आतां श्राद्धदिवशीं भार्या रजस्वला असतां सांगतो -
अथभार्यारजोदर्शनेतत्रदार्शिकमामेनकार्यं श्राद्धविघ्नेद्विजातीनामामश्राद्धंप्रकीर्तितं अमावास्यादिनियतंमाससंवत्सरादृते इतिहेमाद्रौहारीतोक्तेः व्याघ्रपादोपि आर्तवेदेशकालानांविप्लवेसमुपस्थिते आमश्राद्धंद्विजैः कार्यंशूद्रः कुर्यात्सदैवहीति दीपिकापि दर्शेतुभार्यार्तवेह्यामश्राद्धविधिंप्रवासिविधुराद्याश्चाचरेयुर्द्विजाः वस्तुतस्तु पाकाभावेद्विजातीनामामश्राद्धंविधीयतइतिसुमंतूक्तेः पाककर्त्रंतरसत्त्वेऽन्नेनान्यथामेनेतियुक्तं मासिकानिसपिंडानिअमावास्यातथाब्दिकं अन्नेनैवतुकर्तव्यंयस्यभार्यारजस्वलेतिकलिकायांवचनाच्च कालादर्शेतुस्त्रियारजोदर्शनेदर्शश्राद्धंपंचमेहनीतिपक्षांतरमुक्तं पारिजातेप्येवं एवंमहालययुगादावपि ।
भार्या रजस्वला असतां दर्शश्राद्ध आमान्नानें करावें . कारण , " द्विजातींना श्राद्धविघ्न प्राप्त झालें असतां आमश्राद्ध सांगितलें आहे . मासिक , सांवत्सरिक वर्ज्य करुन अमावास्यादिश्राद्धविषयक हें सांगणें आहे " असें हेमाद्रींत हारीतवचन आहे . व्याघ्रपादही - " भार्येला ऋतु प्राप्त असतां , देश व काल यांचा विनाशसमय असतां द्विजांनीं आमश्राद्ध करावें . शूद्रानें तर सदा आमश्राद्धच करावें . " दीपिकाही - " दर्शाचे ठायीं भार्या रजस्वला असतां आमश्राद्ध करावें . आणि प्रवासी , भार्यारहित इत्यादिकांनीं देखील आमश्राद्धविधि करावा . " वास्तविक म्हटलें तर " पाकाच्या अभावीं द्विजांना आमश्राद्ध सांगितलें आहे " ह्या सुमंतुवचनावरुन पाककर्ता दुसरा कोणी असतां अन्नानें करावें . पाक करणारा कोणी नसेल तर आमानें करावें , हें युक्त आहे . आणि " ज्याची भार्या रजस्वला असेल त्यानें सपिंडीकरण , मासिकें अमावास्याश्राद्ध , व आब्दिक , हीं अन्नानेंच करावीं . " असें कलिकेंत वचनही आहे . कालादर्शांत तर - स्त्रियेला रजोदर्शन असतां दर्शश्राद्ध पांचव्या दिवशीं करावें , असा निराळा पक्ष सांगितला आहे . पारिजातांतही असेंच आहे . याप्रमाणें महालय , युगादिक यांचे ठायींही समजावें .
आब्दिकंतुरजोदर्शनेपितद्दिनेएवकार्यं पुष्पवत्स्वपिदारेषुविदेशस्थोप्यनग्निकः अन्नेनैवाब्दिकंकुर्याद्धेम्नावामेननक्कचिदितिमाधवीये लौगाक्षिस्मृतेः मरीचिरपि अनग्निकः प्रवासीचयस्यभार्यारजस्वला आमश्राद्धंप्रकुर्वीतनतत्कुर्यान्मृतेहनि कार्ष्णाजिनिः आपन्नोप्याब्दिकंनैवकुर्यादामेनकुत्रचित् अन्नेनतदमायांवाकृष्णेवाहरिवासरे प्रयोगपरिजाते रजस्वलायांभार्यायांक्षयाहंयः परित्यजेत् सवैनरकमाप्नोतियावदाभूतसंप्लवं मासिकानिसपिंडंचअमावास्यातथाब्दिकं अन्नेनैवतुकर्तव्यंयस्यभार्यारजस्वला देवयाज्ञिकनिबंधेपि भर्तुः श्राद्धंपंचमेह्निकुर्याद्भार्यारजस्वला पुत्रः पित्रोः प्रकुर्वीतमृताहनिशुचिर्यतः कालादर्शेपि रजस्वलांगनोनग्निर्विदेशस्थोथवाब्दिके दर्शादाविवनामेनत्वन्नेनश्राद्धमाचरेत् अन्यत्रापि विदेशकोवाविगताग्निकोवारजस्वलायामपिधर्मपत्न्यां श्राद्धंमृताहेविदधीतपाकैर्नामेनहेम्नानतुपंचमेह्नि एवंमासिकेपि यत्तु मरीचिः आब्दिकेसमनुप्राप्तेयस्यभार्यारजस्वला पंचमेऽहनितच्छ्राद्धंनतत्कुर्यान्मृतेहनि माधवीये श्राद्धंतदानकर्तव्यंकर्तव्यंपंचमेहनीत्युत्तरार्धं तदपुत्रस्त्रीकर्तृकश्राद्धविषयं अपुत्रातुयदाभार्यासंप्राप्तेभर्तुराब्दिके रजस्वलाभावेत्सातुकुर्यात्तत्पंचमेहनीतिश्लोकगौतमोक्तेः दैवेकर्मणिपित्र्येवापंचमेहनिशुद्ध्यतीतिप्रभासखंडाच्च नन्वशुचित्वादेवतत्रपंचमेहन्यर्थाच्छ्राद्धंप्राप्तमितिवचनंव्यर्थं मैवं गर्भिणीसूतिकादिश्चकुमारीवान्यरोगिणी यदाशुद्धातदान्येनकारयेत्प्रयतास्वयमिति हेमाद्रौभविष्योक्तेः अनुपनीतस्त्रीशूद्राश्चश्राद्धमृत्विजाकारयेयुः स्वयंवामंत्रकंकुर्युरितिस्मृत्यर्थसाराच्चान्यद्वाराकरणनिवृत्त्यर्थत्वात्तस्य त्वदुक्तदिशाआशौचानंतरं श्राद्धकर्तव्यतावदेकवाक्यवैयर्थ्याच्च अतः प्रागुक्तमरीच्युक्तेः पत्नीपंचमेहनीतियुक्तं यत्तुसप्ताहात्पितृदेवानांभवेद्योग्याव्रतार्चनेइतितद्रजोनिवृत्तिपरमितिहेमाद्रिभिन्नसर्वनिबंधसिद्धांतः ।
वार्षिक तर भार्येला रजोदर्शन असतांही त्याच दिवशीं करावें . कारण , " स्त्रिया रजस्वला असतांही , प्रवासांत असला तरी आणि अग्निरहित असला तरी , त्यानें सांवत्सरिक अन्नानेंच करावें . हिरण्यद्वारा किंवा आमानें कधींही करुं नये " असें माधवीयांत लौगाक्षीचें वचन आहे . मरीचिही - " अग्निरहित , प्रवासी , व ज्याची भार्या रजस्वला असेल त्या सर्वांनीं आमश्राद्ध करावें . पण तें आमश्राद्ध मृतदिवशीं ( सांवत्सरिक ) करुं नये . " कार्ष्णाजिनि - " आपत्कालीं देखील आब्दिकश्राद्ध आमान्नानें कधींही करुं नये . अन्नानें त्या दिवशीं करण्यास सवड नसेल तर त्या मासाच्या अमावास्येस किंवा कृष्ण एकादशीस अन्नानें करावें . " प्रयोगपारिजातांत - " भार्या रजस्वला असतां जो मनुष्य पितरांच्या मृतदिवसाचा परित्याग करील ( श्राद्ध करणार नाहीं ) तो मनुष्य सर्व भूतांचा प्रलय होईपर्यंत नरकांत पडतो . मासिक , सपिंडीकरण , दर्श , आणि वार्षिक हीं श्राद्धें ज्याची भार्या रजस्वला असेल त्यानें अन्नानेंच करावीं . " देवयाज्ञिकनिबंधांतही - " रजस्वला स्त्रियेनें भर्त्याचें श्राद्ध पांचव्या दिवशीं करावें . पुत्रानें मातापितरांचें श्राद्ध मृतदिवशीं करावें . कारण , माता रजस्वला असली तरी तो शुद्ध आहे . " कालादर्शांतही - " ज्याची भार्या रजस्वला तो , अग्निरहित , प्रवासी , यांनीं दर्शादिकश्राद्धाप्रमाणें संवत्सरदिवशीं आमान्नानें श्राद्ध करुं नये . तर अन्नानें करावें . " इतर एका ग्रंथांतही - " विदेशस्थ असो किंवा अग्निरहित असो अथवा धर्मपत्नी रजस्वला असो , मातापितरांच्या मृतदिवशीं श्राद्ध पाकानें करावें . आमश्राद्ध किंवा हिरण्यश्राद्ध करुं नये . आणि पांचव्या दिवशींही करुं नये . " याप्रमाणें मासिकाविषयींही समजावें . आतां जें मरीचि - " सांवत्सरिक प्राप्त असतां ज्याची भार्या रजस्वला होईल त्यानें पांचव्या दिवशीं श्राद्ध करावें . मृतदिवशीं करुं नये " या वचनानें उत्तरार्ध ‘ श्राद्धं तदा न कर्तव्यं कर्तव्यं पंचमेहनि ’ असें माधवीयांत आहे . हें मरीचिवचन पुत्ररहित स्त्रियेनें करावयाच्या श्राद्धाविषयीं आहे . कारण , " भर्त्याचें सांवत्सरिक प्राप्त असतां भार्या पुत्ररहित असून रजस्वला होईल तर तिनें तें श्राद्ध पांचव्या दिवशीं करावें . " असें श्लोकगौतमवचन आहे . आणि " दैवकर्माविषयीं व पित्र्यकर्माविषयीं स्त्री पांचव्या दिवशीं शुद्ध होते " असें प्रभासखंडीं वचनही आहे . शंका - स्त्री रजस्वला असतां अशुचि असल्यामुळेंच अर्थात् पांचव्या दिवशीं श्राद्ध प्राप्त झालें . म्हणून त्याविषयीं वचनानें कारण नाहीं . समाधान - " गर्भिणी , प्रसूत झालेली , कुमारी अथवा रोगिणी अशी स्त्री जेव्हां अशुद्ध ( कर्माला अयोग्य ) असेल तेव्हां तिनें दुसर्याकडून कर्म करवावें , कर्माला योग्य असेल तर तिनें स्वतः करावें असें हेमाद्रींत भविष्यवचन आहे . आणि " मुंज न झालेला , स्त्रिया , शुद्र यांनीं श्राद्ध ऋत्विजांकडून करवावें , अथवा स्वतः अमंत्रक करावें " असें स्मृत्यर्थसारांत वचनही आहे . यावरुन स्त्री रजस्वला असतां तिनें इतरांकडून श्राद्ध करवावें , असें प्राप्त झालें ; त्याची निवृत्ति ( निषेध ) करण्यासाठीं तें गौतमादिवचन आहे . या गौतमादिवचनाची ‘ आशौचानंतर श्राद्ध करावें ’ याच्याशीं एकवाक्यता करावी , असें म्हटलें तर शंकाकाराच्या रीतीनें ती एकवाक्यताही व्यर्थ होईल . म्हणून पूर्वोक्त मरीचिवचनावरुन पत्नीनें पांचव्या दिवशीं करावें , असें योग्य आहे . आतां जें " सात दिवसांनंतर पितर व देव यांच्या व्रताविषयीं व पूजेविषयीं योग्य होते " तें ज्या स्त्रीचें रज निवृत्त झालें नसेल तीविषयीं आहे . हा हेमाद्रीवांचून इतर सर्व निबंधांचा सिद्धांत आहे .
हेमाद्रिस्तुश्राद्धादौस्त्रियासहैवाधिकारात्तस्यांरजोदुष्टायांतन्निवृत्तेरेकभार्येणपंचमेहनिकार्यं प्रागुक्तमरीच्युक्तेः भार्यांतरसत्त्वेतुपुष्पवत्स्वपीतिवचनात्तद्दिने एवेत्याह दीपिकापि भार्यर्तौसतिपंचमेचदिवसेस्याद्वार्षिकंमसिकंपक्कानैर्बहुभार्यकस्त्वाधिकृतेपत्न्यंतरेतिष्ठति कुर्यात्तद्दितयंस्वमुख्यदिवसेइति तच्चिंत्यंसहाधिकारः सहत्वश्रुत्यावाएकफलभाक्त्वेनवापाककर्तृत्वेनवा नाद्यः तदभावात् पाणिग्रहणाद्धिसहत्वंकर्मस्वित्यस्याग्निसाध्यकर्मविषयत्वात् आब्दिकस्यचनिरग्नेरपिपाकेनैवोक्तेः स्मार्ताग्निसाध्यत्वानियमात्तामपरुध्येति पूर्वोक्तवचनसत्त्वाच्च कथंचभार्यांतरसत्त्वेधिकारः ज्येष्ठयानविनेतरेतिनियमात् ज्येष्ठापरत्वेचतेनैवसिद्धेर्वचनवैयर्थ्यात् नद्वितीयः अविभक्तभ्रातृष्वेकस्याऽशुचित्वेन्यस्यानधिकारापत्तेः नतृतीयः प्रवासनिर्दशसूतिकारोगिण्यादिष्वप्यकरणापत्तेः आरभेतनवैः पात्रैरन्नारंभंचबांधवैरितिदेवलोक्तावात्मनेपदात्स्वस्यबांधवानां चपाककर्तृत्वोक्त्याविरोधाच्च ततस्तानिपपाचाशुसीताजनकनंदिनीतिपाद्मादिलिंगात्प्राशस्यंभार्यापाकस्योच्येत नतत्कस्याप्यनिष्टं तेनैतद्वचनंयुक्त्याद्यभावात् पूर्वोक्तवचोविरोधाच्चयत्किंचिदेव यदपि श्राद्धीयाहनि संप्राप्तेयस्यभार्यारजस्वला श्राद्धंतत्रनकर्तव्यंकर्तव्यंपंचमेहनीतिश्लोकगौतमपाठोन्यथादर्शितः माधवीये चतद्वशात्पक्षांतरमुक्तं तेनापिनाभिप्रेतार्थसिद्धिः यस्यप्रेतस्येत्यर्थात् तेनात्रहेमाद्रिर्बभ्रामेतिबहुवक्तव्येपिविस्तरभीतेर्नोच्यते ।
हेमाद्रि तर - श्राद्धादिकांविषयीं स्त्रीसहवर्तमानच पुरुषाला अधिकार असल्यामुळें ती स्त्री आर्तवानें दुष्ट असतां त्या आर्तवाची निवृत्ति झाल्यानंतर ज्याची एक भार्या असेल त्यानें पूर्वोक्त मरीचिवचनावरुन पांचव्या दिवशीं करावें . इतर भार्या असेल तर ‘ पुष्पवत्स्वपि० ’ या पूर्वोक्त लौगाक्षिस्मृतीवरुन त्याच दिवशीं करावें , असें सांगतो . दीपिकाही - " भार्या ऋतुमती असतां पांचव्या दिवशीं वार्षिक , मासिक पक्कानांनीं करावें . ज्याच्या बहुत स्त्रिया असतील त्याची इतर स्त्री अधिकारी असतां तीं दोन्ही श्राद्धें आपापल्या मुख्य दिवशीं करावीं . " हें हेमाद्रि व दीपिका यांचें मत चिंत्य , ( युक्तिशून्य ) आहे . कारण , पुरुषाला सहाधिकार ( पत्नीबरोबर अधिकार ) हेमाद्रीनें सांगितला , तो वचनांत ‘ सह ’ या शब्दाच्या श्रवणानें सांगितला , किंवा दोघे ( स्त्रीपुरुष ) एकफलभागी असल्यामुळें सांगितला . अथवा स्त्री पाक करणारी आहे म्हणून सांगितला . पहिला पक्ष नाहीं . कारण , वचनांत ‘ सह ’ शब्द नाहीं . ‘ विवाहापासून कर्मांचे ठायीं सहत्त्व आहे ’ हें वचन गृह्याग्नीनें साध्य होणारीं जीं कर्मै त्यांविषयीं आहे . आब्दिकश्राद्ध निरग्निकाला देखील पाकानें सांगितलें आहे ; म्हणून स्मार्ताग्निसाध्य आहे , असा नियम नाहीं . आणि ‘ त्या स्त्रियेला गृहांतरीं ठेऊन ’ या अर्थाचें पूर्वीं ( हेमाद्रींत ) वचनही सांगितलेलें आहे . सहाधिकार असेल तर इतर भार्या असतांही कसा अधिकार येईल ? कारण , ‘ ज्येष्ठ पत्नीबरोबरच अधिकार , इतरांबरोबर नाहीं ’ असा नियम आहे . इतर भार्या म्ह० ज्येष्ठा शुद्ध असतां असें म्हटलें तर त्या पूर्वोक्त नियमानेंच सिद्धि असल्यामुळें त्याविषयीं वचन ( पुष्पवत्स्वपि , पत्न्यंतरे इत्यादि ) व्यर्थ होईल , दुसरा पक्ष ( दोघे एकफलभागी असल्यामुळें सहाधिकार हा ) नाहीं . कारण , भ्राते अविभक्त असतां एकाला अशुचित्व असेल तर इतराला अधिकार प्राप्त होणार नाहीं . कारण , ते सारे भ्राते श्राद्धापासून झालेल्या एकफलाचे भागी आहेत . तिसरा पक्ष ( स्त्री पाक करणारी असल्यामुळें सहाधिकार हा ) ही नाहीं . कारण , आपण प्रवासांत आहे ( पत्नीजवळ नाहीं ) किंवा पत्नी दहा दिवसांपुढची सूतिका आहे अथवा रोगिणी वगैरे आहे अशा वेळीं देखील श्राद्ध करुं नये , असें प्राप्त होईल . आणि " बांधवांसह नव्या पात्रांनीं पाकाला आरंभ करावा " या देवलवचनांत ‘ आरभेत ’ हें आत्मनेपद असल्यामुळें स्वतः श्राद्धकर्त्याला व बांधवांना पाककर्तृत्व सांगितल्यानें विरोधही येतो . " तदनंतर जनककन्या सीता पाक करिती झाली " या पद्मपुराणादिवचनाच्या अर्थावरुन भार्येनें केलेला पाक प्रशस्त सांगितला आहे , म्हणून तें वचन कोणालाही ( इतरांनींही पाक करावा , असें म्हणणार्यांनाही ) अनिष्ट नाहीं . तेणेंकरुन ‘ हें पंचम दिवशीं करावें ’ अशा अर्थाचें दीपिकावचन युक्ति , मूलवचन इत्यादिकांचा अभाव असल्यामुळें कांहीं तरी आहे , असें समजावें . आतां जें श्राद्धदिवस प्राप्त असतां ज्याची भार्या रजस्वला असेल त्यानें त्या दिवशीं श्राद्ध करुं नये , पांचव्या दिवशीं करावें " हा श्लोक गौतमवचनाचा पाठ वेगळा ( येथें पूर्वीं दाखविला आहे तसा ) असून माधवीयांत निराळा ( वर लिहिल्याप्रमाणें ) दाखविला , व त्यावरुन पक्षांतर ( निराळा पक्ष , पांचव्या दिवशीं करावें हें ) सांगितलें . तेणेंकरुन देखील इष्ट अर्थाची सिद्धि होत नाहीं ; कारण , ‘ यस्य भार्या रजस्वला ’ या वचनाचा अर्थ - ज्या मृताची भार्या रजस्वला असेल त्याचें श्राद्ध तिनें त्या दिवशीं करुं नये , असा समजावा . यावरुन येथें हेमाद्रि भ्रमिष्ठ झाला . यावर पुष्कळ बोलावयाचें आहे तरी विस्तार होईल म्हणून बोलत नाहीं .