मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
श्राद्धसंपात असतां निर्णय

तृतीय परिच्छेद - श्राद्धसंपात असतां निर्णय

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां श्राद्धसंपात ( अनेक श्राद्धें एक दिवशीं प्राप्त ) असतां निर्णय सांगतो -

अथश्राद्धसंपातेनिर्णयः अत्रपित्रोर्मृततिथ्यैकत्वेमरणक्रमेणदर्शेवर्गद्वयवत्तंत्रेणश्राद्धंकुर्यात् ‍ पौर्वापर्याज्ञानेतुपितृपूर्वकंकुर्यादितिहेमाद्रिः माधवादयस्तुपित्रोः श्राद्धेसमंप्राप्तेनवेपर्युषितेपिवा पितृपूर्वंसुतः कुर्यादन्यत्रासंनियोगतइतिकार्ष्णाजिनिस्मृतेः सर्वत्रपितृपूर्वंभिन्नप्रयोगमाहुः पार्वणैकोद्दिष्टयोः संपाते माधवीयेजाबालिः यद्येकत्रभवेयातामेकोद्दिष्टंचपार्वणं पार्वणंत्वभिनिर्वर्त्यएकोद्दिष्टंसमाचरेत् ‍ गृहदाहादिनायुगपन्मरणेभृगुः एककालेगतासूनांबहूनामथवाद्वयोः तंत्रेणश्रपणंकृत्वाकुर्याच्छ्राद्धंपृथक् ‍ पृथक् ‍ पूर्वकस्यमृतस्यादौद्वितीयस्यततः पुनः तृतीयस्यततः कुर्यात्सन्निपातेष्वयंक्रमः ऋष्यश्रृंगः भवेद्यदिसपिंडानां युगपन्मरणंतदा संबंधासत्तिमालोच्यतत्क्रमाच्छ्राद्धमाचरेत् ‍ गारुडे एकेनैवतुपाकेनश्राद्धानिकुरुतेत्रहि विकिरंत्वेकतः कुर्यात्पिंडान्दद्यात्पृथक् ‍ पृथक् ‍ अत्रानुगमनेचदाहसपिंडनादौविशेषंवक्ष्यामः अत्रिः बहूनामथवाद्वाभ्यांश्राद्धंचेत्स्यात्समेहनि तंत्रेणश्रपणंकृत्वापृथक् ‍ श्राद्धानिकारयेत् ‍ पुलस्त्यः महालयेगयाश्राद्धेगतासूनांक्षयेहनि तंत्रेणश्रपणंकृत्वाश्राद्धंकुर्यात्पृथक् ‍ पृथक् ‍ इदंचपृथक् ‍ पाकेनभिन्नश्राद्धाशक्तौ पृथक् ‍ पाकेनसंबंधासत्त्याश्राद्धभेदस्तुमुख्यः पक्षः एकत्रैवदिनेश्राद्धद्वयंप्राप्तंयदातदा चरेदेवपुरावर्षात्पितुर्मातुश्चतत्सुतः एकस्मिन्यः करोत्यह्निद्वयोः श्राद्धंयदाद्विजः तदापूर्वमृतस्यादौकृत्वास्नात्वायथाविधि पश्चात्पश्चान्मृतस्यैवपृथक् ‍ पाकैः समाचरेत् ‍ नैकस्मिन् ‍ दिवसेश्राद्धंत्रयाणांकुत्रचिद्दिजः एकः कुर्यात्तथाप्राप्तेअन्योभ्रातासमाचरेत् ‍ भ्रातर्यविद्यमानेतुतत्परेह्निसमाचरेत् ‍ अन्यथाश्राद्धहंतास्याच्छ्राद्धसंकरकृद्भवेत् ‍ इत्याश्वलायनोक्तेरितिपृथ्वीचंद्रः ।

त्यांत मातेची व पित्याची मृततिथि एक असतां मरणाच्या क्रमानें ( पूर्वीं मृताचा पूर्वीं उद्देश करुन ) जसें - दर्शाचे ठायीं पितृवर्ग व मातामहवर्ग या दोघांचें तंत्र होतें तसें तंत्रानें श्राद्ध करावें . पूर्वीं कोण मृत झालें व नंतर कोण याचें ज्ञान नसेल तर पितृपूर्वक श्राद्ध करावें , असें हेमाद्रि सांगतो . माधव इत्यादिक तर - " आईबापांचें नवश्राद्ध किंवा पुराणश्राद्ध एका दिवशीं प्राप्त असतां पुत्रानें पितृपूर्वक करावें . बरोबर मृत नसतील त्यांविषयीं हा नियम नाहीं " ह्या कार्ष्णाजिनि स्मृतीवरुन सर्वत्र पितृपूर्वक भिन्न प्रयोगानें करावें , असें सांगतात . पार्वण व एकोद्दिष्ट यांचा संपात असतां माधवीयांत जाबालि - " एकोद्दिष्ट आणि पार्वण हीं दोन श्राद्धें जर एक दिवशीं प्राप्त होतील तर पार्वण करुन नंतर एकोद्दिष्ट करावें . " घर जळणें इत्यादि कारणांनीं अनेक मनुष्य एकदम मृत झाले असतां भृगु - " एककालीं बहुत किंवा दोन मृत झाले असतां तंत्रानें ( एकदम ) पाक करुन वेगवेगळें श्राद्ध करावें . त्यांमध्यें पूर्वीं मृताचें पूर्वीं करावें . पश्चात् ‍ मृताचें नंतर करावें . तिसर्‍याचें तदनंतर करावें . श्राद्धांचा संपात ( अनेक श्राद्धें एककालीं प्राप्त ) असतां हा क्रम समजावा . " ऋष्यश्रृंग - " जेव्हां सपिंडांचें एकदम मरण असेल तेव्हां संबंधसामीप्य पाहून त्या क्रमानें श्राद्ध करावें . " गारुडांत - " एकाच पाकानें अनेक श्राद्धें करितो तेव्हां त्या श्राद्धांत विकिर एका ठिकाणीं देऊन वेगवेगळे पिंड द्यावे . " एककालीं अनेक मरतील त्या ठिकाणीं आणि अनुगमनाचे ठायीं दाह , सपिंडीकरण इत्यादिकांविषयीं विशेष निर्णय पुढें सांगूं . अत्रि - " बहुतांचें अथवा दोघांचें श्राद्ध एक दिवशीं प्राप्त असेल तर तंत्रानें एक पाक करुन श्राद्धें वेगवेगळी करावीं . " पुलस्त्य - " महालयांत , गयेंत आणि मृतदिवशीं तंत्रानें एक पाक करुन बहुत मृतांचें वेगवेगळें श्राद्ध करावें . " एक पाकानें पृथक् ‍ श्राद्ध करणें हें वेगवेगळ्या पाकानें भिन्न भिन्न श्राद्ध करण्याविषयीं शक्ति नसतां समजावें . संबंधसामीप्य पाहून भिन्न भिन्न पाकानें भिन्न श्राद्ध करणें हा मुख्य पक्ष आहे . कारण , " पित्याचें व मातेचें अशीं दोन श्राद्धें एका दिवशीं जेव्हां प्राप्त होतील तेव्हां तीं वर्षाच्या आंतील असतील तरी त्यांच्या पुत्रानें करावींच . जो द्विज एका दिवशीं दोघांचीं श्राद्धें करीत असेल तेव्हां त्यानें पूर्वीं मृताचें आधीं यथाविधि श्राद्ध करुन स्नान करुन नंतर पश्चात् ‍ मृताचें पृथक् ‍ पाकानें श्राद्ध करावें . एका द्विजानें ( ब्राह्मणादिकानें ) तिघांचें श्राद्ध कोठेंही करुं नये . एका दिवशीं तिघांचें श्राद्ध प्राप्त असतां इतर भ्रात्यानें तें तिसरें श्राद्ध करावें . भ्राता नसेल तर तें तिसरें श्राद्ध दुसर्‍या दिवशीं करावें . अन्यथा म्हणजे एका दिवशीं तिघांचें श्राद्ध करील तर श्राद्धसंकरकारी श्राद्धाचा घात करणारा होईल " असें आश्वलायनवचन आहे , असें पृथ्वीचंद्र सांगतो .

कात्यायनः द्वेबहूनिनिमित्तानिजायेरन्नेकवासरे नैमित्तिकानिकार्याणिनिमित्तोत्पत्त्यनुक्रमात् ‍ जाबालिः श्राद्धंकृत्वातुतस्यैवपुनः श्राद्धंनतद्दिने नैमित्तिकंतुकर्तव्यंनिमित्तानुक्रमोदयं कालादर्शे नित्यदार्शिकयोश्चोदकुंभमासिकयोरपि दार्शिकस्ययुगादेश्चदार्शिकालभ्ययोगयोः दार्शिकस्यचमन्वादेः संपातेश्राद्ध कर्मणः प्रसंगादितरस्यापिसिद्धेरुत्तरमाचरेत् ‍ अस्यदेवताभेदेपवादमाहसएव नित्यस्यचोदकुंभस्यनित्यमासिकयोरपि दर्शस्यचोदकुंभस्यदर्शमासिकयोरपि नित्यस्यचाब्दिकस्यापिदार्शिकाब्दिकयोरपि युगाद्याब्दिकयोश्चैवमन्वाद्याब्दिकयोस्तथा प्रत्याब्दिकस्यचालभ्ययोगेषुविहितस्यच संपातेदेवताभेदाच्छ्राद्धयुग्मंसमाचरेत् ‍ निमित्तानियतिश्चात्रपूर्वानुष्ठानकारणं पित्रोस्तुपितृपूर्वत्वंसर्वत्रश्राद्धकर्मणि माधवीयेस्मृतिसंग्रहे काम्यतंत्रेणनित्यस्यतंत्रंश्राद्धस्यसिध्यति ।

कात्यायन - " एक दिवशीं दोन किंवा बहुत श्राद्धादिकांचीं निमित्तें प्राप्त होतील तर ज्या क्रमानें निमित्त उत्पन्न असेल त्या क्रमानें तीं नैमित्तिक कर्मै करावीं . " जाबालि - " एकदां एकाचें श्राद्ध करुन पुनः त्या दिवशीं त्याचेंच श्राद्ध होत नाहीं . नैमित्तिक असेल तर तें , निमित्त उत्पन्न असेल त्या क्रमानें करावें . " कालादर्शांत - " नित्यश्राद्ध व दर्श , उदकुंभश्राद्ध व मासिक , दर्श व युगादिश्राद्ध , दर्श व अलभ्ययोगनिमित्तक श्राद्ध , दर्श व मन्वादिक श्राद्ध , अशीं दोन दोन श्राद्धें एक दिवशीं प्राप्त असतां पुढच्या श्राद्धाच्या प्रसंगानें पूर्वश्राद्धाची देखील सिद्धि होते , ती अशी कीं , दर्शानें नित्यश्राद्धसिद्धि , मासिकानें उदकुंभसिद्धि इत्यादि होते म्हणून पुढचें श्राद्ध करावें . " संपाताच्या देवता भिन्न असतां अपवाद तोच सांगतो - " नित्यश्राद्ध व उदकुंभ , नित्यश्राद्ध व मासिक , दर्श व उदकुंभ , दर्श व मासिक , नित्यश्राद्ध व आब्दिक , दर्श व आब्दिक , युगादिश्राद्ध व आब्दिक , मन्वादिक व आब्दिक , प्रत्याब्दिक व अलभ्ययोगनिमित्तक यांचा संपात ( हीं दोन दोन एक दिवशीं प्राप्त ) असतां देवतांचा भेद असल्यामुळें दोन श्राद्धें करावीं . ज्या श्राद्धाचें निमित्त नियत ( ठरींव ) नसेल तें श्राद्ध पूर्वीं करावें . मातेचें व पित्याचें श्राद्ध एक दिवशीं प्राप्त असतां सर्वत्र ठिकाणीं पित्याचें पूर्वीं करावें . " माधवीयांत स्मृतिसंग्रहांत - " काम्यश्राद्धाच्या तंत्रानें नित्यश्राद्धाचें तंत्र सिद्ध होतें . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP