मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
ब्राह्मणस्नानादि

तृतीयपरिच्छेद - ब्राह्मणस्नानादि

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां ब्राह्मणस्नानादि सांगतो -

चंद्रिकायांमार्कंडेयः अह्नः षट् ‍ सुमुहूर्तेषुगतेषुप्रयतान् ‍ द्विजान् ‍ प्रत्येकंप्रेषयेत्तेषांप्रदायामलकोदकम देवलः ततोनिवृत्तेमध्याह्नेकृत्तरोमनखान् ‍ द्विजान् ‍ अभिगम्ययथान्यायंप्रयच्छेद्दंतधावनम् ‍ तैलमभ्यंजनं स्नानंस्नानीयंचपृथग्विधम् ‍ पात्रैरौदुंबरैर्दद्याद्वैश्वदेविकपूर्वकम् ‍ औदुंबरैस्ताम्रमयैः अत्रक्षौरामलकस्नानादि निषिद्धतिथ्यादिव्यतिरिक्तविषयमितिहेमाद्रिर्माधवश्च यत्तुचंद्रिकायांप्रचेताः तैलमुद्वर्तनंस्नानंदद्यात्पूर्वाह्णएवच श्राद्धभुग्भ्योनखश्मश्रुच्छेदनंतुनकारयेदिति तन्निषिद्धतिथ्यादिविषयम् ‍ निषिद्धतिथ्यादि तुप्रागुक्तं अभ्यंगेतुकलिकायांकात्यायनः तैलमुद्वर्तनंदेयेब्राह्मणेभ्यः प्रयत्नतः तैरभ्यंगश्चकर्तव्योवर्ज्यं कालंनचिंतयेत् ‍ अपरार्केप्रचेताः स्नातोधिकारीभवतिदैवेपित्र्येचकर्मणि श्राद्धकृच्छुक्लवासाः स्यान्मौनी चविजितेंद्रियः हेमाद्रौजाबालः तांबूलंदंतकाष्ठंचस्नेहस्नानमभोजनम् ‍ रत्यौषधंपरान्नानिश्राद्धकर्ताविवर्जयेत् ‍ वस्त्रेविशेषमाहतत्रैवभृगुः नग्नः स्यान्मलवद्वासानग्नः कौपीनकेवलः द्विकच्छोनुत्तरीयश्चअकच्छोवस्त्रएवच नग्नः काषायवासाः स्यान्नग्नश्चार्द्रपटः स्मृतः नग्नोद्विगुणवस्त्रः स्यान्नग्नोरक्तपटः स्मृतः नग्नस्तुस्त्रिग्धवस्त्रः स्यान्नग्नः स्यूतपटस्तथा ।

चंद्रिकेंत मार्कंडेय - " दिवसाचे सहा मुहूर्त गेल्यावर ( बारा घटिका दिवसानंतर ) नियमित असलेल्या प्रत्येक ब्राह्मणाकरितां वांटलेली आंवळकाठी व उदक देऊन कोणासही पाठवावें . " देवल - " तदनंतर मध्यान्हकाल निवृत्त झाला असतां श्मश्रु केलेल्या व रोमनख काढलेल्या ब्राह्मणांप्रत जाऊन यथान्यायानें दंतधावनं द्यावें . नंतर वैश्वदेवपूर्वक सर्व ब्राह्मणांना अभ्यंगाकरितां तेल व ताम्रपात्रांनीं स्नान व स्नानीय उदक वेगवेगळें द्यावें . " येथें क्षौर व आमलकोदकस्नानादिक सांगितलें तें निषिद्धतिथ्यादिव्यतिरिक्तविषयक आहे , असें हेमाद्रि माधव सांगतो . आतां जें चंद्रिकेंत प्रचेता सांगतो कीं , " तैल , उटी , स्नान हें श्राद्धभोक्त्यांना पूर्वाह्णीं द्यावें . नख , श्मश्रु यांचें छेदन करवूं नये , " तें निषिद्ध तिथि वार इत्यादिविषयक आहे . निषिद्ध तिथि वगैरे पूर्वीं सांगितलें आहे . अभ्यंगाविषयीं तर कलिकेंत कात्यायन - " तैल आणि उद्वर्तन हें ब्राह्मणांना प्रयत्नानें द्यावें . त्यांनीं अभ्यंग करावा ; वर्ज्य कालाचा विचार करुं नये . ’’ अपरार्कांत प्रचेता - " दैवपित्र्यकर्माविषयीं स्नान केल्यावर अधिकारी होतो . श्राद्धकर्त्यानें शुक्ल वस्त्र परिधान करावें , मौनधारण करावें , जितेंद्रिय असावें . " हेमाद्रींत जाबाल - " तांबूल , काष्ठानें दंतधावन , स्नेहयुक्त स्नान , उपवास , मैथुन , औषध , आणि परान्न हीं श्राद्धकर्त्यानें वर्ज्य करावीं . " वस्त्राविषयीं विशेष सांगतो तेथेंच भृगु - " मळकट वस्त्र परिधान करणारा , केवळ कौपीन धारण करणारा , दोन कच्छ घालणारा , अंगावर वस्त्र नसलेला , कच्छरहित , वस्त्ररहित , काषायवस्त्रधारी , ओलें वस्त्र नेसलेला , दुरें वस्त्र नेसलेला , रंगविलेलें वस्त्र नेसणारा , चिकट वस्त्र परिधान केलेला आणि शिवलेलें वस्त्र परिधान केलेला हे सारे नग्न म्हटले आहेत . "

ततः कर्ताऊर्ध्वपुंड्रंकुर्यात् ‍ जपेहोमेतथादानेस्वाध्यायेपितृकर्मणि तत्सर्वंनश्यतिक्षिप्रमूर्ध्वपुंड्रंविनाकृतमिति हेमाद्रावुक्तेः यज्ञोदानंजपोहोमः स्वाध्यायः पितृकर्मच वृथाभवतिविप्रेंद्राऊर्ध्वपुंड्रंविनाकृतमिति बृहन्नारदीयात् ‍ ऊर्ध्वंचतिलकंकुर्याद्दैवेपित्र्येचकर्मणीतिवृद्धपराशरोक्तेश्च अन्येतुऊर्ध्वपुंड्रंद्विजातीनामग्निहोत्रसमोविधिः श्राद्धकालेतुसंप्राप्तेकर्ताभोक्ताचतत्त्यजेत् ‍ वामहस्तेचदर्भांस्तुगृहेरंगवलिंतथा ललाटेतिलकंदृष्ट्वानिराशाः पितरोगताइतिसंग्रहोक्तेः ऊर्ध्वपुंड्रंत्रिपुंड्रंवाचंद्राकारमथापिवा श्राद्धकर्तानकुर्वीतयावत्पिंडान्ननिर्वपेदितिविश्वप्रकाशेवचनाच्चनकार्यमित्याहुः अत्राचाराव्द्यवस्था अतएवबृहन्नारदीये ऊर्ध्वपुंड्रंचतुलसींश्राद्धेनेच्छंतिकेचनेति ऊर्ध्वपुंड्रविधिर्विप्रविषयः निषेधः कर्तृपरइतिपृथ्वीचंद्रः यत्तुहेमाद्रौदेवलः ललाटेपुंड्रकंदृष्ट्वास्कंधेमाल्यंतथैवच निराशाः पितरोयांतिदृष्ट्वाचवृषलीपतिमिति तद्गंधेनत्रिपुंड्रविषयम् ‍ प्राक् ‍ पिंडदानाद्गंधाद्यैर्नालंकुर्यात्स्वविग्रहमित्याश्वलायनोक्तेः पुंड्रंवर्तुलमित्यपरार्केमदनरत्नेच पृथ्वीचंद्रस्तुपुंड्रंत्रिपुंड्रं ऊर्ध्वंचतिलकंकुर्यान्नकुर्याद्वैत्रिपुंड्रकं निराशाः पितरोयांतिदृष्ट्वाचैवत्रिपुंड्रकमितिबृहत्पराशरोक्तेः भोक्तुस्तिर्यगलेपोभवत्येव वर्जयेत्तिलकंभालेश्राद्धकालेचसर्वदा तिर्यगप्यूर्ध्वपुंड्रंवाधारयेत्तुप्रयत्नतइतिव्यासोक्तेरित्याह पृथ्वीचंद्रोदयेब्राह्मे सदर्भेणतुहस्तेनयः कुर्यात्तिलकंबुधः आचम्यसविशुध्येतदर्भत्यागेनचैवहि श्राद्धारंभकालमाहापरार्केगौतमः आरभ्यकुतपेश्राद्धंकुर्यादारौहिणंबुधः विधिज्ञोविधिमास्थायरौहिणंतुनलंघयेत् ‍ एतदेकोद्दिष्टे पार्वणेतूक्तंमात्स्ये ऊर्ध्वंमुहूर्तात्कुतपाद्यन्मुहूर्तचतुष्टयं मुहूर्तपंचकंह्येतत्स्वधाभवनमिष्यते तथा मध्याह्नेसर्वदायस्मान्मंदीभवतिभास्करः तस्मादनंतफलदस्तत्रारंभोविशिष्यते ।

तदनंतर कर्त्यानें ऊर्ध्वपुंड्र करावा ; कारण , " जप , होम , दान , स्वाध्याय , पितृकर्म यांविषयीं ऊर्ध्वपुंड्र केल्यावांचून जें कांहीं कर्म केलें असेल तें सारें तत्काल नष्ट होतें " असें हेमाद्रींत उक्त आहे . " यज्ञ , दान , जप , होम , स्वाध्याय ( अध्ययन ), पितृकर्म , हीं ऊर्ध्वपुंड्र धारण केल्यावांचून केलीं असतां व्यर्थ होतात " असें बृहन्नारदीयवचन आहे . आणि " दैव , पित्र्य कर्माविषयीं ऊर्ध्व तिलक करावा . " असें वृद्धपराशरवचनही आहे . अन्यग्रंथकार तर - " ब्राह्मणांना ऊर्ध्वपुंड्र धारण करणें हा अग्निहोत्रतुल्य विधि आहे . श्राद्धकाल प्राप्त असतां कर्त्यानें व भोक्त्यानें तो ऊर्ध्वपुंड्र वर्ज्य करावा . वामहस्तांत दर्भ , घरांत रंगावलि , आणि ललाटावर तिलक हे पाहून पितर निराश होऊन जातात " असें संग्रहवचन आहे . श्राद्धकर्त्यानें जोंपर्यंत पिंडदान केलें नाहीं तोंपर्यंत ऊर्ध्वपुंड्र अथवा त्रिपुंड्र , अर्धचंद्राकार मस्तकावर करुं नये . " असें विश्वप्रकाशांत वचनही आहे म्हणून ऊर्ध्वपुंड्र करुं नये असें सांगतात . याविषयीं ( दोन प्रकारचीं मतें आहेत म्हणून ) देशाचारानें व्यवस्था करावी . म्हणूनच बृहन्नारदीयांत सांगतो - " कोणी श्राद्धाचे ठायीं ऊर्ध्वपुंड्र आणि तुलसी इच्छीत नाहींत . " ऊर्ध्वपुंड्राचा विधि ब्राह्मणाविषयीं आणि निषेध श्राद्धकर्त्याविषयीं समजावा , असें पृथ्वीचंद्र म्हणतो . आतां जें हेमाद्रींत देवल सांगतो - " श्राद्धांत ललाटावर पुंड्र ( तिलक ), स्कंधावर माल्य ( पुष्पमाला ), आणि शूद्रेचा पति यांना पाहून पितर निराश होऊन जातात . " हें सांगणें गंधानें त्रिपुंड्र केल्याविषयीं आहे . कारण , " पिंडदानाच्या पूर्वीं गंधादिकांनीं आपल्या देहाला अलंकृत करुं नये " असें आश्वलायनवचन आहे . पुंड्र म्हणजे वर्तुल ( वाटोळा ) असें अपरार्कांत मदनरत्नांत आहे . पृथ्वीचंद्र तर - पुंड्र म्हणजे त्रिपुंड्र म्हणतो . कारण , " ऊर्ध्वतिलक करावा , त्रिपुंड्र करुं नये . कारण , त्रिपुंड्र पाहून पितर निराश होऊन जातात " असें बृहत्पराशरवचन आहे . श्राद्धभोक्त्याला गंधादिकांचा तिर्यक् ‍ ( आडवा ) लेप होतच आहे . कारण , " श्राद्धकालीं सर्वदा ललाटावर तिलक वर्ज्य करावा . आडवा किंवा ऊर्ध्वपुंड्र प्रयत्नानें धारण करावा " असें व्यासवचन आहे , असें ( पृथ्वीचंद्र ) सांगतो . पृथ्वीचंद्रोदयांत ब्राह्मांत - " जो मनुष्य दर्भयुक्त हस्तानें तिलक करील तो दर्भत्याग करुन व आचमन करुन शुद्ध होईल . " श्राद्धारंभाचा काल सांगतो अपरार्कांत गौतम - " श्राद्धविधि जाणणार्‍या विद्वानानें कुतप मुहूर्तावर श्राद्धाला आरंभ करुन रौहिण मुहूर्तांपर्यंत करावें , रौहिण मुहूर्ताचें उल्लंघन करुं नये . " हें एकोद्दिष्टाविषयीं समजावें . पार्वणाविषयीं सांगतो मात्स्यांत - " कुतप मुहूर्तापासून पुढचे चार मुहूर्त म्हणजे कुतप धरुन झालेले जे पांच मुहूर्त त्या कालीं श्राद्ध करणें इष्ट आहे . तसेंच - ज्या कारणास्तव मध्यान्हकालीं सर्वदा सूर्य मंदासारखा होतो तस्मात् ‍ त्या मध्यान्हीं श्राद्धाचा आरंभ अनंत फल देणारा असल्यामुळें विशिष्ट आहे . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP