेचा निषेध तो संपूर्ण संध्येविषयीं आहे . कारण , " कुश , उदक यांनीं वर्जित मानससंध्या अर्घ्यापर्यंत करावी " असें शुद्धिदीपांत च्यवनवचन आहे . पैठीनसि तर अर्घ्याविषयीं मंत्रोच्चार सांगतो - " सूतकामध्यें गायत्रीमंत्रानें अर्घ्य देऊन सूर्याचें ध्यान करुन नमस्कार करावा . " प्रयोगपारिजातांत भरद्वाजही " जननांत व मृतकांत अमंत्रक प्राणायाम करावा . मार्जनाचे मंत्रांचा मनानें उच्चार करुन मार्जन करावें . गायत्रीचा चांगला उच्चार करुन सूर्याला अर्घ्य द्यावें . अथवा मार्जन करुं नये . उपस्थानही करुं नये . " ग्रहणांत श्राद्धादिकर्मांविषयीं देखील आशौचाचा अपवाद सांगतो व्याघ्र - " राहुदर्शनावांचून इतर वेळीं सूतकांमध्यें स्मार्तकर्माचा परित्याग होतो . " लिंगपुराणांतही - " जननांत व मृतकांत राहुदर्शनीं ( ग्रहणांत ) दोष नाहीं . जननादि सूतकांत जोंपर्यंत ग्रहणमुक्ति झाली नाहीं तोंपर्यंतच शुद्धि आहे . " प्रयोगपारिजातांत बृहस्पति - " कन्याविवाहाचेठायीं व संक्रांतीचेठायीं कधींही सूतक नाहीं . " वृद्धशातातप - " जेव्हां ब्राह्मण भोजनसमयीं अशुचि होतो , तेव्हां तो तोडांतील ग्रास भूमीवर टाकून स्नान करुन तो ब्राह्मण शुद्ध होतो . तो ग्रास भक्षण करील तर एक दिवसानें उपवास करुन शुद्ध होईल . पात्रावरचें सारें अन्न भक्षण करील तर तीन दिवसांनीं उपवास करुन शुद्ध होईल . " या वचनांत अमुक कारणानें अशुचि , असें विशेष न सांगितल्यामुळें सूतकादि अशुचीविषयीं देखील हें वचन आहे , असें शुद्धितत्त्वांत व शूलपाणिग्रंथांत सांगितलें आहे .
अथद्रव्यतः मरीचिः लवणेमधुमांसेचपुष्पमूलफलेषुच शाककाष्ठतृणेष्वप्सुदधिसर्पिः पयः सुच तिलौषधाजिनेचैवपक्कापक्केस्वयंग्रहः पण्येषुचैवसर्वेषुनाशौचंमृतसूतके स्वयमेवस्वाम्यनुज्ञयाग्राह्यं नतद्धस्तादित्यर्थः क्रयेतुतद्धस्तादपिनदोषः पक्कंलडुकादि अपक्कंतंडुलादि एतदन्नसत्रपरं अन्नसत्रेप्रवृत्तानामाममन्नमगार्हितं भुक्त्वापक्कान्नमेतेषांत्रिरात्रंतुव्रतीभवेदित्यंगिरसोक्तेः पक्कान्नमोदनादि नतुभक्ष्यं षटत्रिंशन्मते उभाभ्यामपरिज्ञातेसूतकंनैवदोषकृत् एकेनापिपरिज्ञातेभोक्तुर्दोषमुपावहेत् विवाहोत्सवयज्ञेषुत्वंतरामृतसूतके परैरन्नंप्रदातव्यंभोक्तव्यंचद्विजोत्तमैः भुंजानेषुतुविप्रेषुत्वंतरामृतसूतके अन्यगेहोदकाचांताः सर्वेतेशुचयः स्मृताः बृहस्पतिः विवाहोत्सवेत्याद्युक्त्वा पूर्वसंकल्पितान्नेषुनदोषः परिकीर्तितः षडशीतौ संसर्गाद्यस्यवाशौचंयस्यातिक्रांतकालता तदीयस्यपदार्थस्यनाशौचंविद्यतेक्वचित् शुद्धितत्त्वे शुध्येदित्यनुवृत्तौ विष्णुः प्रोक्षणेनपुस्तकमिति ।
आतां कितीएक द्रव्यांविषयीं आशौच नाहीं , तो प्रकार सांगतो - मरीचि - " मीठ , मध , मांस , पुष्पें , मुळें , फळें , शाका , काष्ठें , तृण , पाणी , दहीं , तूप , दूध , तिल , औषध , अजिन ( चर्म ), पक्क ( लाडू वगैरे ), अपक्क ( तांदूळ वगैरे ) हे पदार्थ सुतक्यापासून स्वतः आपल्या हातानें घ्यावे . सुतक्याच्या हातानें घेऊं नयेत . विकत घेणें असेल तर सुतक्यापासून विकत घेण्याच्या पदार्थाविषयीं अशुद्धि नाहीं म्हणजे त्याच्या हातानें घेतले तरी दोष नाहीं . " पक्कापक्क सांगितलें हें अन्नसत्राविषयीं आहे . कारण , " आशौचांत अन्नसत्र्यांचें आमान्न निंदित नाहीं . सुतक्या अन्नसत्र्यांचें पक्कान्न ( ओदनादिक ) भोजन करील तर तीन दिवस व्रत ( कृच्छ्र ) करावें " असें अंगिरसाचें वचन आहे . येथें पक्कान्न म्हणजे ओदनादिक समजावें , लाडू वगैरे भक्ष्य समजूं नये . षटत्रिंशन्मतांत - " दात्याला व भोक्त्याला सुतकाचें ज्ञान नसेल तर दोष नाहीं . दोघांपैकीं एकाला जरी ज्ञान असेल तरी भोजन करणाराला दोष प्राप्त होईल विवाह , उत्सव , यज्ञ यांमध्यें जर सूतक प्राप्त होईल तर इतरांनीं ( अन्यगोत्र्यांनीं ) अन्न द्यावें आणि ब्राह्मणश्रेष्ठांनीं तें भोजन करावें . ब्राह्मण भोजन करीत असतां मध्यें यजमानाला सूतक प्राप्त होईल तर , त्या ब्राह्मणांनीं उठून दुसर्या घरांतील उदकानें आचमन करावें , म्हणजे ते सारे ब्राह्मण शुद्ध आहेत . " बृहस्पति - " विवाह , उत्सव , यज्ञ इत्यादि वरील वचन सांगून पुढें सांगतो - पूर्वीं संकल्पित अन्नांविषयीं दोष सांगितला नाहीं . " षडशीतींत - " ज्याला दुसर्याच्या संसर्गानें आशौच असेल किंवा ज्याला अतिक्रांत आशौच प्राप्त असेल , त्याच्या पदार्थाविषयीं कोठेंही आशौच नाहीं . " शुद्धितत्त्वांत विष्णु - " पुस्तक प्रोक्षणानें शुद्ध होतें . "
अथमृतदोषे हेमाद्रौषटत्रिंशन्मते कौर्मेच व्यापादयेद्य आत्मानंस्वयमग्न्युदकादिभिः विहितं तस्यनाशौचंनापिकार्योदकक्रिया शवदर्शनंयावदाशौचमस्त्येव हतानांनृपगोविप्रैरन्वक्षंचात्मघातिनामिति याज्ञवल्क्योक्तेः शुद्धितत्त्वेकौर्मे सद्यः शौचंसमाख्यातंशापादिमरणेतथा आदिपदादभिचारहते भविष्ये स्वेच्छयामरणेविप्राच्छृंगिदंष्ट्रिसरीसृपैः अंत्यांत्यजविषोद्बंधैरात्मनाचैवताडनैः पाखंडमाश्रिताश्चैवमहापातकिनस्तथा स्त्रियश्चव्यभिचारिण्यआरुढपतितास्तथा नतेषांस्नानसंस्कारौनश्राद्धंनसपिंडनं गौतमः प्रायोनाशकशस्त्राग्निविषोदकोद्बंधनप्रपतनैश्चेच्छतामिति नाशौचमितिशेषः अंगिराः चंडालादुदकात्सर्पाद्ब्राह्मणाद्वैद्युतादपि दंष्ट्रिभ्यश्चपशुभ्यश्चमरणंपापकर्मणां उदकंपिंडदानंचप्रेतेभ्योयत्प्रदीयते नोपतिष्ठतितत्सर्वमंतरिक्षेविनश्यति षटत्रिंशन्मतेप्येवं ब्राह्मेपि शृंगिदंष्ट्रिनखव्यालविषवह्निक्रियाजलैः व्यालोगजः सुदूरात्परिहर्तव्यः कुर्वन्क्रीडांमृतस्तुयः नागानांविप्रियंकुर्वन्हतश्चाप्यथविद्युता निगृहीतः स्वयंराज्ञाचौर्यदोषेणकुत्रचित् परदारान् हरंतश्चद्वेषात्तुपतिभिर्हताः असमानैश्चसंकीर्णैश्चंडालाद्यैश्चविग्रहं कृत्वातैर्निहतास्तद्वच्चंडालादीन्समाश्रिताः शस्त्राग्निगरदाश्चैवपाखंडाः क्रुरबुद्धयः क्रोधात्प्रायंविषंवह्निंशस्त्रमुद्बंधनंजलं गिरिवृक्षप्रपातंचयेकुर्वेंतिनराधमाः कुशिल्पजीविनोयेचसूनालंकारधारिणः मुखेभगास्तुयेकेचित्क्लीबप्रायानपुंसकाः ब्रह्मदंडहतायेचयेचापिब्राह्मणैर्हताः महापातकिनोयेचपतितास्तेप्रकीर्तिताः पतितानांनदाहः स्यान्नांत्येष्टिर्नास्थिसंचयः नचाश्रुपातः पिंडोवाकार्यंश्राद्धादिकंक्कचित् एतानिपतितानांतुयः करोतिविमोहितः तप्तकृच्छ्रद्वयेनैवतस्यशुद्धिर्नचान्यथा ।
आतां कितीएक मृतदोषाविषयीं आशौच नाहीं , तो प्रकार सांगतो - हेमाद्रींत षटत्रिंशन्मतांत व कौर्मांत - " जो मनुष्य आपणाला अग्नि , उद्क इत्यादिकांनीं मारील त्याचें आशौच सांगितलें नाहीं व त्याची उदकक्रियाही करुं नये . " मृत झाल्यापासून शवदर्शन होईपर्यंत आशौच आहेच . कारण , " राजा , गाई , ब्राह्मण यांनीं मारलेल्याचें आणि आत्मघातक्यांना प्रत्यक्ष पाहिलें असतां त्यांचें आशौच नाहीं " असें याज्ञवल्क्यवचन आहे . शुद्धितत्त्वांत कूर्मपुराणांत - " शाप इत्यादि कारणानें मरण आलें असतां सद्यः शौच ( स्नानानें शुद्धि ) सांगितलें आहे . " या वचनांतील आदिपदानें जारणमारणक्रियेनें मरण असतांही सद्यः शौच समजावें . भविष्यांत - " बुद्धिपूर्वक स्वेच्छेनें शस्त्र , विष , उदक इत्यादिकेंकरुन मरण आलें असतां ; तसेंच ब्राह्मण , शृंगी ( महिषादिक ), दंष्ट्री ( व्याघ्रादिक ), सर्प , म्लेच्छ , चंडाल , विष , उद्बंधन , आपलें आपण ताडन करुन घेणें यांनीं मरण आलें असतां ; पाखंडी , पंचमहापातकी , व्यभिचारिणी असून पति , गर्भ इत्यादिकांचा घात करणार्या स्त्रिया या सर्वांना मरण आलें असतां ; त्यांचें स्नान नाहीं , संस्कार नाहीं , श्राद्ध नाहीं व सपिंडीकरण नाहीं . " गौतम - " मरणाच्या इच्छेनें , बहुत उपवास , शस्त्र , अग्नि , विष , उदक , उद्बंधन , ( टांगून घेणें ), पर्वतादिकांवरुन उडी घेणें इत्यादि कारणांनीं मृत असतां त्यांचें आशौच नाहीं . " अंगिरा - " चंडाल , उदक , सर्प , ब्राह्मण , वीज , आणि दाढांचे पशु यांनीं पापकर्म्यांना मरण प्राप्त होतें . उदक व पिंडदान जें प्रेतांना देतात , तें यांना प्राप्त होत नाहीं . मध्येंच नष्ट होतें . " षटत्रिंशन्मतांतही असेंच आहे . ब्राह्मांतही - " शृंगी , दाढांचे पशु , नखांचे पशु , गज , विष , अग्नि , उदक यांच्याशीं क्रीडा करीत असून जो मृत असेल त्याला दूर वर्ज्य करावा . नागांचा ( सर्पांचा ) द्वेष करीत असून त्यांनीं मारलेला ; वीज पडून मेलेला ; कोठेंही चौर्य केल्यामुळें स्वतः राजानें ताडनादि करुन मारलेला ; परस्त्रिया हरण करीत असतां त्यांच्या पतींनीं द्वेषानें मारलेला ; आपल्या असमान संकीर्ण जातींच्या व चंडालादिकांच्या बरोबर युद्ध करुन त्यांनीं मारलेले ; तसेंच चंडालादिकांचा आश्रय करुन राहिलेले ; शस्त्रांनीं लोकांचा घात करणारे ; घरें वगैरे जाळणारे ; विष घालणारे ; पाखंडी ; जे क्रूरबुद्धीचे अधम मनुष्य क्रोधाच्या योगानें अनशन ( उपवास ), विष , अग्नि , शस्त्र , उद्बंधन , उदकप्रवेश , पर्वतावरुन किंवा वृक्षावरुन उडी टाकणें , हीं करितात ; जे निंद्य शिल्पकर्मानें उपजीवन करणारे ; पशुवधसंबंधीं अलंकार धारण करणारे ; जे मुखयोनि नपुंसक ; ब्रह्मदंडानें ( शापादिकानें ) मृत झालेले ; ब्राह्मणांनीं मारलेले ; आणि पंचमहापातकी हे सारे पतित म्हटले आहेत . पतितांचा दाह नाहीं , अस्थिसंचयन नाहीं ; त्यांच्यासंबंधानें अश्रुपात ( रडणें ), पिंडदान किंवा श्राद्धादि कर्म हें कोठेंही नाहीं . जो अविचारी मनुष्य पतितांचीं दाहादि कर्मै करितो त्याची शुद्धि दोन तप्तकृच्छ्रांनीं होते ; यावांचून त्याची शुद्धि होत नाहीं . "
एतद्बुद्धिपूर्वंसर्वेषांकरणेतुमाधवीयेवसिष्ठः य आत्मत्यागिनांकुर्यात्स्नेहात्प्रेतक्रियांद्विजः सतप्तकृच्छ्रसहितंचरेच्चांद्रायणव्रतं अज्ञानेतु कृत्वाग्निमुदकंस्नानंसंस्पर्शंवहनंकथां रज्जुच्छेदाश्रुपातंचतप्तकृच्छ्रेणशुध्यतीतिज्ञेयं प्रत्येकंबुद्धिपूर्वेणएतदितिमदनपारिजातः प्रत्येकंतुस्पर्शाश्रुणोर्मिताक्षरायां तच्छवंकेवलंस्पृष्टमश्रुवापतितंयदि पूर्वोक्तानामकारीचेदेकरात्रमभोजनं एकरात्रंतुनाश्नीयात्र्त्रिरात्रंबुद्धिपूर्वकमितिमाधवीये उत्तरार्धं अन्येषुतुसंवर्तः एषामन्यतमंप्रेतंयोवहेतदहेतवा कटोदकक्रियांकृत्वाकृच्छ्रंसांतपनंचरेत् अज्ञानेत्वर्धं एतदनाहिताग्नेः आहिताग्नेः कृच्छ्रएवेतिमाधवः मिताक्षरायां आत्मनस्त्यागिनांनास्तिपतितानांतथाक्रिया तेषामपितथागंगातोयेसंस्थापनंहितम् ।
हीं पतितांचीं दाहादिक सारीं कर्मै बुद्धिपूर्वक करील तर सांगतो माधवीयांत वसिष्ठ - " जो द्विज आत्मत्याग करणार्या मनुष्यांची प्रेतक्रिया स्नेहानें करील त्यानें तप्तकृच्छ्रसहित चांद्रायणव्रत करावें . " अज्ञानानें करील तर " आत्मत्यागी मनुष्यांना अग्निदान , उदकदान , स्नान , स्पर्श , वाहणें , कथा , रज्जुच्छेद , अश्रुपात हीं केलीं असतां तप्तकृच्छ्रानें शुद्ध होतो " असें जाणावें . अग्निदानादि बुद्धिपूर्वक केले असतां प्रत्येकाला हें तप्तकृच्छ्रप्रायश्चित्त असें मदनपारिजात सांगतो . स्पर्श व अश्रुपात या प्रत्येकाला मिताक्षरेंत सांगतो - " त्या आत्मघातक्यांच्या शवाला केवळ स्पर्श केला किंवा अश्रु ढाळले आणि पूर्वोक्त दाहादिक न करणारा त्यानें एक दिवस उपवास करावा . " या वचनानें उत्तरार्ध माधवीयांत असें - " एक दिवस भोजन करुं नये . बुद्धिपूर्वक करील तर तीन दिवस भोजन करुं नये . " स्पर्श व अश्रुपात यांवांचून इतरांविषयीं तर संवर्त सांगतो - " वर सांगितलेल्या कोणाचेंही प्रेत जो वाहील किंवा जाळील , प्रेतोदकक्रिया करील त्यानें सांतपन कृच्छ्र करावें . " न जाणून करील तर अर्धै प्रायश्चित्त . हें मृत आहिताग्नि नसेल त्याचें समजावें . आहिताग्नीचें कृच्छ्रच आहे , असें माधव सांगतो . मिताक्षरेंत - " आत्मत्यागी मनुष्यांची तशीच पतितांची और्ध्वदेहिक क्रिया नाहीं . त्यांचे प्रेत गंगोदकांत टाकणें हितकारक आहे . "
आहिताग्नेस्तुविशेषोहेमाद्रौभविष्ये वैतानंप्रक्षिपदेप्सुआवसथ्यंचतुष्पथे पात्राणितुदहेदग्नौसाग्निकेपापकर्मणि छंदोगपरिशिष्टेपि महापातकसंयुक्तोदौरात्म्यादग्निमान्यदि पुत्रादिः पालयेदग्नीन्युक्त आदोषसंक्षयात् प्रायश्चित्तंनकुर्याद्यः कुर्वन्वाम्रियतेयदि गृह्यंनिर्वापयेच्छ्रौतमप्स्वस्येत्सपरिच्छदं पात्राणिदद्याद्विप्रायदहेदप्स्वेववाक्षिपेत् माधवीयेपराशरः आहिताग्निर्मृतोविप्रश्चंडालेनात्मघातकः दहेतब्राह्मणं विप्रोलोकाग्नौमंत्रवर्जितं प्राजापत्यंचरेत्पश्चाद्विप्राणामनुशासनात् दग्ध्वास्थीनिपुनर्गृह्यक्षीरेणक्षालयेत्ततः स्वेनाग्निनास्वमंत्रेणपृथगेनंपुनर्दहेत् हेमाद्रौतु दाहयित्वाशवंतेषांशूद्रैरविधिपूर्वकमित्युक्तं एतद्दर्पादिनामरणेज्ञेयं तांस्तेप्रेत्याभिगच्छंतियेकेचात्महनोजनाइतिश्रुतावात्महननेएवदोषोक्तेः प्रमादमरणेत्वाशौचादिसर्वंभवत्येव तदाहांगिराः अथकश्चित्प्रमादेनम्रियेताग्न्युदकादिभिः तस्याशौचंविधातव्यंकर्तव्याचोदकक्रिया ब्राह्मेपि प्रमादादपिनिः शंकस्त्वकस्माद्विधिचोदितः श्रृंगिदंष्ट्रिनखिव्यालविषविद्युज्जलादिभिः चंडालैरथवाचोरैर्निहतोवापिकुत्रचित् तस्यदाहादिकंकार्यंयस्मान्नपतितस्तुसइति प्रमादमरणेत्रिरात्रमाशौचमिति गौडाः शुद्धितत्त्वादयः दशाहादीतिदाक्षिणात्याः अस्यापवादोहेमाद्रौभविष्ये प्रमादादिच्छयावापिनकुर्यात्सर्पतोमृते नागपूजांविनानकुर्यादित्यर्थः बौधायनोपि बुद्धिपूर्वात्महंतृणांक्रियालोपोविधीयते क्रियांत्यकर्म ।
आहिताग्निप्रेताला तर विशेष सांगतो हेमाद्रींत भविष्यांत - " अग्निमान् पापकर्मीं मृत झाला असतां त्याचे श्रौताग्नि उदकांत टाकावे . गृह्याग्नि चवाठ्यावर टाकावा . आणि अग्निसंबंधी पात्रें अग्नींत जाळावीं . " छंदोगपरिशिष्टांतही - " जर साग्निक ब्राह्मण दुष्टबुद्धीनें महापातकी होईल तर प्रायश्चित्तादिकानें दोष क्षीण होत तोंपर्यंत त्याच्या पुत्रादिकानें अग्नीचें पालन करावें . प्रायश्चित्तादिकानें दोष क्षीण होईपर्यंत तो प्रायश्चित्त करणार नाहीं , अथवा प्रायश्चित्त करीत असतां मरेल तर त्याचें गृह्य विझवून श्रौताग्नि सामग्रीसह उदकांत टाकावे . पात्रें ब्राह्मणाला द्यावीं , किंवा जाळावीं अथवा उदकांतच टाकावीं . " माधवीयांत पराशर - " आहिताग्नि ब्राह्मण चांडालानें मारला जाईल किंवा आत्मघातानें मरेल तर त्याच्या प्रेताचा ब्राह्मणानें अमंत्रक दाह करुन नंतर ब्राह्मणांच्या आज्ञेनें प्राजापत्य कृच्छ्र प्रायश्चित्त करावें . त्याचें प्रेत जाळून अस्थि घेऊन त्या दुधानें धुवून श्रौताग्नीनें निराळा अस्थींचा पुनः दाह करावा . " हेमाद्रींत तर - " त्याचें प्रेत शूद्रांनीं विधिरहित जाळावें " असें सांगितलें आहे . हा सर्व प्रकार गर्वादिकेंकरुन मरण आलें असतां जाणावा . कारण , ‘‘ जे कोणी आत्महत्यारी जन आहेत ते मेल्यावर अंधतामिस्त्र लोकाप्रत जातात ’ या श्रुतींत आत्म्याचा घात केला असतांच दोष सांगितला आहे . प्रमादानें मृत असेल तर आशौचादिक सारें कृत्य होतच आहे . तें सांगतो अंगिरा - ‘‘ आतां कोणी प्रमादानें अग्नि , उदक इत्यादिकांनीं मरेल तर त्याचें आशौच करावें , त्याची उदकदानादिक सारी क्रिया करावी . " ब्राह्मांतही - " सावधपणा नसल्यामुळें अथवा निः शंकपणानें अकस्मात् प्रारब्धानें प्रेरित होऊन शृंगयुक्त पशु , दाढायुक्त , पशु , नखी , हत्ती , विष , विद्युल्लता , उदक , चंडाल , चोर , इत्यादिकांची गांठ पडून त्यांनीं मारला जाईल अथवा इतर कारणांनीं कोठेंही मरेल तर त्याचें दाहादिक कर्म करावें ; कारण , तो पतित नाहीं . " प्रमादानें मरण असतां तीन दिवस आशौच करावें , असें गौड - शुद्धितत्त्वादि ग्रंथकार सांगतात . दशाहादिक आशौच करावें , असें दाक्षिणात्य सांगतात . याचा अपवाद हेमाद्रींत भविष्यांत - " प्रमादानें अथवा इच्छेनें सर्पापासून मृत असेल तर नागपूजा केल्यावांचून और्ध्वदेहिक करुं नये . " बौधायनही - " बुद्धिपूर्वक आत्महत्या करणारांचें अंत्यकर्म करुं नये . "
तत्रदुर्मरणनिमित्तंदानादिकार्यं तच्चविश्वप्रकाशादौशातातपीयेच व्याघ्रेणनिहतेविप्रेविप्रकन्यांविवाहयेत् सर्पदष्टेनागबलिर्देयः सर्पश्चकांचनः चतुर्निष्कमितंहैमंगजंदद्याद्गजैर्हते राज्ञाविनिहतेदद्यात्पुरुषंतुहिरण्मयं चौरेणनिहतेधेनुंवैरिणानिहतेवृषं वृषेणनिहतेदद्याद्यथाशक्त्यातुकांचनं शय्यामृतेप्रदातव्याशय्यातूलीसमन्विता निष्कमात्रसुवर्णस्यविष्णुनासमधिष्ठिता शौचहीनेमृतेचैवद्विनिष्कंस्वर्णजंहरिं संस्कारहीनेचमृतेकुमारमुपनाययेत् निष्कत्रयंस्वर्णमितंदद्यादश्वंहयाहते शुनाहतेक्षेत्रपालंस्थापयेन्निजशक्तितः सूकरेणहतेदद्यान्महिषंदक्षिणान्वितं कृमिभिश्चमृतेदद्याद्गोधूमान्पंचखारिकाः वृक्षंवृक्षहतेदद्यात्सौवर्णंवस्त्रसंयुतं शृंगिणानिहतेकार्यमुदपानंस्वशक्तितः दारुणानिहतेचैवकर्तव्यासदनेसभा शस्त्रेणनिहतेदद्यान्महिषींदक्षिणान्वितां अश्मनानिहतेदद्यात्सवत्सांगांपयस्विनीं विषेणचमृतेदद्यान्मेदिनींहेमनिर्मितां उद्बंधनेनचमृतेकपिंकनकनिर्मितं मृतेजलेनवरुणंहैमंदद्याद्दिनिष्कजं विषूचिकामृतेस्वादुभोजयेच्चशतंद्विजान् घृतधेनुः प्रदातव्याकंठान्नकवलेमृते कासरोगेणचमृतेअष्टकृच्छ्रव्रतंचरेत् अतिसारमृतेलक्षंगायत्र्याः प्रयतोजपेत् शाकिन्यादिग्रहग्रस्तेजपेद्रुद्रंयथोदितं विद्युत्पातेननिहतेविद्यादानंसमाचरेत् अंतरिक्षमृतेकार्यंवेदपारायणंतथा सच्छास्त्रपुस्तकंदद्यादस्पृश्यस्पर्शतोमृते पतितेचमृतेकुर्यात्प्राजापत्यांस्तुषोडश मृतेचापत्यरहितेकृच्छ्राणांनवतिंचरेत् एवंकृते विधानेतुविदध्यादौर्ध्वदेहिकं ।
वर सांगितलेल्या दुष्टमरणानें मृत असतां त्या दुर्मरणाच्या निमित्तानें दानादिक करावें . तें दानादिक विश्वप्रकाशादिकांत व शातातपीयांत सांगतो - " व्याघ्रानें ब्राह्मण मारिला असतां ब्राह्मणकन्येचा विवाह करावा . सर्पानें दंश करुन मृत असतां नागबलि करावा . आणि सुवर्णाचा सर्प करुन ब्राह्मणास द्यावा . हत्तींनीं मारला असतां चार निष्कपरिमित सुवर्णाचा हत्ती करुन ब्राह्मणास द्यावा . राजानें मारला असतां सुवर्णाचा पुरुष करुन द्यावा . चोरानें मारला असतां धेनु द्यावा . शत्रूनें मारला असतां वृषभ द्यावा . वृषभानें मारला असतां यथाशक्ति सुवर्ण द्यावें शय्येवर मेला असतां तूली ( सळई ) युक्त व निष्कमात्र सुवर्णाची विष्णुप्रतिमा वर बसवून शय्या द्यावी . शौचरहित असून मृत असतां दोन निष्कांची सोन्याची हरिप्रतिमा करुन ती द्यावी . संस्काररहित मृत असतां ब्राह्मणाच्या मुलाचें उपनयन करवावें . अश्वानें मारला असतां तीन निष्क सुवर्णाचा अश्व द्यावा . कुत्र्यानें मारला असतां आपल्या शक्तीप्रमाणें क्षेत्रपालाची स्थापना करावी . डुकरानें मारला असतां दक्षिणासहित महिष द्यावा . कृमींनीं मृत असतां पांच खारीपरिमित गोधूम द्यावे . वृक्षानें मृत असतां सुवर्णाचा वृक्ष वस्त्रासहित द्यावा . शृंगीनें मृत असतां वस्त्रयुक्त वृषभ द्यावा . गाडीनें मृत असतां उपस्कर ( साहित्य ) सहित कांहीं द्रव्य द्यावें . पर्वताच्या शिखरावरुन पडून मृत असतां धान्याचा पर्वत करुन तो द्यावा . अग्नीनें मृत असतां आपल्या शक्तीप्रमाणें कूप ( विहीर ) करुन त्याचा उत्सर्ग करावा . काष्ठानें मृत असतां धर्मार्थ सभा करावी . शस्त्रानें मृत असतां दक्षिणासहित महिषी द्यावी . पाषाणानें मृत असतां दूध देणारी सवत्स गाई द्यावी . विषानें मृत असतां सुवर्णनिर्मित भूमि द्यावी . उद्बंधनानें मृत असतां सुवर्णनिर्मित वानर द्यावा . उदकानें मृत असतां दोन निष्क सुवर्णाची वरुणाची मूर्ति करुन ती द्यावी . पटकीनें मृत असतां शंभर ब्राह्मणांना गोड भोजन घालावें . घशामध्यें अन्नाचा घांस लागून मृत असतां घृताची धेनु द्यावी . खोकल्यानें मृत असतां आठ कृच्छ्र प्रायश्चित्त करावें . अतिसारानें मृत असतां गायत्रीचा लक्ष जप करावा . शाकिनी , डाकिनी इत्यादि ग्रहांनीं पीडित होऊन मृत असतां रुद्राचा जप करावा . वीज पडून मृत असतां विद्येचें दान करावें . अंतरिक्षांत मृत असतां वेदपारायण करावें . अस्पृश्यांच्या स्पर्शानें मृत असतां उत्तम शास्त्राचें पुस्तक द्यावें . पतित मृत असतां सोळा प्राजापत्य कृच्छ्र करावे . अपत्यरहित मृत असतां नव्वद कृच्छ्र करावे . असें दानादिविधान केल्यावर त्याचें और्ध्वदेहिक कर्म करावें .
तथावैधमरणेपिनदोषः तदाहतुर्मनुवृद्धगार्ग्यौ वृद्धः शौचमृतेलुप्तप्रत्याख्यातभिषक्क्र्रियः आत्मानंघातयेद्यस्तुभृग्वग्न्यनशनांबुभिः तस्यत्रिरात्रमाशौचंद्वितीयेत्वस्थिसंचयः तृतीयेतूदकंदत्वाचतुर्थेश्राद्धमाचरेदिति हेमाद्रौविष्णुधर्मेपि नरस्तुव्याधिरहितोनत्यजेदात्मनस्तनुं असूर्यानामतेलोकाअंधेनतमसावृताः तांस्तेप्रेत्याभिगच्छंतियेकेचात्महनोजनाः अरिष्टैरात्मनोज्ञात्वामृत्युकालमुपस्थितं व्याधितोभिषजात्यक्तः पूर्णेवायुषिचात्मनः यथायुगानुसारेणसंत्यजेदात्मनस्तनुं तस्मिन्कालेतनुत्यागाद्यथेष्टंफलमाप्नुयात् आयुषस्तुपुरादृष्टंमरणंब्राह्मणस्यच नेतिगौडानामपपाठः उत्तरार्धेसंगतेः क्षत्रियस्यतुसंग्रामेमृतेभर्तरियोषितः अपरार्केब्रह्मगर्भः योजीवितुंनशक्नोतिमहाव्याधुपपीडितः सोग्न्युदकंमहायात्रांकुर्वन्नत्रनदुष्यति अत्रोक्तवक्ष्यमाणवचोनिचयात्प्रयागातिरिक्तेऽचिकित्स्यरोगाद्युपहतानामधिकारः सोपिजीर्णवानप्रस्थस्यैवेतिविज्ञानेश्वरदेवयाज्ञिकादयः अतएवमिताक्षरादौभृगुपातानशनादिकंवानप्रस्थस्यैवोक्तं मनुरपि आसांमहर्षिचर्याणांत्यक्त्वान्यतमयातनुं वीतशोकभयोविप्रोब्रह्मभूयायकल्पतइति तेनान्यत्रापितद्विषयतैव मूलैक्यादितिकेचित् तन्न वानप्रस्थमरणेआशौचनिषेधात् तेनग्रहस्थादिपरमेवेदं तेनयतेर्नाधिकारः काम्येनधिकाराच्च नैमित्तिकत्वेत्वकरणेदोषोनित्यताचस्यात् प्रयागेत्वरोगिणांरोगिणांच यत्तु शूद्राश्चक्षत्रियावैश्या अंत्यजाश्चतथाधमाः एतेत्यजेयुः प्राणान्वैवर्जयित्वाद्विजंनृप पतित्वाब्राह्मणस्तत्रब्रह्महाचात्महाभवेदिति तन्निर्मूलमितिभट्टाः तत्त्वंतु हेमाद्रौव्रतकांडेलिखनान्निर्मूलत्वंचिंत्यमेव प्रक्रमात्तुपतित्वेतिभृगुपातमात्रपरंयुक्तं ब्राह्मणस्याप्यनुज्ञातमितिवक्ष्यमाणविरोधाच्च यत्त्वादित्यपुराणे अब्राह्मणोवास्वर्गादिमहाफलजिगीषया प्रविशेज्ज्वलनंतोयंकरोत्यनशनंतथेति तत्प्रयागातिरिक्तपरमितिकेचित् हेमाद्रौत्वेतदग्रे प्रयागवटशाखाग्रादित्युक्तेर्ब्राह्मणस्यप्रयागेपिनेतिप्रतीयते ।
तसेंच शास्त्रविहित जलादि मरणाविषयींही दोष नाहीं . तें सांगतात मनु व वृद्धगार्ग्य - " वृद्ध झालेला पापी नसून अपरिहार्य रोगांनीं पीडलेला असा जो मनुष्य मोठा पर्वताचा कडा , अग्नि , अनशन ( उपवास ), उदक यांनीं आपल्या देहाचा घात करील त्याचें तीन दिवस आशौच धरावें . दुसर्या दिवशीं अस्थिसंचयन करावें . तिसर्या दिवशीं उदक देऊन चवथ्या दिवशीं श्राद्ध करावें . " हेमाद्रींत विष्णुधर्मांतही - " व्याधिरहित मनुष्यानें आपल्या देहाचा त्याग करुं नये . जे कोणी आत्मघातकी मनुष्य ते अंधतमानें आवृत असे जे सूर्यरहित लोक त्या लोकांस जातात . अरिष्टांनीं ( मरणसूचक चिन्हांनीं ) आपणास मृत्युकाल प्राप्त झाला असें जाणून अथवा पूर्ण आयुष्य असतांही व्याधिग्रस्त होऊन वैद्यांनीं सोडला असें जाणून युगानुरोधेंकरुन आपल्या देहाचा त्याग करावा . अशा कालीं देहत्याग केल्यानें यथेष्ट फल प्राप्त होतें . आयुष्य संपण्याच्या पूर्वीं ब्राह्मणाला मरण , वर सांगितल्याप्रमाणें आहे . क्षत्रियाला युद्धामध्यें आणि स्त्रियांना भर्ता मृत असतां मरण सांगितलें आहे . " या वचनांत ‘ मरणं ब्राह्मणस्य न ’ असा गौडांचा पाठ तो अशुद्ध आहे . कारण , तशा पाठानें उत्तरार्धाची संगति होत नाहीं . अपरार्कांत ब्रह्मगर्भ - " जो मनुष्य मोठ्या व्याधीनें पीडित होऊन जीवंत राहाण्याविषयीं समर्थ होत नाहीं तो मनुष्य अग्निप्रवेश किंवा उदकप्रवेश अथवा महायात्रा करीत असतां दोषी होत नाहीं . " येथें पूर्वीं सांगितलेल्या व पुढें सांगावयाच्या वचनसमुदायावरुन प्रयागावांचून इतर ठिकाणीं मरण्याविषयीं अपरिहार्य रोगादिकांनीं पीडितांना अधिकार आहे , तो जीर्ण झालेल्या वानप्रस्थालाच आहे , असें विज्ञानेश्वर , देवयाज्ञिक इत्यादिक सांगतात . म्हणूनच मिताक्षरादि ग्रंथांत मोठ्या कड्यावरुन पतन , अनशन इत्यादिक वानप्रस्थालाच सांगितलें आहे . मनुही - " ह्या सांगितलेल्या महर्षींच्या आचरणांतून कोणत्याही एका आचरणानें देहाचा त्याग करणारा ब्राह्मण शोकभयरहित होऊन ब्रह्मत्व पावतो . " हा प्रकार वानप्रस्थाला सांगितला आहे , त्यावरुन प्रयागातिरिक्त ठिकाणीं देखील मरणाविषयीं अनुज्ञा वानप्रस्थालाच आहे . कारण , त्या वचनांनीं सांगितलेल्या व यानें सांगितलेल्या तनुत्यागाचें मूल एक आहे , असें केचित् म्हणतात . तें बरोबर नाहीं . कारण , वानप्रस्थ मृत असतां आशौचाचा निषेध आहे . तेणेंकरुन गृहस्थादिविषयकच हें मरण आहे . म्हणून ह्या मरणाविषयीं संन्याशाला अधिकार नाहीं . आणि काम्यकर्माविषयीं संन्याशाला अधिकारही नाहीं . हें मरण काम्य नसून नैमित्तिक ( रोगादिनिमित्तानें ) आहे , असें म्हटलें तर केलें नाहीं म्हणजे दोष प्राप्त होईल आणि नित्यही होईल . प्रयागांत मरण्याविषयीं तर रोगरहितांना व रोग्यांनाही अधिकार आहे . आतां जें " शूद्र , क्षत्रिय , वैश्य , अंत्यज , तसेच अधम यांनीं प्राणत्याग करावा . ब्राह्मणानें करुं नये . तेथें उदकांत ब्राह्मण पडेल तर ब्रह्महत्यारी व आत्महत्यारी होईल " असें वचन तें निर्मूल आहे , असें भट्ट सांगतात . खरा प्रकार म्हटला म्हणजे हेमाद्रींत व्रतकांडांत हें वचन लिहिलेलें असल्यामुळें निर्मूल म्हणणें चिंत्य ( हेतुशून्य ) आहे . पूर्वींच्या उपक्रमावरुन ‘ पतित्वा ’ हें पर्वताच्या पतनस्थानावरुन पडण्याविषयींच आहे , असें म्हणणें युक्त दिसतें . या वचनावरुन प्रयागांत मरण्याविषयीं ब्राह्मणाला अधिकार नाहीं , असें होत नाहीं . आणि तसें मानलें तर ब्राह्मणाला देखील तीर्थाचे ठायीं प्राणमोक्षाची अनुज्ञा आहे " ह्या पुढें सांगावयाच्या विवस्वानाच्या वचनाशीं विरोधही येतो . आतां जें आदित्यपुराणांत - " ब्राह्मणभिन्न असेल त्यानें स्वर्गादिक मोठ्या फलाच्या इच्छेनें अग्निप्रवेश किंवा उदकप्रवेश करावा . तसेंच अनशन ( उपवास ) करावें " या वचनानें ब्राह्मणाला उदकप्रवेश वर्ज्य केला आहे . तो प्रयागातिरिक्तविषयक आहे , असें केचित् म्हणतात . हेमाद्रींत तर - या वचनाच्या पुढें ‘ प्रयागांतील वटाच्या शाखाग्रावरुन देहत्याग करितो ’ असें सांगितल्यावरुन करणारा वरील वचनांतील अब्राह्मण , असें झाल्यानें प्रयागांतदेखील ब्राह्मणाला अधिकार नाहीं असें प्रतीतीस येतें .
माधवीयेपरार्केचादित्यपुराणे दुश्चिकित्स्यैर्महारोगैः पीडितस्तुपुमानपि प्रविशेज्ज्वलनंदीप्तंकरोत्यनशनंतथा अगाधतोयराशिंचभृगोः पतनमेवच गच्छेन्महापथंवापितुषारगिरिमादरात् प्रयागवटशाखाग्राद्देहत्यागंकरोतिच स्वयंदेहविनाशस्यकालेप्राप्तेमहामतिः उत्तमान्प्राप्नुयाल्लोकान्नत्मघातीभवेत् क्वचित् महापापक्षयात्स्वर्गेदिव्यान्भोगान्समश्नुते एतेषामधिकारस्तुसर्वेषांसर्वजंतुषु नराणामथनारीणांसर्ववर्णेषुसर्वदा ईदृशंमरणंयेषांजीवतांकुत्रचिद्भवेत् आशौचंस्यात्र्यहंतेषांवज्रानलहतेतथा वाराणस्यांम्रियेद्यस्तुप्रत्याख्यात भिषक्क्र्रियः काष्ठपाषाणमध्यस्थोजाह्नवीजलमध्यगः अविमुक्तोन्मुखस्तस्यकर्णमूलगतोहरः प्रणवंतारकंब्रूते नान्यथाकुत्रचित् क्वचित् हेमाद्रौचैवं अत्रप्राप्तेकालेइत्युक्तेरप्राप्तमरणकालायाः स्त्रियाः अन्वारोहणेसंपूर्णमेवाशौचं पृथ्वीचंद्रस्त्वत्रापित्र्यहमाह शुद्धितत्त्वादिगौडग्रंथेष्वप्येवम् ।
माधवीयांत व अपरार्कांत आदित्यपुराणांत - " अत्यंत कष्टसाध्य किंवा असाध्य महारोगांनीं पीडलेला पुरुषही प्रदीप्त अग्नीमध्यें प्रवेश करितो ; अनशन ( उपवास ) करितो ; मोठ्या डोहांत उडी घेतो ; पर्वतावरुन उडी घेतो ; अथवा हिमाचलाच्या मोठ्या ( ऋषि इत्यादिकांनीं सेवित ) अशा मार्गास जातो ; मरणसमय प्राप्त असतां प्रयागांतील वटाच्या शाखाग्रावरुन स्वतः देहत्याग करितो , त्याला उत्तम लोक प्राप्त होतात . तो आत्मघातकी कधींही होत नाहीं . महापातकाचा क्षय होऊन स्वर्गामध्यें त्याला दिव्यभोग प्राप्त होतात . ह्या वर सांगितलेल्या मरणांचा अधिकार सर्व प्राण्यांना आणि सर्व वर्णांच्या पुरुषांना व स्त्रियांना सर्वकाल आहे . अशा प्रकारचें मरण कोणत्याही ठिकाणीं ज्या मनुष्यांना प्राप्त होईल त्यांचें आशौच तीन दिवस होतें . तसेंच विजेच्या अग्नीनें मृत असतां समजावें . वैद्यांनीं सोडलेला असा जो मनुष्य वाराणसीमध्यें काष्ठ व पाषाण यांच्या मध्यभागीं भागीरथीच्या उदकामध्यें जाऊन मृत होईल त्याच्या कानाजवळ भगवान् शंकर जाऊन तारक प्रणवाचा उपदेश करितो . इतर ठिकाणीं कोठेंही तारकप्रणवाचा उपदेश नाहीं . " हेमाद्रींतही असेंच सांगितलें आहे . येथें वरील वचनांत ‘ मरणसमय प्राप्त असतां ’ असें म्हटलें आहे , म्हणून स्त्रियेचा मरणकाल प्राप्त नसून तिनें पतीच्या मागाहून अन्वारोहण ( अनुगमन ) केलें असतां तिचें संपूर्णच आशौच करावें . पृथ्वीचंद्र तर अनुगमनांतही तीन दिवस आशौच सांगतो , शुद्धितत्त्व इत्यादिक गौडग्रंथांतही असेंच सांगितलें आहे .
एतच्चवृद्धादिमरणंकलौनिषिद्धं भृग्वग्निपतनैश्चैववृद्धादिमरणंतथेति माधवेनपृथ्वीचंद्रेणचकलिवर्ज्येषूक्तेः नचात्रयावदुक्तनिषेधः विशिष्टोद्देशेवाक्यभेदात् नचकलौवानप्रस्थाश्रमनिषेधादेवसिद्धेर्मरणनिषेधोव्यर्थइतिवाच्यं सर्ववर्णेष्वित्यादिभिस्तद्भिन्नस्यापिप्राप्तेः काम्यंभवत्येव येवैतन्वंविसृजंतीतिश्रुतेः स्मृत्यासंकोचायोगात् नचेयंस्वाभाविकमृत्युपरा धीरपदोक्तेः मात्स्यभारतादिषु नलोकवचनात्तातनवेदवचनादपि मतिरुत्क्रमणीयातेप्रयागमरणंप्रतीत्युक्तेः अतएवविष्णुधर्मेरोग्यादिमरणमुक्त्वोक्तं यथायुगानुसारेणसंत्यजेदात्मनस्तुनुमितिकाश्यामप्युक्तं मात्स्ये अग्निप्रवेशंयेकुर्युरविमुक्तेविधानतः प्रविशंतिमुखंतेमेनिः संदिग्धंवरानने हेमाद्रौविवस्वान् सर्वेंद्रियवियुक्तस्यस्वव्यापाराक्षमस्यच प्रायश्चित्तमनुज्ञातमग्निपातोमहापथः धर्मार्जनासमर्थस्यकर्तुः पापांकितस्यच ब्राह्मणस्याप्यनुज्ञातंतीर्थेप्राणविमोक्षणं अपरार्केचैवं सहगमनंकलौभवत्येव कलौनान्यागतिः स्त्रीणांसहानुगमनादृतइतिब्रह्मवैवर्तात् एतेनमरणांतिकप्रायश्चित्तं काशीखंडादौ चातुर्वर्ण्यस्यतनुत्यागविधयश्चयुगांतरपराएव ।
हें वर मनु व वृद्धगार्ग्य इत्यादिकांनीं सांगितलेलें वृद्धादिमरण कलियुगांत निषिद्ध आहे . कारण , " भृगुवरुन ( पर्वताच्या कड्यावरुन ) उडी घेणें , अग्नींत उडी टाकणें या कर्मांनीं सांगितलेलें वृद्धादिमरण तसेंच म्हणजे कलियुगांत निषिद्ध आहे " असें माधवानें व पृथ्वीचंद्रानें कलिवर्ज्यांत सांगितलें आहे . आतां असें कीं , त्या वचनांत भृगुपतन व अग्निपतन यांनीं सांगितलेलें जें वृद्धादिमरण तें कलियुगांत निषिद्ध , असें सांगितल्यामुळें तितक्याचाच निषेध , इतर वृद्धादिमरणाचा निषेध नाहीं , असें म्हणूं ? तर असें म्हणतां येत नाहीं . कारण , भृगु - अग्निपतनविशिष्ट ( युक्त ) वृद्धादिमरणाचा उद्देश करुन निषेधाचें विधान केलें असतां वाक्यभेदरुप दोष येतो , तो असा - भृग्वग्निपतनांनीं वृद्धादिमरण सांगितलें आहे , तें कलींत निषिद्ध आहे , अशीं दोन वाक्यें होतात . आतां असें म्हणूं कीं , कलींत वानप्रस्थाश्रमाचा निषेध असल्यामुळेंच मरणाचा निषेध सिद्ध असून पुनः मरणाचा निषेध निराळा सांगितला तो व्यर्थ आहे ? तर असें म्हणतां येणार नाहीं . कारण , ‘ सर्ववर्णेषु सर्वदा ’ इत्यादि वचनांनीं वानप्रस्थाश्रमरहिताला देखील वृद्धादिमरण प्राप्त आहे , म्हणून त्याचा निराळा निषेध केला आहे . कामनिक मरण होतच आहे . कारण , ‘ ये वै तन्वं १ विसृजंति धीराः ’ अशी श्रुति आहे . अर्थ - भागीरथी व यमुना या दोन नद्यांचा संगम ज्या ठिकाणीं होतो , तेथें स्नान करणारे स्वर्गास जातात . व जे धीर मनुष्य तेथें देहत्याग करितात ते मोक्षास जातात . श्रुति स्मृतीपेक्षां प्रबळ असल्यामुळें या श्रुतीचा कलींत देहत्यागनिषेधक स्मृतीनें संकोच ( म्हणजे श्रुति कलिव्यतिरिक्त विषयक आहे असा ) करितां येत नाहीं . आतां ही श्रुति प्रयागाचेठायीं ज्याला स्वाभाविक ( बुद्धिपूर्वक नव्हे ) मृत्यु प्राप्त असेल त्याविषयीं आहे ? असें म्हणतां येत नाहीं . कारण , श्रुतीमध्यें ‘ धीराः ’ ह्म० मरणाविषयीं न भिणारे , असें पद आहे . स्वाभाविक मृत्यूविषयीं हें पद लागत नाहीं . मत्स्यपुराण , भारत इत्यादिकांत सांगतो - " कोणी एक मनुष्य दुसर्याला म्हणतो - प्रयागमरणाविषयीं जी तुझी बुद्धि झाली आहे ती लोकांच्या सांगण्यावरुन नाहीं आणि वेदवचनावरुनही झालेली नाहीं " असें सांगितलें आहे . कामनिक मरणाचा कलींत निषेध नाहीं म्हणूनच विष्णुधर्मांत - रोगी इत्यादिकांचें मरण सांगून पुढें सांगितलें कीं , " जसें ज्या युगांत सांगितलें आहे त्याप्रमाणें आपल्या तनूचा त्याग करावा " या वचनानें काशींतही मरण सांगितलें आहे . मात्स्यांत - " शिव म्हणतात - अविमुक्तक्षेत्रांत जे विधीनें अग्निप्रवेश करितील ते माझ्या मुखांत प्रवेश करितील , यांत संदेह नाहीं . " हेमाद्रींत विवस्वान् - " ज्याचीं सारीं इंद्रियें पराधीन होऊन आपल्या ( देहाच्या ) व्यापाराविषयीं असमर्थ असेल त्याला प्रायश्चित्त अग्नींत प्रवेश हा मोठा मार्ग शास्त्रानें सांगितला आहे . पापयुक्त असून धर्मसंपादन करण्याविषयीं असमर्थ अशा ब्राह्मणालाही तीर्थांत प्राणत्यागाची शास्त्रानें अनुज्ञा दिली आहे . " अपरार्कांतही असेंच आहे . स्त्रियांना सहगमन कलियुगांत होतच आहे . कारण , " कलियुगांत स्त्रियांना सहगमनावांचून दुसरी गति नाहीं . " असें ब्रह्मवैवर्तवचन आहे . यावरुन मरणांतिक प्रायश्चित्त सांगितलेलें तें आणि काशीखंडादिग्रंथांत चारही वर्णांना देहत्यागाचे सांगितलेले विधि ते सारे इतर युगांविषयीं समजावे .
प्रयागेपित्रिस्थलीसेतौस्कांदे यथाकथंचित्तीर्थेस्मिन्प्राणत्यागंकरोतियः तस्यात्मघातदोषोनप्राप्नुयादीप्सितान्यपि पाद्मेविष्णुः देहत्यागंतथाधीराः कुर्वंतिममसन्निधौ मत्तनुंप्रविशंत्येवनपुनर्जन्मनेनराः कौर्मे व्याधितोयदिवादीनः क्रुद्धोवापिभवेन्नरः गंगायमुनमासाद्ययस्तुप्राणान्परित्यजेत् ईप्सिताँल्लभतेकामान्वदंतिमुनिपुंगवाः तथा यागतिर्योगयुक्तस्यसत्त्वस्थस्यमनीषिणः सागतिस्त्यजतः प्राणान्गंगायमुनसंगमे वाराहे तत्रयोमुंचतिप्राणान्वटमूलेषुसुंदरि सर्वलोकानतिक्रम्यममलोकंप्रपद्यते तथा अकामोवासकामोवावटमूलेषुसुंदरि शीघ्रंप्राणान्प्रमुंचेतयदीच्छेत्परमांगतिं तथा पंचयोजनविस्तीर्णेप्रयागस्यतुमंडले व्यतीतान्पुरुषान्सप्तभविष्यांश्चचतुर्दश नरस्तारयतेसर्वान्यस्तुप्राणान्परित्यजेत् ब्राह्मे ध्यात्वाविष्णुपदांभोजंप्रयागेविष्णुतत्परः तनुंत्यजतिवैमाघेतस्यमुक्तिर्नसंशयः दुष्कृतोपिदुराचारोब्रह्महत्यादिपातकी हरिंध्यात्वात्यजेद्देहंप्रायशोमुक्तिमान्भवेत् भविष्योत्तरे समाः सहस्त्राणितुसप्तवैजलेदशैकमग्नौपतनेचषोडश महाहवेषष्टिरशीतिगोग्रहेअनाशकेभारतचाक्षयागतिः इतिसामान्यतोपिफलं एवमन्येपिविधयोज्ञेयाः यत्तुगौडाः प्रयागादिमरणंब्राह्मणभिन्नविषयमित्याहुस्तद्दूषणंपितामहचरणैः प्रयागविधौकृतमितिनात्रोच्यते ।
प्रयागांत कामनिकमात्र कलींत होतें असें सांगतो त्रिस्थलीसेतूंत स्कांदांत - " ह्या प्रयागतीर्थांत कसाही जो प्राणत्याग करितो त्याला आत्मघाताचा दोष नाहीं व तो ईप्सितफलें पावतो . " पद्मपुराणांत विष्णु - " माझ्या संनिध जे धीर मनुष्य देहत्याग करितात ते माझ्या देहांत प्रवेश करितातच . त्यांना पुनर्जन्म प्राप्त होत नाहीं . " कौर्मांत - " व्याधिष्ठ अथवा दीन किंवा क्रुद्ध झालेला जो मनुष्य गंगा व यमुना यांच्या संगमाजवळ येऊन प्राणत्याग करील त्याचे अभीष्ट मनोरथ पूर्ण होतील , असें ऋषिश्रेष्ठ सांगतात . " तसेंच " विद्वान् सत्त्वस्थ योग्याला जी गति प्राप्त होते ती गति गंगा व यमुना नदीच्या संगमांत प्राणत्याग करणाराला प्राप्त होते . " वाराहांत - " तेथें वटमूलाचेठायीं जो प्राणांचा त्याग करितो तो सर्व लोकांचा अतिक्रम करुन माझा लोकास प्राप्त होतो . " तसेंच - " अकाम असो किंवा सकाम असो जर परमगतीची इच्छा करील तर वटमूलांचे ठायीं शीघ्र प्राणत्याग करावा . प्रयागाच्या पांच योजनें विस्तीर्ण अशा मंडलामध्यें जो प्राणांचा परित्याग करील तो मनुष्य पूर्वींच्या सात पुरुषांना व पुढच्या चवदा पुरुषांना तारितो . " ब्राह्मांत - " जो विष्णुतत्पर मनुष्य विष्णूच्या चरणकमलाचें ध्यान करुन माघमासीं प्रयागाचे ठायीं देहाचा त्याग करितो त्याला मुक्ति होते , यांत संशय नाहीं . दुष्ट कर्म करणारा दुराचारी ब्रह्महत्या इत्यादि महापातक करणाराही मनुष्य हरीचें ध्यान करुन देहत्याग करील त्याला फारकरुन मुक्ति प्राप्त होईल . " भविष्योत्तरपुराणांत - " उदकांत देहत्याग करणाराला सात हजार वर्षैपर्यंत उत्तम गति होते . अग्नींत देहत्याग करणाराला अकरा हजार वर्षै गति होते . भृगुपात करणाराला सोळा हजार वर्षै गति होते . मोठ्या युद्धांत देहत्याग करणाराला साठ हजार वर्षै गति होते . गाईच्या ग्रहणनिमित्तक युद्धांत प्राणत्याग करणाराला ऐशीं हजार वर्षै गति होते . अनाशकक्षेत्रांत देहत्याग करणाराला अक्षय गति होते . " असें सामान्यतः ही प्राणत्यागाला फल सांगितलें आहे . याप्रमाणें इतरही प्राणत्यागविधि जाणावे . आतां जें गौड - प्रयागादिकांचे ठायीं मरण सांगितलें तें ब्राह्मणांहून इतरविषयक आहे , असें सांगतात , त्याचें दूषण आमच्या पितामहांनीं ( नारायणभट्टांनीं ) प्रयागविधींत केलें आहे , म्हणून येथें सांगत नाहीं .
अत्रदशाहमाशौचं त्रिरात्रस्यप्राप्तकालगोचरत्वादितिभट्टाः युक्तंतुत्रिरात्रं दिवोदासीयेप्येवं शुद्धितत्त्वेपिकाश्यपः अनशनमृतानामशनिहतानामग्निजलप्रविष्टानांभृगुसंग्रामदेशांतरमृतानांजातदंतानांचत्रिरात्रमिति एवंमरणांतप्रायश्चित्तेपि पूर्वोक्तश्चात्महादेर्दाहाशौचादिनिषेधस्तदानीमेव वत्सरांतेतु सर्वमौर्ध्वदेहिकंकुर्यात् गोब्राह्मणहतानांचपतितानांतथैवच ऊर्ध्वंसंवत्सरात्कुर्यात्सर्वमेवौर्ध्वदेहिकमिति हेमाद्रौषटत्रिंशन्मतात् एवंम्लेच्छीकृतानामपिगयाश्राद्धमपिकार्यं ब्रह्महाचकृतघ्नश्चगोघातीपंचपातकी सर्वेतेनिष्कृतिंयांतिगयायांपिंडपातनादित्यग्निपुराणात् एवंब्राह्मेपि क्रियतेपतितानांतुगतेसंवत्सरे क्वचित् देशधर्मप्रमाणत्वाद्गयाकूपेस्वबंधूभिः मार्तंडपादमूलेवाश्राद्धंहरिहरौस्मरन् सूर्यपदइत्यर्थः ।
ह्या शास्त्रविहित मरणाचेठायीं सपिंडांनीं दहा दिवस आशौच धरावें . कारण , पूर्वीं त्रिरात्र आशौच सांगितलें तें ज्याला मरणसमय प्राप्त असून मृत असेल तद्विषयक आहे , असें भट्ट सांगतात . योग्य म्हटलें म्हणजे त्रिरात्र आशौच करावें . दिवोदासीयांतही असेंच आहे . शुद्धितत्त्वांतही काश्यप - " अनशन ( उपवास ) करुन मृतांचें ; विजेनें मृतांचें ; अग्नींत व उदकांत प्रवेश करणारांचें ; भृगुपतन , युद्ध , परदेश यांचेठायीं मृतांचें ; आणि ज्या मुलांना दंत उत्पन्न झाले आहेत त्यांचें त्रिरात्र आशौच करावें . " मरणांत प्रायश्चित्तांतही असेंच समजावें . आत्मघातकी , पतित इत्यादि मनुष्यांचा दाह , आशौच वगैरे करुं नये , ह्मणून जो पूर्वीं निषेध सांगितला तो त्या वेळींच समजावा . एक वर्ष झाल्यावर त्या मृतांचें सारें और्ध्वदेहिक ( अंत्यकर्म ) करावें . कारण , " गाई , ब्राह्मण यांनीं मारलेले , व पतित यांचें सर्व और्ध्वदेहिक कर्म एक वर्ष गेल्यावर करावें " असें हेमाद्रींत षटत्रिंशन्मतवचन आहे . बाटून म्लेच्छ केलेल्यांचेंही असेंच समजावें . वर सांगितलेल्या आत्मघातक्यादिकांचें गयाश्राद्धही करावें . कारण , " ब्रह्महत्या करणारा , कृतघ्न , गोहत्या करणारा , पंचमहापातकी यांच्या नांवानें गयेंत पिंडप्रदान केल्यानें ते सारे पातकरहित होतात " असें आदित्यपुराणवचन आहे . असें ब्राह्मांतही सांगतो - " पतितांचें मरुन संवत्सर गेलें असतां क्वचित् कालीं देशधर्मप्रमाण मानून मृताचे बंधु गयाकूपाचे ठायीं किंवा सूर्यपदाचे ठायीं हरिहरांचें स्मरण करुन श्राद्ध करितात . "
तत्रवर्षमध्येकृत्यमुक्तमपरार्केवायुपुराणे शुक्लपक्षेतुद्वादश्यांकुर्याच्छ्राद्धंतुवत्सरं द्वादशाहानिवाकुर्याच्छुक्लेचप्रथमेहनि छागलेयः नारायणबलिः कार्योलोकगर्हाभयान्नरैः तथातेषांभवेच्छौचंनान्यथेत्यब्रवीद्यमः व्यासः नारायणंसमुद्दिश्यशिवंवायत्प्रदीयते तस्यशुद्धिकरंकर्मतद्भवेन्नैतदन्यथेति सचात्मघातादि प्रायश्चित्तंकृत्वाकार्यः तदुक्तंहेमाद्रौषटत्रिंशन्मते कृत्वाचांद्रायणंपूर्वंक्रियाकार्यायथाविधि नारायणबलिः कार्योलोकगर्हाभयान्नरैः पिडोदकक्रियाः पश्चाद्वृषोत्सर्गादिकंचयत् एकोद्दिष्टानिकुर्वीतसपिंडीकरणंतथा दिवोदासीयेवृद्धशातातपस्तु पतितेचमृतेशुद्ध्यैप्राजापत्यांस्तुषोडश मृतेचापत्यरहितेकृच्छ्राणांनवतिंचरेदित्याह इदंप्रायश्चित्तार्हपित्रादिविषयं इंद्रियैरपरित्यक्तायेचमूढाविषादिनः घातयंतिस्वमात्मानंचांडालादिहताश्चये तेषांपुत्राश्चपौत्राश्चदययासमभिप्लुताः यथाश्राद्धंप्रतन्वंतिविष्णुनामप्रतिष्ठितं तथातेसंप्रवक्ष्यामिनमस्कृत्यस्वयंभुवइतिहेमाद्रौतेनैवोक्तेः तत्रैवबौधायनोपि नारायणबलिंव्याख्यास्यामः [ चंडालादुदकात्सर्पाद्ब्राह्मणाद्वैद्युतादपिज । दंष्ट्रिभ्यश्चपशुभ्यश्चमरणंपापकर्मणां । विषशस्त्ररज्जुपाषाणाद्देशांतरमृतेवा ] अभिशस्तपतितसुरापात्मत्यागिनांब्राह्मणहतानांचद्वादशवर्षाणित्रीणिवाकुर्वीतेति ।
जलादिमृत इत्यादिकांविषयीं तेथें वर्षामध्यें कृत्य सांगतो अपरार्कांत वायुपुराणांत - " संवत्सरपर्यंत शुक्लपक्षांत द्वादशीस श्राद्ध करावें . अथवा शुक्लपक्षाच्या प्रथम दिवशीं बारा दिवसांचें कृत्य करावें . " छागलेय - " लोकापवादाच्या भीतीनें मनुष्यांनीं नारायणबलि करावा . तसें केलें असतां त्यांची शुद्धता होते , अन्यथा शुद्धि होत नाहीं , असें यम सांगता झाला . " व्यास - " नारायणाचा उद्देश करुन किंवा शिवाचा उद्देश करुन जें कांहीं कर्म करितो त्याचें तें कर्म शुद्धिकारक होतें . अन्यथा शुद्धिकारक होत नाहीं . " तो नारायणबलि आत्मघातादि प्रायश्चित्त करुन नंतर करावा . तें सांगतो हेमाद्रींत षटत्रिंशन्मतांत - " पूर्वीं चांद्रायण करुन नंतर यथाविधि क्रिया करावी . लोकनिंदेच्या भयानें मनुष्यांनीं नारायणबलि करावा . नंतर पिंडदान , उदकदान इत्यादि क्रिया , वृषोत्सर्गादिकर्म , एकोद्दिष्टें , आणि सपिंडीकरण हीं करावीं . " दिवोदासीयांत वृद्धशातातप तर - पतित मृत असतां त्याच्या शुद्धीकरितां सोळा प्राजापत्यकृच्छ्र करावे . अपत्यरहित मृत असतां नव्वद कृच्छ्र करावे " असें सांगतो . हें प्रायश्चित्त प्रायश्चित्ताला योग्य असा जो पिता इत्यादिक मृत असेल तद्विषयक आहे . कारण , " जे मूढ इंद्रियांनीं पराधीन झालेले नसून विषादिकेंकरुन आपल्या देहाचा घात करितात व जे चांडालादिकांनीं मारले जातात त्यांचे पुत्र किंवा पौत्र दयायुक्त होऊन विष्णुनामयुक्त ज्या विधीनें श्राद्ध करितात तो विधि ब्रह्मदेवाला नमस्कार करुन तुला सांगतों . " असें हेमाद्रींत त्यानेंच सांगितलें आहे . तेथेंच बौधायनही - " नारायणबलि सांगतो - अभिशस्त ( लोकापवादानें दूषित ), पतित , सुरापी , आत्महत्यारी , आणि ब्राह्मणांनीं मारलेला यांचें द्वादश वर्षै किंवा तीन वर्षै प्रायश्चित्त करुन तो करावा . "
गृह्यपरिशिष्टेतु चंडालादित्याद्युक्त्वा दग्ध्वाशरीरंप्रेतस्यसंस्थाप्यास्थीनियत्नतः प्रायश्चित्तंतुकर्तव्यं पुत्रैश्चांद्रायणत्रयमित्युक्तं मदनरत्नेब्राह्मे प्रमादादपिनिः शंकस्त्वकस्माद्विधिचोदितः चांडालैर्ब्राह्मणैश्चौरैर्निहतोयत्रकुत्रचित् तस्यदाहादिकंकार्यंयस्मान्नपतितस्तुसः चांद्रायणंतप्तकृच्छ्रद्वयंतस्यविशुद्धये यद्वाकृच्छ्रान्पंचदशकृत्वातुविधिनादहेत् बुद्धिपूर्वमृतानांतुत्रिंशत्कृच्छ्रंसमाचरेदित्युक्तं स्मृतिरत्नावल्यांतु द्विगुणं प्रायश्चित्तंकृत्वार्वागप्यब्दात्सर्वंकार्यमित्युक्तं आत्मनोघातशुद्ध्यर्थंचरेच्चांद्रायणद्वयं तप्तकृच्छ्रचतुष्कंचत्रिंशत्कृच्छ्राणिवापुनः अर्वाक्संवत्सरात्कुर्याद्दहनादियथोदितं कृत्वानारायणबलिमनित्यत्वात्तदायुषइति इदंचात्मवधनिमित्तंतज्जातिवधप्रायश्चित्तेनसमुच्चितंकार्यं अतएवबौधायनेनोक्तं द्वादशवर्षाणित्रीणिवेति मदनपारिजातेस्मृत्यर्थसारेच ब्रह्महादीनांतद्योग्यंप्रायश्चित्तंकृत्वानारायणबलिः कार्यइत्युक्तं एवंम्लेच्छीकृतानामपि यत्तुकश्चिदाह पुत्रकृतेनप्रायश्चित्तेनपितुः पापनाशेमानाभावः आत्मघातेतुवचनादस्तु महापातकेतुकस्थंस्यादिति सः स्वयमेवात्मवधप्रायश्चित्तस्यजातिवधनिमित्तेनसमुच्चयंवदन्ह्रदयशून्यएव नहिजातिवधनिमित्तंपुत्रैः कार्यमितिवचनमस्ति पुत्रकर्तृकसर्वप्रायश्चित्तादिविप्लवापत्तेः प्रागुक्तबौधायनवचनाच्चेतिदिक् इदंप्रायश्चित्तार्हाणामेव प्रायश्चित्तानर्हाणांतुपतितोदकमात्रंकार्यमितिकेचित् मदनपारिजातादिस्वरसोप्येवं वस्तुतस्तुतदर्हानर्हयोर्वचनेनुपादानादविशेषा तत्रापिनारायणबलिर्गयाश्राद्धंचेतियुक्तम् ।
गृह्यपरिशिष्टांत तर - ‘ चंडालादुदकात् ’ इत्यादिक सांगून - " प्रेताचें शरीर जाळून त्याच्या अस्थि प्रयत्नानें ठेऊन पुत्रांनीं तीन चांद्रायणें प्रायश्चित्त करावें , " असें सांगितलें आहे . मदनरत्नांत ब्राह्मांत - " प्रमादानें अथवा निः शंकपणानें अकस्मात् दैवानें प्रेरित होऊन चांडालांनीं , ब्राह्मणांनीं अथवा चोरांनीं कोठेंही मारला जाईल त्याचें दाहादिकर्म करावें ; कारण , तो पतित नाहीं . त्याच्या शुद्धीकरितां चांद्रायण व दोन तप्तकृच्छ्रें करावीं अथवा पंधरा कृच्छ्र करुन यथाविधि दाह करावा . बुद्धिपूर्वक मृतांचे तीस कृच्छ्र करावे " असें सांगितलें आहे . स्मृतिरत्नावलींत तर - दुप्पट प्रायश्चित्त करुन प्रथम वर्षाच्या आंत देखील सारें कर्म करावें , असें सांगितलें आहे . तें असें - " आत्महत्येची शुद्धि होण्याकरितां दोन चांद्रायणें आणि चार तप्तकृच्छ्रें अथवा तीस कृच्छ्रें करुन संवत्सराच्या आंत नारायणबलि करुन यथोक्त दाहादिकर्म करावें . कारण , कर्त्याचें आयुष्य अनित्य आहे . " हें आत्महत्यानिमित्तक प्रायश्चित्त व जातिवधनिमित्तक प्रायश्चित्त अशीं मिळून दोन करावीं . ’ म्हणूनच वर सांगितलेल्या वचनांत द्वादशवर्षै किंवा तीन वर्षै , असें बौधायनानें सांगितलें आहे . मदनपारिजातांत व स्मृत्यर्थसारांत - ब्रह्महत्यादिकरणारांचें त्या पापाला योग्य प्रायश्चित्त करुन नारायणबलि करावा , असें सांगितलें आहे . बाटवून म्लेच्छ केलेल्या मनुष्यांचेंही असेंच समजावें . आताम जें कोणीएक सांगतो कीं , ‘ पुत्रानें केलेल्या प्रायश्चित्तानें पित्याच्या पापाचा नाश होण्याविषयीं प्रमाण नाहीं . आत्मघाताविषयीं तर पुत्रानें केलेल्या प्रायश्चित्तानें पित्रादिकांच्या पापाचा नाश , वर सांगितलेल्यावचनावरुन असो . परंतु महापातकाविषयीं नाश कसा होईल ? असें म्हणणारा तो स्वतःच आत्मवध प्रायश्चित्त व जातिवधप्रायश्चित्त हीं दोन समुच्चयानें करावीं , असें सांगणारा असल्यामुळें त्याचें अंतः करणच ठिकाणावर नाहीं , असें समजलें पाहिजे . जातिवधनिमित्तक पुत्रांनीं करावें , असें वचन आहे काय ? नाहीं . मग असें म्हटलें तर पुत्रांनीं करावयाच्या सर्व प्रायश्चित्तादिकांचा विप्ल्व ( विनाश ) प्राप्त होईल ! आणि महापातकादिविषयीं वर सांगितलेलें बौधायनवचनही आहे . ही दिशा दाखविली आहे . हा सर्व प्रकार प्रायश्चित्ताला योग्य असतील त्यांनाच समजावा . प्रायश्चित्ताला योग्य नसतील त्यांना तर पतितोदक मात्र करावें ; असें केचित् म्हणतात . मदनपारिजात इत्यादि ग्रंथांचें स्वारस्यही असेंच आहे . वास्तविक म्हटलें तर प्रायश्चित्ताला योग्य व अयोग्य असें वचनांत विशेष नसल्यामुळें प्रायश्चित्ताला अयोग्य मृत असतील त्यांविषयीं देखील नारायणबलि व गयाश्राद्ध करावें , हें युक्त आहे .
पतितोदकविधिस्तु पित्राद्यतिरिक्तविषयइत्यपरे सयथाहेमाद्रौब्राह्मे पतितस्यतुकारुण्याद्यस्तृप्तिंकर्तृमिच्छति सहिदासींसमाहूयसर्वगांदत्तवेतनां अशुद्धघटहस्तांतांयथावृत्तंब्रवीत्यपि हेदासिगच्छमूल्येनतिलानानयसत्वरं तोयपूर्णंघटंचेमंसतिलंदक्षिणामुखी उपविष्टातुवामेनचरणेनततः क्षिप कीर्तयेः पातकीसंज्ञांत्वं पिबेतिमुहुर्वदेः निशम्यतस्यवाक्यंसालब्धमूल्याकरोतितत् एवंकृतेभवेत्तृप्तिः पतितानांचनान्यथेति इदंचमृताहेकार्यं पतितस्यदासीमृताह्नियदाघटमपवर्जयेदेतावतायमुपचरितोभवतीतिमदनरत्नेविष्णूक्तेः इदं चात्मत्यागिविषयं आत्मत्यागिनः पतितास्तेनाशौचोदकभाजः स्युरित्युपक्रम्यविष्णुनाएतस्याभिधानादिति गौडाः यत्तुकश्चिदाह यः पतितोघटस्फोटेनबांधवैर्बहिष्कृतस्तद्विषयाणिक्रियानिषेधवाक्यानि जीवत्येवतस्मिन्नंत्यकर्मणः कृतत्वात्तत्पुनः करणाभावादिति स बंधुत्यागेनजातवैराग्यस्यकृतप्रायश्चित्तस्याप्यकरणापत्तेर्मिताक्षरादिविरोधमपश्यन्मूर्खइत्युपेक्षणीयः नचकृतघटस्फोटस्यसंग्रहविधिर्नेतिवाच्यं मनुनाकृतघटस्फोटस्यत्यागमुक्त्वा प्रायश्चित्तेतुचरितेपूर्णंकुंभमपांनवं तेनैवसार्धंप्रास्येयुः स्नात्वापुण्येजलाशयइत्युक्तेः अन्यथाप्रायश्चित्तमात्रेएतत्प्रसंगात् अतोघटस्फोटेनबहिष्कृतस्यापिपित्रादेरब्दांतेनारायणबलिः निषेधास्तु पितृव्यादिपराइतितत्त्वं केचित्तुनारायणबलौकृतेप्यंत्यकर्मसपिंडनवर्जंकार्यम् गोब्राह्मणहतानांचपतितानांतथैवच व्युत्क्रमाच्चप्रमीतानांनैवकार्यासपिंडतेतिवचनात् ब्राह्मणादिहतेतातेपतितेसंगवर्जितइतिश्राद्धप्रकारोक्तेश्चेत्याहुः तेहेमाद्रिस्थपूर्वोक्तषटत्रिंशन्मतविरोधान्निर्मूलत्वाच्छ्राद्धप्रकारस्यवृद्धिश्राद्धविषयत्वादुपेक्ष्याः ।
पतितोदकाचा विधि तर पिता इत्यादि व्यतिरिक्तविषयक आहे , असें इतर ग्रंथकार सांगतात . तो पतितोदकविधि असा - हेमाद्रींत ब्राह्मांत - " जो मनुष्य दयेच्या योगानें पतिताची तृप्ति करण्याविषयीं इच्छित असेल त्यानें सर्वांशीं गमन करणार्या दासीस बोलावून तिला मूल्य ( मजुरी ) देऊन अशुद्ध घागर तिच्या हातांत देऊन तिला सांगावें कीं , हे दासि , तुला मजुरी देऊन सांगतों तें कर , सत्वर जाऊन तिळ आण आणि ही घागर पाण्यानें भरुन आण नंतर दक्षिणेकडे तोंड करुन बसून डाव्या पायानें तिलसहित ही घागर उपडी कर , व उपडी करतेवेळीं पातक्याचें नांव घेऊन ‘ अमुकसंज्ञक प्रेत पिब पिब ’ असें वारंवार बोल ! याप्रमाणें हें वाक्य तिनें ऐकून मूल्य घेऊन सांगितल्याप्रमाणें तें करावें . असें केलें असतां पतितांची तृप्ति होते . अन्यथा पतितांची तृप्ति होत नाहीं . " हें पतितोदकदान मृतदिवशीं करावें . कारण , " पतिताच्या मृतदिवशीं जेव्हां दासी घट लवंडील तेव्हां तितक्यानें पतित तृप्त झाल्यासारखा होतो " असें मदनरत्नांत विष्णुवचन आहे . हें आत्मघातकीविषयीं आहे ; कारण , " आत्मत्यागी जे पतित त्यांचें आशौच व उदक नाहीं " असा उपक्रम करुन विष्णूनें हें वरील वचन सांगितलें आहे , असें गौड सांगतात . आतां जें कश्चित् ( कोणीएक ) असें सांगतो कीं , ‘ ज्या पतिताला घटस्फोट करुन बांधवांनीं बहिष्कृत केला असेल त्याविषयीं वरील क्रियानिषेधक वाक्यें आहेत . कारण , तो जीवंत असतांच त्याचें अंत्यकर्म केलेलें असल्यामुळें पुनः अंत्यकर्म करण्याचें कारण नाहीं ’ तो मूर्ख आहे . कारण , घटस्फोट करुन आप्तांनीं त्याग केल्यामुळें वैराग्य उत्पन्न होऊन ज्यानें प्रायश्चित्त केलें असेल त्याचेंही अंत्यकर्म करावयास नको , असें प्राप्त झाल्यानें मिताक्षरादि ग्रंथांचा विरोध पहात नसल्यामुळें तो मूर्ख समजून त्याचें मत उपेक्षणीय ( अग्राह्य ) आहे . एकवार अंत्यकर्म करुन घटस्फोट केल्यावर तो पुनः आपल्या जातींत येत नाहीं , म्हणून त्याचें पुनः अंत्यकर्म नको , असें म्हणतां कामा नये ; कारण , मनूनें घटस्फोट केलेल्याचा त्याग ( बहिष्कार ) सांगून नंतर " त्यानें आपल्या पापाचें प्रायश्चित्त केलें असतां त्याच्या बंधूंनीं त्या पाप्यासहवर्तमान पुण्योदकांत स्नान करुन उदकानें भरलेला पूर्ण नवा घट घेऊन सोडावा " असें सांगितलें आहे . हें वचन ज्याचा घटस्फोट केला असेल त्याला जातींत येण्याविषयीं समजलें पाहिजे . असें न समजलें तर सार्या प्रायश्चित्तांत ह्याच्या ( पूर्ण घटोदकत्यागाचा ) प्रसंग येईल . म्हणून घटस्फोट करुन बहिष्कृत केलेल्या देखील पित्रादिकांचा वर्षांतीं नारायणबलि करावा . निषेध तर पितृव्यादिविषयक आहेत , हें तत्त्व समजावें . केचित् ग्रंथकार तर - नारायणबलि केला तरी सपिंडीकरणवर्जित अंत्यकर्म करावें . कारण , " गाई व ब्राह्मण यांनी मारलेल्यांचे , पतितमृतांचें , आणि उलट क्रमानें ( वडील जीवंत असून पुत्र मरणें या क्रमानें ) मृतांचें सपिंडन करुं नये ’ असें वचन आहे . आणि " ब्राह्मणादिकांनीं मारलेला , पतित किंवा सर्वसंग त्याग करणारा असा पिता असतां सपिंडन करु नये . " असें श्राद्धप्रकारवचनही आहे , असें सांगतात . त्यांचें तें मत पूर्वोक्त हेमाद्रींतील षटत्रिंशन्मताशीं विरुद्ध होत असल्यामुळें व मूलरहित असल्यामुळें आणि श्राद्धप्रकार वृद्धिश्राद्धविषयक असल्यामुळें उपेक्षणीय ( अग्राह्य ) आहे .
नारायणबलिस्तुहेमाद्याद्यनुसारेणोच्यते तत्रादौक्रियानिबंधेगारुडेतर्पणमुक्तं कार्यंपुरुषसूक्तेन मंत्रैर्वावैष्णवैरपि दक्षिणाभिमुखोभूत्वाप्रेतंविष्णुमितिस्मरन् अनादिनिधनोदेवः शंखचक्रगदाधरः अक्षय्यः पुंडरीकाक्षः प्रेतमोक्षप्रदोभवेति शुक्लैकादश्यांदेशकालौसंकीर्त्यामुकगोत्रस्यामुकस्यदुर्मरणात्मघातजदोषनाशार्थंऔर्ध्वदेहिकसंप्रदानत्वयोग्यतासिद्धयर्थंनारायणबलिंकरिष्यइतिसंकल्प्य ब्रह्माणंविष्णुंशिवंयमंप्रेतंचपंचकुंभेषु विष्णुः स्वर्णमयः कार्योरुद्रस्ताम्रमयस्तथा ब्रह्मारौप्यमयस्तत्रयमोलोहमयोभवेत् प्रेतोदर्भमयः कार्यइतिदेवप्रकल्पनेतिगारुडोक्तासुसर्वासुहैमीषुवाप्रतिमासुषोडशोपचारैः पुरुषसूक्तेनाभ्यर्च्याग्निंप्रतिष्ठाप्यचरुंपुरुषसूक्तेनप्रत्यृचंनारायणायेदमितिहुत्वादेवानामग्रेदक्षिणाग्रदर्भेषुविष्णुरुपंप्रेतंस्मरन्नामगोत्राभ्यामधुघृततिलयुतान्दशपिंडान्यज्ञोपवीत्येवामुकगोत्रामुकशर्मन्प्रेतविष्णुरुपायंतेपिंडउपतिष्ठतामितिदत्वापुरुषसूक्तेनाभिमंत्र्यतेनैवशंखोदकेनाभिषिच्याभ्यर्च्यामुकशर्माणममुकगोत्रंविष्णुरुपंप्रेतंतर्पयामीतिपुरुषसूक्तेनप्रत्यृचंतर्पयित्वा एकमामान्नंब्रह्मादिपंचभ्योदद्यात् मंत्रस्तु ब्रह्मविष्णुमहादेवायमश्चैवसकिंकरः बलिंगृहीत्वाकुर्वंतुप्रेतस्यचशुभांगतिमिति मिताक्षरायांतुहोमबल्यादिनोक्तं ततः प्रतिदैवतंत्रिविधंफलंशर्करामधुगुडघृतानिचनिवेद्य पिंडानभ्यर्च्यनद्यांक्षिप्त्वारात्रौनवसप्तपंचवाविप्रान्निमंत्र्योपोषितोजागरंकृत्वाश्चोभूतेपुनर्विष्णुंयमंसंपूज्यैकोद्दिष्टविधिनाश्राद्धपंचकंकरिष्येइत्युक्त्वाविष्णुयमप्रेतान्स्मरन्विप्रानुपवेश्यप्रेतस्थानेचैकंविष्णुंस्मरन् पाद्यावाहनार्घ्ययुतंतृप्तिप्रश्नांतंकृत्वोल्लेखनादिकृत्वान्नशेषेणविष्णवेब्रह्मणेशिवाययमायसपरिवारायचतुरः पिंडान्दत्वाप्रेतनामगोत्रेस्मृत्वाविष्णुनाम्नापंचमंदत्वाभ्यर्च्याचांतेभ्योदक्षिणांदत्वैकंप्रेतंस्मृत्वाविशेषतः संतोष्यविप्रैः प्रेतायेदंतिलोदकमुपतिष्ठतामितिसतिलमुदकंदापयित्वाभुंजीतेति अत्रविशेषांतरंभट्टकृतांत्येष्टिपद्धतौज्ञेयं ।
नारायणबलि तर हेमाद्रि इत्यादि ग्रंथांच्या अनुरोधानें सांगतो - त्यांत पूर्वीं क्रियानिबंधांत गरुडपुराणांत तर्पण सांगितलें आहे तें असें - " दक्षिंणाभिमुख होऊन प्रेताला विष्णु असें स्मरुन पुरुषसूक्तानें किंवा विष्णुमंत्रांनींही तर्पण करावें . आणि ‘ अनादिनिधनो देवः शंखचक्रगदाधरः । अक्षय्यः पुंडरीकाक्षः प्रेतमोक्षप्रदो भव ’ हा मंत्र म्हणून पाणी सोडावें . शुक्लपक्षाच्या एकादशीस देशकालांचें संकीर्तन करुन ‘ अमुकगोत्रस्य अमुकस्य० करिष्ये ’ असा संकल्प करुन पांच कुंभांचे ठायीं ब्रह्मा , विष्णु , शिव , यम , प्रेत या पांचांचें आवाहन करावें ; तें असें - " विष्णु सुवर्णाचा , रुद्र ताम्राचा , ब्रह्मा रुप्याचा , यम लोहाचा , व प्रेत दर्भाचा करावा , अशी देवांची कल्पना समजावी . " ह्या गारुडांत सांगितलेल्या प्रतिमांवर किंवा सार्या सोन्याच्या करुन त्यांजवर आवाहनादिषोडशोपचारांनीं पुरुषसूक्तानें पूजा करुन अग्निप्रतिष्ठापन करुन पुरुषसूक्ताच्या प्रत्येक ऋचेनें ‘ नारायणाय इदं ’ असा त्याग करुन चरुचा होम करुन स्थापन केलेल्या देवांच्या अग्रभागीं दक्षिणाग्रदर्भांवर विष्णुरुपी प्रेताचें स्मरण करुन यज्ञोपवीतीनेंच नांव आणि गोत्र यांचा उच्चार करुन मधु घृततिल युक्त दहा पिंड द्यावे ; ते असे - ‘ अमुकगोत्रामुकशर्मन् प्रेत विष्णुरुपायं ते पिंड उपतिष्ठतां ’ असें म्हणून ते पिंड देऊन पुरुषसूक्तानें त्यांचें अभिमंत्रण करुन पुरुषसूक्तानेंच शंखोदकानें अभिषेक करुन पूजा करुन ‘ अमुकशर्माणममुकगोत्रं विष्णुरुपं प्रेतं तर्पयामि ’ असें म्हणून पुरुषसूक्तानें प्रत्येक ऋचेनें तर्पण करुन एक आमान्न ब्रह्मादिक पांचांना द्यावें . त्याचा मंत्र - " ब्रह्मविष्णुमहादेवा यमश्चैव सकिंकरः । बलिं गृहीत्वा कुर्वेतु प्रेतस्य च शुभां गतिं . " मिताक्षरेंत तर - होम , बलि इत्यादिक सांगितलें नाहीं . तदनंतर प्रत्येक देवतेला तीन प्रकारचें फल , शर्करा , मध , गूळ , घृत हीं निवेदन करुन पिंडांची पूजा करुन ते नदींत टाकून त्या रात्रीं नऊ , सात किंवा पांच ब्राह्मणांना दुसर्या दिवसाचें निमंत्रण देऊन उपोषित असून जागरण करुन दुसर्या दिवशीं पुनः विष्णुयमांची पूजा करुन ‘ एकोद्दिष्टविधिना श्राद्धपंचकं करिष्ये ’ असा संकल्प करुन विष्णु , ब्रह्मा , शिव , यम , प्रेत यांचें स्मरण करुन ब्राह्मणांना बसवून प्रेतस्थानीं एक ब्राह्मण विष्णुस्मरण करुन बसवून पाद्य आवाहन - अर्घ्य सहित तृप्तिप्रश्नापर्यंत करुन पिंडांकरितां उल्लखनादिक करुन उरलेल्या शेष अन्नानें विष्णु , ब्रह्मा , शिव , सपरिवार यम यांना चार पिंड देऊन प्रेताचें नांव व गोत्र स्मरण करुन विष्णूचे नांवानें पांचवा पिंड देऊन पूजा करुन ब्राह्मणांनीं आचमन करुन त्यांना दक्षिणा देऊन प्रेतस्थानीं बसलेल्या एका ब्राह्मणाला विशेषेंकरुन संतोष करुन ब्राह्मणांकडून ‘ प्रेताय इदं तिलोदकमुपतिष्ठतां ’ असें म्हणवून तिलसहित उदक देववून नंतर आपण भोजन करावें . यांत इतर विशेष नारायणभट्टांनीं केलेल्या अंत्येष्टिपद्धतींतून जाणावा .
सर्पहतेतुवर्षपर्यंतंपूर्वेऽह्न्येकभक्तपूर्वंशुक्लपंचम्यामुपवासंनक्तंवाकृत्वापिष्टमयंनागमनंतवासुकिशंखपद्मकंबलकर्कोटकाश्वतरधृतराष्ट्रशंखपालकालियतक्षककपिलेतिनामभिः प्रतिमासंसंपूज्यपायसेनविप्रान्संभोज्यवत्सरांतेहैमंनागंगांचदत्वानारायणबलिंकुर्यात् मूलंतुहेमाद्रौज्ञेयं बौधायनसूत्रेसर्पमृतानांनमोस्तुसर्पेभ्यइतितिस्रआहुतीर्हुत्वोदकेमृतानांसमुद्रायवयुनायहुत्वेति क्रियांकुर्यादितिशेषः व्यासः सौवर्णभारनिष्पन्नंनागंकृत्वातथैवगां व्यासायदत्वाविधिवत्पितुरानृण्यमाप्तवान् हेमाद्रौभविष्ये पंचम्यांपन्नगंहैमंस्वर्णेनैकेनकारयेत् क्षीराज्यपात्रमध्यस्थंपूज्यविप्रायदापयेत् प्रायश्चित्तमिदंप्रोक्तंनागदष्टस्यशंभुनेति अपरार्केस्मृत्यंतरेपि तदैवशुध्यतिप्रेतोनारायणबलौकृते योददातिक्रियापिंडंतस्मैप्रेतायवैसुतः तस्यैवाशौचमुद्दिष्टंत्र्यहमेवनसंशयः विष्णुश्राद्धसमाप्तौतुत्रयोदश्यांदिनत्रयं आशौचंपिंडदः कुर्यान्नतुतद्बंधुगोत्रजाः यस्यवैमृत्युकालेतुव्युच्छिन्नासंततिर्भवेत् सवसेन्नरकेनित्यंपंकमग्नः करीयथेत्युपक्रम्य बलिंनारायणंकुर्यात्तस्योद्देशेनभक्तिमानितिगारुडोक्तेरपुत्रस्यापिपत्न्याद्यैः कार्यइत्युक्तंदेवयाज्ञिकेन ।
सर्पानें मारलेला असेल तर एक वर्षपर्यंत शुक्लपंचमीच्या पूर्वदिवशीं एकभक्तव्रत करुन शुक्लपंचमीचे दिवशीं उपवास किंवा नक्त करुन पिठाचा नाग करावा , आणि अनंत , वासुकि , शंख , पद्म , कंबल , कर्कोटक , अश्वतर , धृतराष्ट्र , शंखपाल , कालिय , तक्षक , कपिल , या बारा नांवांनीं प्रत्येक महिन्यांत एकएकानांवानें त्या नागांची पूजा करुन पायसानें ब्राह्मणांस भोजन घालून वर्षाच्या अंतीं सुवर्णाचा नाग व गाई ब्राह्मणाला देऊन नारायणबलि करावा . याचीं मूलवचनें हेमाद्रींत पाहावीं . बौधायनसूत्रांत - " सर्पानें मृत झालेल्यांस ‘ नमोस्तुसर्पेभ्यः ’ या मंत्रानें तीन आहुती देऊन , उदकांत मृत झालेल्यांना ‘ समुद्राय वयुनाय ’ या मंत्रानें होम करुन नंतर क्रिया करावी " असें सांगितलें आहे . व्यास - " कोणीएकानें एकभार सुवर्णाचा नाग करुन तो व गाई व्यासाला यथाविधि देऊन तो पित्याच्या ऋणांतून मुक्त झाला . " हेमाद्रींत भविष्यांत - " पंचमीस एक कर्ष सुवर्णाचा नाग करुन दूध तूप यांच्या पात्रांत ठेऊन पूजा करुन ब्राह्मणाला द्यावा , सर्पानें दंश केलेल्यास हें प्रायश्चित्त शंकरानें सांगितलें आहे . " अपरार्कांत स्मृत्यंतरांतही - " नारायणबलि केला असतां त्यावेळींच प्रेत शुद्ध होतो . त्या प्रेताला जो पुत्र श्राद्धपिंड देतो त्यालाच आशौच तीन दिवस सांगितलें आहे , यांत संशय नाहीं . विष्णुश्राद्ध ( नारायणबलि ) त्रयोदशीस समाप्त झाल्यावर पिंड देणारानें ( श्राद्धकर्त्यानें ) तीन दिवस आशौच करावें , त्याच्या इतर बांधवांनीं आशौच करु नये . " " ज्याच्या मृत्युसमयीं संतति विच्छिन्न होईल तो नित्य नरकांत वास करील . जसा कर्दमांत मग्न झालेला हत्ती असतो तसा तो नरकांत मग्न झालेला असतो " असा उपक्रम करुन सांगतो - " त्याच्याविषयीं भक्तिमान् असेल त्यानें संततिरहित मृताच्या उद्देशानें नारायणबलि करावा " असें गरुडपुराणांत सांगितल्यावरुन निपुत्रिकाचाही पत्नी इत्यादिकांनीं नारायणबलि करावा , असें देवयाज्ञिकानें सांगितलें आहे .