मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
अस्थिसंचय

तृतीय परिच्छेद - अस्थिसंचय

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां अस्थिसंचय सांगतो -

अथास्थिसंचयः तत्राश्वलायनेनचकृष्णपक्षेएकादशीत्रयोदशीदर्शेषुअषाढाफल्गुनीप्रोष्ठपदाभिन्नर्क्षेउक्तं तदाशौचमध्येऽसंभवेतदूर्ध्वंचप्रागब्दात्करणेज्ञेयं आशौचमध्येतुमदनरत्नेसंवर्तः प्रथमेह्नितृतीयेवासप्तमेनवमेतथा अस्थिसंचयनंकार्यंदिनेतद्गोत्रजैः सह छंदोगपरिशिष्टेतु अपरेद्युस्तृतीयेवाअस्थिसंचयनं भवेदिति द्वितीयेप्युक्तं विष्णुकात्यायनौ संचयनंचतुर्थ्यामिति माधवीयेयमः भौमार्कमंदवारेषुतिथियुग्मेविवर्जयेत् वर्जयेदेकपादर्क्षेद्विपादर्क्षेस्थिसंचयं प्रदातृजन्मनक्षत्रेत्रिपादर्क्षेविशेषतः ब्राह्मे चतुर्थे ब्राह्मणानांतुपंचमेहनिभूभृतां नवमेवैश्यजातीनांशूद्राणांदशमात्परं दशमेहनीतिवापाठः शौनकः पलाशेष्वस्थिदाहेचसद्यः संचयनंभवेत् काम्यमरणेतुतस्यत्रिरात्रमाशौचम् द्वितीयेत्वस्थिसंचयइत्युक्तं अंगिराः प्रेतीभूतंतथोद्दिश्ययः शुचिर्नकरोतिचेत् देवतानांतुयजनंतंशपंत्यथदेवताः तद्विधिः स्वस्वसूत्रेभट्टकृतौचज्ञेयः ।

तें अस्थिसंचयन आश्वलायनानें - कृष्णपक्षांत एकादशी , त्रयोदशी व दर्श यांचे ठायीं पूर्वाषाढा , उत्तराषाढा , पूर्वा फल्गुनी , उत्तरा फल्गुनी , पूर्वा भाद्रपदा , उत्तरा भाद्रपदा ह्यावांचून इतर नक्षत्रांवर करावें , असें सांगितलें आहे , तें आशौचामध्यें असंभव असतां आशौचानंतर वर्षाच्या आंत करणें असेल तर समजावें . आशौचामध्यें तर सांगतो मदनरत्नांत संवर्त - प्रथम दिवशीं ( दाह केलेल्या दिवशीं ) किंवा तिसर्‍या दिवशीं अथवा सातव्या व नवव्या दिवशीं दिवसा गोत्रजांसह अस्थिसंचयन करावें . " छंदोगपरिशिष्टांत तर - " दुसर्‍या दिवशीं किंवा तिसर्‍या दिवशीं अस्थिसंचयन होतें " असें दुसर्‍या दिवशीं देखील सांगितलें आहे . विष्णु कात्यायन - संचयन चवथ्या दिवशीं असें सांगतात . माधवीयांत यम - " भौम , रवि , मंद ह्या वारीं ; आणि युग्मतिथीस अस्थिसंचयन वर्ज्य करावें . एकपाद व द्विपाद नक्षत्रांवर अस्थिसंचयन वर्ज्य करावें . कर्त्याच्या जन्मनक्षत्रावर व त्रिपादनक्षत्रावर विशेषेंकरुन वर्ज्य करावें . " ब्राह्मांत - चवथ्या दिवशीं ब्राह्मणाचें अस्थिसंचयन करावें . पांचव्या दिवशीं राजांचें करावें . वैश्यांचें नवव्या दिवशीं करावें . आणि शूद्रांचें अस्थिसंचयन दहाव्या दिवसाच्या पुढें करावें " अथवा दहाव्या दिवशीं करावें , असें पाठांतर आहे . शौनक - " पर्णशरदाह आणि अस्थिदाह असतां सद्यः ( तत्काळीं ) अस्थिसंचयन होतें . " काम्य मरण असेल तर त्याचें तीन दिवस आशौच आणि दुसर्‍या दिवशीं अस्थिसंचयन ; असें सांगितलें आहे . अंगिरा - " जो मनुष्य शुचि असून प्रेताच्या उद्देशेंकरुन देवतांचें यजन करीत नाहीं त्याला देवता शाप देतात . " त्याचा विधि आपापल्या सूत्रांत व भट्टांनीं केलेल्या अंत्येष्टिपद्धतींत जाणावा .

हेमाद्रौनागरखंडे त्रीणिसंचयनस्यार्थेतानिवैशृणुसांप्रतं यत्रस्थानेभवेन्मृत्युस्तत्रश्राद्धंप्रकल्पयेत् एकोद्दिष्टंततोमार्गेविश्रामोयत्रकारितः ततः संचयनस्यार्थेतृतीयंश्राद्धमिष्यते अपरार्केमदनरत्नेचब्राह्मे सद्यः शौचेतथैकाहेसद्यः संचयनंभवेत् त्र्यहाशौचेतृतीयेह्निकर्तव्यस्त्वस्थिसंचयः तत्रैव श्मशानदेवतायागं चतुर्थेदिवसेचरेत् मृन्मयेषुचभांडेषुकुंभेषुरुचकेषुवा सुपक्कैर्भक्ष्यभोज्यैश्चपायसैः पानकैस्तथा फलैर्मूलैर्वनोत्थैश्चपूज्याः क्रव्याददेवताः धूपोदीपस्तथामाल्यमर्घ्यंदेयंत्वरान्वितैः तत्रपात्राणिपूर्णानिश्मशानाग्नेः समंततः निवेदयद्भिर्वक्तव्यंतैः सर्वैरनहंकृतैः नमः क्रव्यादमुख्येभ्योदेवेभ्यइतिसर्वदा येत्रश्मशानेदेवाः स्युर्भगवंतः सनातनाः तेस्मत्सकाशाद्गृह्णंतुबलिमष्टांगमक्षयं प्रेतस्यास्यशुभांल्लोकान्प्रयच्छंतुचशाश्वतान् अस्माकमायुरारोग्यंसुखंचददतांचिरं एवंकृत्वाबलीन्सर्वान्क्षीरेणाभ्युक्ष्यवाग्यतः एवंदत्वाबलिंचैवदद्यात्पिंडत्रयंबुधः एकं स्मशानवासिभ्यः प्रेतायैवतुमध्यमं तृतीयंतत्सखिभ्यश्चदक्षिणासंस्थमादरात् ततोयज्ञियवृक्षोत्थांशाखामादायवाग्यतः प्रेतस्यास्थीनिगृह्णातिप्रधानांगोद्भवानिच शिरसोवक्षसः पाण्योः पार्श्वाभ्यांचैवपादतः पंचगव्येन संस्नाप्यक्षौमवस्त्रेणवेष्ट्यच प्रक्षिप्यमृन्मयेभांडेनवेसाच्छादनेशुभे अरण्येवृक्षमूलेवाशुद्धेसंस्थापयत्यपि गृहीत्वास्थीनितद्भस्मनीत्वातोयेविनिक्षिपेत् ततः संमार्जनंभूमेः कर्तव्यंगोमयांबुभिः पूजांचपुष्पधूपाद्यैर्बलिभिः पूर्ववत्क्रमादिति ।

हेमाद्रींत नागरखंडांत - " अस्थिसंचयनाकरितां तीन श्राद्धें सांगतों तीं ऐक ! ज्या स्थानीं मरण होईल तेथें श्राद्ध एकोद्दिष्ट करावें . तदनंतर मार्गामध्यें जेथें विश्रांति घेतली असेल तेथें एकोद्दिष्ट करावें . तदनंतर अस्थिसंचयनाकरितां तिसरें श्राद्ध करावें . " अपरार्कांत मदनरत्नांत ब्राह्मांत - " सद्यः शौचांत व एक दिवसाचे आशौचांत सद्यः अस्थिसंचयन होतें . तीन दिवसांचे आशौचांत तिसर्‍या दिवशीं अस्थिसंचयन करावें . " तेथेंच - " श्मशानांतील देवतांचा याग ( बलिदानादि ) मातीच्या भांड्यांत किंवा रुचक कुंभांत चवथ्या दिवशीं करावा . तो असा - लाडू , भात , पायस , पन्हीं , वनांतील फळें , मूळें यांनीं राक्षस देवतांची पूजा करावी . धूप , दीप , पुष्प , अर्घ्य हीं त्वरेनें द्यावीं . त्या ठिकाणीं वरील पदार्थांनीं भरलेलीं मातीचीं वगैरे पात्रें श्मशानाग्नीच्या आसमंताद्भागीं सर्वांनीं ( पुत्रादिकांनीं ) निवेदन करुन अहंकाररहित होऊन पुढील प्रार्थनावाक्य म्हणावें - तें असें - ‘ नमः क्रव्यादमुख्येभ्यो देवेभ्य इति सर्वदा । येऽत्र श्मशानो देवाः स्युर्भगवंतः सनातनाः । तेऽस्मत्सकाशात् गृह्णंतु बलिमष्टांगमक्षयं । प्रेतस्यास्य शुभान् लोकान् प्रयच्छंतु च शाश्वतान् । अस्माकमायुरारोग्यं सुखं च ददतां चिरं । ’ याप्रमाणें प्रार्थना करुन सर्व बलींवर दूध घालून वाणीचें नियमन करुन बलि देऊन तीन पिंड द्यावे . ते असे - एक पिंड श्मशानवासियांना द्यावा . प्रेताला मध्यम ( दुसरा ) पिंड द्यावा . तिसरा पिंड प्रेतसखीला द्यावा . हे उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमें देत जावे . तदनंतर यज्ञिय ( उंबर , पळस इत्यादि ) वृक्षांची शाखा घेऊन प्रेताच्या प्रधान अंगांच्या अस्थि घ्याव्या . त्या अशा - मस्तकाच्या , वक्षस्थलाच्या , हाताच्या , बरगड्यांच्या , व पायांच्या घ्याव्या . त्या अस्थि पंचगव्यानें धुवून रेशमी वस्त्रानें वेष्टून मातीच्या नव्या चांगल्या भांड्यांत ठेऊन त्याच्यावर आच्छादन घालून अरण्यांत किंवा वृक्षाच्या बुंधांत चांगल्या शुद्ध जागेवर पुरुन ठेवाव्या . इतर अस्थि व त्या ठिकाणची राख भरुन पाण्यांत नेऊन टाकावी . तदनंतर गोमय व उदक यांनीं ती भूमी सारवून टाकावी . तदनंतर पुष्प , धूप इत्यादि उपचारांनीं व बलींनीं पूर्वींप्रमाणें अनुक्रमें पूजाही करावी . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP