मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
श्राद्धांगतर्पण

तृतीय परिच्छेद - श्राद्धांगतर्पण

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .

आतां श्राद्धांगतर्पण सांगतो -

अथश्राद्धांगतर्पणम् ‍ पारिजातेपृथ्वीचंद्रोदयेचगर्गः पूर्वंतिलोदकंकृत्वाअमाश्राद्धंतुकारयेत् ‍ प्रत्यब्देनभवेत्पूर्वंपरेऽहनितिलोदकं पक्षश्राद्धेहिरण्येचअनुव्रज्यतिलोदकं नचनित्यतर्पणस्यायंपरेह्न्युत्कर्षः नतुश्राद्धांगतर्पणमस्तीतिवाच्य्म यस्तर्पयतितान् ‍ विप्रः श्राद्धंकृत्वापरेहनि पितरस्तेनतृप्यंतिनचेत्कुप्यंतिवैभृशमितिगर्गेणफलनिंदार्थवादाभ्यामंगत्वेनोक्तेः श्राद्धप्रक्रमाद्वार्षिकं बृहन्नारदीयेप्याब्दिकंप्रक्रम्य परेद्युः श्राद्धकृन्मर्त्योयोनतर्पयतेपितृन् ‍ तस्यतेपितरः क्रुद्धाः शापंदत्वाव्रजंतिहि पितृशब्दश्चश्राद्धेज्यवर्गपरः तेनतर्पणस्यपशुपुरोडाशयागवत्प्रस्तरप्रहरणवच्चेष्टदेवतासंस्कारकता तेनाब्दिकेदिनेनित्यंस्वपित्रादितर्पणंकार्यमेव श्राद्धां गभूतस्यैवपरेद्युरुक्तेः तदुक्तं प्रत्यब्दांगंतिलंदद्यान्निषिद्धेपिपरेहनि वर्गैकस्यवचोयेषामन्येषांतुविवर्जयेत् ‍ ।

पारिजातांत आणि पृथ्वीचंद्रोदयांत गर्ग - " अमावास्येस पूर्वीं तिलोदक देऊन नंतर श्राद्ध करावें . प्रतिसांवत्सरिक श्राद्धांत पूर्वीं तिलोदक नाहीं , दुसर्‍या दिवशीं तिलोदक द्यावें . पक्षश्राद्धांत व हिरण्यश्राद्धांत श्राद्ध झाल्यावर ब्राह्मणांस पोंचवून नंतर तिलोदक द्यावें . " आतां कोणी असें म्हणेल कीं , ‘ नित्यतर्पण करावयाचें तेंच सांवत्सरिकांत ह्या गर्गवचनाचें दुसर्‍या दिवशीं करावें म्हणून सांगितलें आहे . नित्यतर्पणावांचून निराळें श्राद्धाचें अंगभूत तर्पण नाहीं . ’ तर तसें त्याला म्हणतां येणार नाहीं ; कारण , " जो ब्राह्मण श्राद्ध करुन दुसर्‍या दिवशीं त्या पितरांना तर्पण करितो , त्या तर्पणानें पितर तृप्त होतात . त्यानें तर्पण केलें नाहीं तर पितर अत्यंत कुपित होतात . " या गर्गवचनानें तर्पण करणाराला फल व न करणाराची निंदा असें दोन अर्थवाद सांगितल्यावरुन तर्पण हें श्राद्धाचें अंग आहे असें होतें . श्राद्धाच्या उपक्रमावरुन ह्या वचनांतील श्राद्ध वार्षिक होय . बृहन्नारदीयांतही - आब्दिकश्राद्धाचा उपक्रम करुन सांगतो - " जो श्राद्ध करणारा मनुष्य दुसर्‍या दिवशीं पितरांचें तर्पण करीत नाहीं , त्याचे ते पितर क्रुद्ध होऊन शाप देऊन जातात . " या वचनांतील ‘ पितृ ’ हा शब्द श्राद्धांत पूज्य वर्गाचा बोधक आहे . यावरुन तर्पण हें इष्ट देवतेला ( पूज्य पित्रादिकांना ) एक प्रकारचा संस्कार करणारें आहे . जसें - ज्योतिष्टोमाचा अंगभूत जो अग्निषोमीय पशुयाग त्या ठिकाणीं असें आहे कीं , ‘ अग्नीषोमीयं पशुपरोडाशमेकादशकपालं निर्वपति ’ याचा अर्थ - अग्नीषोमदेवताक पशुपुरोडाशयाग एकादशकपालांत निर्वाप करुन करावा . तेथें पशुयागाची जी देवता अग्नीषोम तिलाच हा पुरोडाशयागसंस्कार आहे . हा प्रकार जैमिनीयन्यायमाला अध्याय १० पाद १ अधिकरण ९ या ठिकाणीं विवेचन करुन सांगितला आहे . तसें - श्राद्धाच्या ज्या देवता त्यांनाच हें तर्पण संस्कार करणारें आहे . आणि पूर्वीं अग्नौकरणप्रकरणीं प्रस्तरप्रहरण सांगितलें आहे तसेंही हें तर्पण समजावें . तेणेंकरुन प्रतिसांवत्सरिकाच्या दिवशीं पित्रादिकांचें नित्यतर्पण करावेंच . कारण , श्राद्धाचें अंगभूत जें तर्पण तेंच दुसर्‍या दिवशीं सांगितलें आहे . तेंच सांगतो - " प्रतिवार्षिकाचें अंगभूत तिलतर्पण , तर्पणाला निषिद्ध अशाही दुसर्‍या दिवशीं द्यावें . तें ज्या वर्गाचें श्राद्ध असेल त्या वर्गाला द्यावें , इतरांना वर्ज्य करावें . "

क्कचिद्विशेषमाहगर्गः कृष्णेभाद्रपदेमासिश्राद्धंप्रतिदिनंभवेत् ‍ पितृणांप्रत्यहंकार्यंनिषिद्धाहेपितर्पणं तर्पणंतिलतर्पणं निषिद्धाहेपीत्युक्तेः सकृन्महालयेश्वः स्यादष्टकास्वंतएवहि अत्रसप्तमीनिर्देशात् ‍ अंगितास्फुटैव तत्रजयान् ‍ जुहुयात् ‍ मंद्रंप्रायणीयायांमंद्रंप्रातः सवनेइत्यादिवत् ‍ अस्यापवादोबृहन्नारदीये वृद्धिश्राद्धेसपिंड्यांचप्रेतश्राद्धेनुमासिके संवत्सरविमोकेचनकुर्यात्तिलतर्पणं तदयमर्थः दर्शेविप्रनिमंत्रणोत्तरंपाकारंभोत्तरंवाश्राद्धप्रयोगस्यारब्धत्वात् ‍ ब्रह्मयज्ञोत्तरंनित्यतर्पणेनैवश्राद्धांगतर्पणस्यतंत्रेणप्रसंगेनवासिद्धिः ततः पूर्वंवैश्वदेवोत्तरंवाब्रह्मयज्ञकरणेश्राद्धांगतर्पणंपृथकार्यं पित्रोर्वार्षिकेतुनित्यतर्पणंतिलवर्ज्यंकार्यं नैवश्राद्धदिनेकुर्यात्तिलैम्तुपितृतर्पणं श्राद्धंकृत्वापराह्णेचतर्पणंतुतिलैः सहेतिवचनात् ‍ सप्तम्यांभानुवारेचमातापित्रोर्मृतेहनि तिलैर्यस्तर्पणंकुर्यास्तभवेत् ‍ पितृघातकइति स्मृतिरत्नावल्यांवृद्धमनूक्तेश्च अत्रनित्यतिलतर्पणेतिलमात्रनिषेधोनतुतर्पणस्य तिलैरित्यस्यवैयर्थ्यापत्तेः यत्तुकातीयम् ‍ उपरागेपितुः श्राद्धेपातेमायांचसंक्रमे निषिद्धेपिहिसर्वत्रतिलैस्तर्पणमाचरेदिति तत् ‍ परेद्युः श्राद्धांगतर्पणविषयमितिकेचित् ‍ श्राद्धाशक्तस्यतत्स्थानापन्नतर्पणविषयमितियुक्तं सकृन्महालयेपरेद्युस्तर्पणं अष्टकासुतुसप्तम्यष्टमीश्राद्धयोरंतेतदैववर्गद्वयस्य अन्वष्टक्येतुमातृवर्गस्यापि तीर्थश्राद्धेदर्शवत् ‍ माध्यादिष्वष्टकावदंते अनेकश्राद्धसंपातेतुयदितत्प्रसंगसिद्धिः तदातदीयमेवतर्पणं तंत्रत्वेतुश्राद्धसमसंख्यत्वेआदावंतेवा विषमसंख्यायांबह्वनुरोधइति तस्माच्छ्राद्धांगतर्पणंसिद्धम् ‍ ।

क्कचित्स्थलीं विशेष सांगतो गर्ग - " भाद्रपदमासीं कृष्णपक्षांत प्रतिदिवशीं पितरांचें श्राद्ध होतें त्या ठिकाणीं निषिद्धदिवशीं देखील प्रत्यहीं पितरांचें तर्पण करावें . " या वचनांत ‘ निषिद्ध दिवशीं देखील ’ असें म्हटलें आहे , म्हणून तर्पण म्हणजे तिलतर्पण समजावें . " सकृन्महालयीं ( भाद्रपदकृष्णपक्षीं एकवार महालय करावयाचा त्यापक्षीं ) दुसर्‍या दिवशीं तिलतर्पण . अष्टकाश्राद्धांत श्राद्धाच्या अंतींच तिलतर्पण करावें . " या वचनांत ‘ सकृन्महालये ’ , ‘ अष्टकासु ’ अशी सप्तमी विभक्ति केली आहे यावरुन सकृन्महालय इत्यादिश्राद्ध अंगि व तर्पण हें त्याचें अंग , असें स्पष्ट होतें . जसें - श्रौतांत ‘ येन कर्मणेर्त्सेत् ‍ तत्र जयान् ‍ जुहुयात् ‍ ’ हें वाक्य कोणत्याही यज्ञप्रकरणावांचून पठित आहे . त्याचा अर्थ - ज्या कर्मानें समृद्धि व्हावी , अशी इच्छा असेल त्या कर्मांत जयाहोम करावा . या वाक्यांत ‘ तत्र ’ या सप्तमी विभक्तीवरुन त्या कर्माचें जयाहोम अंग आहे , असें होतें . व जसें - प्रायणीय इष्टीचे ठायीं मंद स्वर सांगितला . प्रातः सवनांतही मंद स्वर सांगितला आहे . ते जसे - ‘ प्रातः सवने ’ इत्यादि सप्तमीवरुन प्रातः सवनाचा मंद स्वर अंग आहे तसेंच हें तर्पण श्राद्धाचें अंग होय . या तिलतर्पणाचा अपवाद बृहन्नारदीयांत - " वृद्धिश्राद्ध , सपिंडीकरण , प्रेतश्राद्ध , अनुमासिक , संवत्सरविमोकश्राद्ध ( अब्दपूर्तिश्राद्ध ) इतक्या ठिकाणीं तिलतर्पण करुं नये . " ह्या वरील सर्व तर्पणवचनाचा भावार्थ असा - दर्शाचे ठायीं ब्राह्मणनिमंत्रण झाल्यावर किंवा पाकारंभ झाल्यानंतर श्राद्धप्रयोगाला आरंभ झाल्यामुळें ब्रह्मयज्ञोत्तर करावयाचें जें नित्यतर्पण त्यानेंच श्राद्धांगतर्पणाची तंत्रानें किंवा प्रसंगानें सिद्धि होते . विप्रनिमंत्रणाच्या किंवा पाकारंभाच्या पूर्वीं ब्रह्मयज्ञ केला असतां अथवा श्राद्धांतीं वैश्वदेव झाल्यावर ब्रह्मयज्ञ असतां श्राद्धांग तर्पण निराळें करावें . मातापितरांच्या वार्षिक श्राद्धाचे दिवशीं नित्यतर्पण तिलरहित करावें . कारण , " श्राद्धाच्या दिवशीं तिलांनीं पितृतर्पण करुं नये . श्राद्ध करुन अपराह्णीं तिलतर्पण करावें " असें वचन आहे . आणि " सप्तमी , भानुवार , व आईबापांचे मृतदिवस यांचे ठायीं जो मनुष्य तिलांनीं तर्पण करील तो पितरांचा घात करणारा होईल " असें स्मृतिरत्नावलींत वृद्धमनूचें वचनही आहे . नित्य तिलतर्पण करीत असेल तर येथें तिलांचा मात्र निषेध आहे . तर्पणाचा निषेध नाहीं . तर्पणाचा निषेध मानला तर वचनांत ‘ तिलैः ’ हें पद व्यर्थ होईल . आतां जें कातीयवचन - " चंद्र - सूर्य - ग्रहण , बापाचें श्राद्ध , व्यतीपात , अमावास्या , संक्रांति यांचे ठायीं तर्पणाला निषिद्ध दिवस असतांही तिलांनीं तर्पण करावें " असें आहे , तें दुसर्‍या दिवशीं श्राद्धांगतर्पणविषयक आहे , असें केचित् ‍ म्हणतात . श्राद्धाविषयीं अशक्त असेल त्याला श्राद्धाच्या स्थानीं तर्पण सांगितलें आहे त्याविषयीं हें कातीयवचन आहे , असें म्हणणें युक्त आहे . सकृन्महालयाचे ठायीं दुसर्‍या दिवशीं तर्पण करावें . अष्टकांमध्यें सप्तमीश्राद्धांत व अष्टमीश्राद्धांत त्याच वेळीं अंतीं दोन वर्गाचें ( पितृवर्ग व मातामहवर्ग यांचें ) तर्पण करावें . अन्वष्टक्यांत मातृवर्गाचेंही करावें . तीर्थश्राद्धांत दर्शाप्रमाणें करावें . माघ्यावर्षादिकश्राद्धांत अष्टकाप्रमाणें अंतीं करावें . अनेक श्राद्धांचा संपात असतां एक श्राद्धानें इतरांची प्रसंगसिद्धि असेल तर ज्यांचें श्राद्ध केलें असेल त्यांचेंच तर्पण करावें . विरुद्धतर्पणाच्या श्राद्धांचें तंत्र असतां श्राद्धांची समसंख्या असेल तर आधीं किंवा अंतीं करावें . विषमसंख्या असेल तर बहुत श्राद्धांच्या अनुरोधानें तर्पण करावें . तस्मात् ‍ श्राद्धांगतर्पण सिद्ध झालें .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP