आतां पाणिहोम सांगतो -
अथपाणिहोमः आश्वलायनः अभ्यनुज्ञायांपाणिष्वेववेति पिंडपितृयज्ञकल्पाभावेनाग्न्यभावेकाम्यादिष्वित्यर्थः तेनबह्वृचानामेकोद्दिष्टेपाणिहोमोभवत्येव निषेधोऽन्यपरः पाणिष्वितिबहुवचनात्सर्वविप्रपाणिषुहोमइतिवृत्तिः एवंमातामहेपि शौनकोपि सर्वेषामुपविष्टानांविप्राणामथपाणिषु विभज्यजुहुयात्सर्वंसोमायेत्यादिमंत्रतः यत्तुहेमाद्रौकात्यायनः पित्रेयः पंक्तिमूर्धन्यस्तस्यपाणावनग्निकः हुत्वामंत्रवदन्येषां तूष्णींपात्रेषुनिक्षिपेदितिद्बह्वृचातिरिक्तानां यत्तुतत्रैवमात्स्ये अग्न्यभावेतुविप्रस्यपाणौवाथजलेपिवा अजकर्णेऽश्वकर्णेवागोष्ठेवाथशिलांतिकइति तत्तीर्थश्राद्धविषयं तद्यदापांसमीपेस्याच्छ्राद्धंज्ञेयोविधिस्तदेतितत्रैवकात्यायनोक्तेः निर्जलेऽजकर्णादौ यत्तुचंद्रोदयेयमः दैवविप्रकरेनग्निः कृत्वाग्नौकरणंद्विजइति तदभार्यपरम् अपत्नीकोयदाविप्रः श्राद्धंकुर्वीतपार्वणं पित्र्यविप्रैरनुज्ञातोविश्वेदेवेषुहूयतेइति तत्रैवकात्यायनोक्तेः हूयतेइतिछांदसोव्यत्ययः हेमाद्रौवायवीये विधुरोदैविकेकुर्याच्छेषंपित्र्येनिवेदयेत् दैवविप्रानेकत्वेतत्रैव वैश्वदेवेयदैकस्मिन् भवेयुर्व्द्यादयोद्विजाः तदैकपाणौहोतव्यंस्याद्विधिर्विहितस्तदा सोप्याद्यः प्रथमंवानियम्येतेतिन्यायात् तेनमृतभार्यस्यदैवेहोमः अनुपनीतब्रह्मचार्यादेस्तुपित्र्ये अग्न्यभावः स्मृतस्तावद्यावद्भार्यांनविंदतीतिहेमाद्रौजातूकर्ण्योक्तेः सभार्यनष्टाग्नेरपिपित्र्यविप्रकरेइतिपृथ्वीचंद्रः उपवीतित्वेनदैवेहोमः प्राचीनावीतेनपित्र्ये यद्वासर्वत्रदैवपित्र्यकरयोर्विकल्पइतिहेमाद्रौमदनरत्नेपारिजातेच यदातुपितृमातामहयोर्दैवपित्र्यविप्रभेदस्तदाभेदेनपाणिहोमइत्यपरार्कचंद्रिकादयः यदातुदैवंतंत्रंतदातंत्रेणसकृदेवपाणिहोमइतिकेचित् हेमाद्रिस्तु मातामहस्यभेदेपिकुर्यात्तंत्रेचसाग्निकइतिकातीयस्मृतेर्भेदमाह एवंपित्र्येपि माधवीयेप्येवं एवंसाग्नेरपिविदेशादौपाणिहोमोज्ञेयः यत्तुकर्केणाग्निंविनाश्राद्धमेवनास्तीत्युक्तम् तत्सपिंडीकरणवार्षिकाद्यकरणापत्तेर्यत्किंचिदेव यत्तुबृहन्नारदीये अनग्निर्दूरभार्यश्चपार्वणेसमुपस्थिते भ्रातृभिः कारयेच्छ्राद्धंसाग्निकैर्विधिवद्दिजाः क्षयाहदिवसेप्राप्तेस्वस्याग्निर्दूरगोयदि तथैवभ्रातरः स्युश्चेल्लौकिकाग्नावितिस्थितिः औपासनाग्नौदूरस्थेसमीपेभ्रातरिस्थिते यद्यग्नौजुहुयाद्वापिपाणौवासहिपातकी औपासनाग्नौदूरस्थेकेचिदिच्छंतिसत्तमाः पाणावेवतुहोतव्यमितिनैतत्समंजसं तद्वृद्धानादरादुपेक्ष्यम् हेमाद्रौयमः अग्नौकरणवत्तत्रहोमोविप्रकरेभवेत् पर्युक्ष्यदर्भानास्तीर्ययतोह्यग्निसमोद्विजः मेक्षणेनकरेणवाहोमः मेक्षणप्रवरणंनेतिवृत्तिः स्मृतिरत्नावल्याम् नानुज्ञापाणिहोमेस्यान्नस्तः पर्यूहनोक्षणे नाग्नेतमद्यादितिचनस्यातामिध्ममेक्षणे कर्काचार्योप्येवमाह माधवीयेचंद्रिकायांचानुज्ञादिसर्वंभवतीत्युक्तं ।
आश्वलायन - " अथवा अभ्यनुज्ञा असतां हातावरच होम करावा " म्हणजे पिंडपितृयज्ञकल्पाच्या अभावानें अग्नीचा अभाव असतां अर्थात् काम्यादिक श्राद्धांत हातांवर होम करावा ; असा ह्या आश्वलायनसूत्राचा अर्थ आहे . यावरुन बह्वृचांना एकोद्दिष्टांत पाणिहोमच होतो . एकोद्दिष्टांत जो पाणिहोमनिषेध तो इतरविषयक आहे . सूत्रांत ‘ पाणिषु ’ असें बहुवचन आहे म्हणून सार्या ब्राह्मणांच्या हातांवर होम करावा , असें वृत्तिकार सांगतो . याचप्रमाणें मातामहपार्वणाचे ठायींही समजावें . शौनकही - " सारे उपविष्ट ( बसलेले ) जे ब्राह्मण त्यांच्या हातांवर , अन्नाचा विभाग करुन ‘ सोमाय० ’ इत्यादि मंत्रांनीं होम करावा . " आतां जें हेमाद्रींत कात्यायन सांगतो कीं , " पित्र्यब्राह्मणांच्या पंक्तींत जो पहिला ब्राह्मण त्याच्या हातावर अनग्निकानें समंत्रक होम करावा , इतर ब्राह्मणांच्या पात्रांवर तूष्णीं ( मंत्रावांचून ) अन्न ठेवावें " तें बह्वृचातिरिक्तांना समजावें . आतां जें तेथेंच ( हेमाद्रींत ) मात्स्यांत - " अग्नीच्या अभावीं ब्राह्मणाच्या हातांवर अथवा उदकांत किंवा बोकडाच्या कानांत किंवा घोड्याच्या कानांत अथवा गोठ्यांत किंवा दगडाच्या समीप होम करावा " तें तीर्थश्राद्धविषयक आहे . कारण , " जेव्हां उदकाच्या समीप श्राद्ध होईल तेव्हां तो विधि जाणावा " असें तेथेंच कात्यायनवचन आहे . निर्जलदेशीं अजकर्णादिकांत होम समजावा . आतां जें चंद्रोदयांत यम सांगतो कीं , " निरग्निक ब्राह्मणानें अग्नौकरण देवब्राह्मणाच्या हातावर करावें " तें भार्येच्या अभावविषयक आहे ; कारण , " जेव्हां पत्नीरहित ब्राह्मण पार्वणश्राद्ध करील तेव्हां पित्र्यब्राह्मणांची अनुज्ञा घेऊन त्यानें विश्वेदेवब्राह्मणांच्या हातांवर होम करावा " असें तेथेंच कात्यायनवचन आहे . वचनांत ‘ हूयते ’ हें कर्मणि क्रियापद छांदस ( आर्ष ) असल्यामुळें विपर्यासानें झालेलें आहे , तें कर्तरि समजावें . हेमाद्रींत वायवीयांत - " विधुरानें देवांकडे होम करावा , शेष अन्न पित्रांकडे निवेदन करावें . " देवांकडे ब्राह्मण अनेक असतील तर तेथेंच सांगतो - " जेव्हां विश्वेदेवांकडे दोन - चार इत्यादिक ब्राह्मण असतील तेव्हां एकाच्या हातावर होम करावा , म्हणजे शास्त्रोक्त विधि होतो . " तो ब्राह्मण पहिला समजावा ; कारण , " प्रथम जो असेल त्याचा नियम करावा , कारणावांचून प्रथमाचा अतिक्रम करुं नये " असा न्याय ( जैमिनिसूत्र ) आहे . यावरुन ज्याची भार्या मृत असेल त्याचा होम देवांकडे होतो , अनुपनीत व ब्रह्मचारी इत्यादिकांचा पित्रांकडे होम . कारण , जोंपर्यंत भार्या प्राप्त नाहीं तोंपर्यंत अग्नीचा अभाव , अर्थात् सर्वथा अग्न्यभाव नाहीं . " असें हेमाद्रींत जातूकर्ण्यवचन आहे . भार्यायुक्त असून नष्टाग्नि असेल त्याचाही पित्र्यब्राह्मणांच्या हातांवर होम , असें पृथ्वीचंद्र सांगतो . उपवीतीनें देवांकडे होम आणि प्राचीनावीतीनें पित्रांकडे होम करावा . अथवा सर्वत्र देवांच्या व पितरांच्या ब्राह्मणांच्या हातांवर होमाचा विकल्प आहे , असें हेमाद्रींत मदनरत्नांत व पारिजातांतही आहे . जेव्हां पितृपार्वणाच्या व मातामहपार्वणाच्या देवांचे ब्राह्मण व पितरांचे ब्राह्मण भिन्न असतील तेव्हां भेदानें ( वेगळेपणानें ) पाणिहोम होतो , असें अपरार्क , चंद्रिका इत्यादि ग्रंथकार सांगतात . जेव्हां दोन्ही पार्वणांच्या देवांचें तंत्र असेल तेव्हां तंत्रानें एकवारच पाणिहोम असें केचित् म्हणतात . हेमाद्रि तर - " मातामहांचा भेद असला तरी व तंत्र असलें तरी साग्निकानें होम भिन्न करावा . " अशी कातीयस्मृति आहे म्हणून होमाचा भेद सांगतो . याचप्रमाणें पित्र्यब्राह्मणांकडेही समजावें . माधवीयांतही असेंच आहे . याप्रमाणें साग्निकालाही परदेशीं वगैरे पाणिहोम समजावा . आतां जें कर्कानें ‘ अग्नीवांचून श्राद्धच नाहीं ’ असें सांगितलें तें सांगणें यत्किंचित् ( कांहीं तरी ) आहे ; कारण , अग्नीवांचून श्राद्ध नसेल तर अनग्निकाला सपिंडीकरण वार्षिक इत्यादिकांचा अभाव प्राप्त होईल . आतां जें बृहन्नारदीयांत सांगतो कीं , " ज्याचा अग्नि नाहीं व ज्याची भार्या दूर आहे त्याला पार्वणश्राद्ध प्राप्त असतां त्यानें साग्निक भ्रात्यांकडून यथाविधि श्राद्ध करवावें . मातापितरांचा क्षयदिवस प्राप्त असून आपला अग्नि जर दूर आहे व भ्रातेही तसेच आहेत तर लौकिकाग्नीवर होम करावा , अशी शास्त्रमर्यादा आहे . जर औपासनाग्नि दूर आहे व समीप भ्राता आहे व त्याच्या अग्नीवर होम करील किंवा हातावर होम करील तर तो पातकी होतो . औपासनाग्नि दूर असतं केचित् विद्वान् ‘ हातावरच होम करावा ’ असें इच्छितात , पण हें चांगलें नाहीं . " हें सारें मत वृद्धांनीं स्वीकारलें नाहीं म्हणून उपेक्ष्य ( अग्राह्य ) आहे . हेमाद्रींत यम - " हातावर होम करावयाचा त्या वेळीं अग्नौकरणाप्रमाणें पर्युक्षणपरिस्तरण करुन ब्राह्मणाच्या हातावर होम करावा ; कारण , ब्राह्मण अग्नीसारखा आहे . " मेक्षणानें किंवा हातानें होम करावा . मेक्षणाचें प्रहरण नाहीं , असें वृत्तिकार सांगतो . स्मृतिरत्नावलींत - " पाणिहोमाचे ठिकाणीं अनुज्ञा नाहीं , परिसमूहन व पर्युक्षण नाहीं , ‘ अग्नेतमद्या० ’ हा मंत्र नाहीं आणि इध्मा व मेक्षण हीं नाहींत . " कर्काचार्यही असेंच सांगतो . माधवीयांत व चंद्रिकेंत पाणिहोमाचे ठायीं अनुज्ञा इत्यादिक सर्व आहे असें सांगितलें आहे .
पाणिहोमेप्रश्नाद्याहापरार्केशौनकः अनग्निश्चेदाज्यंगृहीत्वाभवत्स्वेवाग्नौकरणमितिपूर्ववत्तथास्त्विति आश्वलायनः यदिपाणिष्वाचांतेष्वन्यदन्नमनुदिशत्यन्नमन्नेसृष्टंदत्तमृध्नुकमिति
पाणौहुतंपात्रेनिधायविप्रैराचम्यभोजनार्थमन्नेपरिविष्टेहुतशेषंपात्रेषुदद्यादित्यर्थः सृष्टंप्रभूतं नैमित्तिकंचेदमाचमनं नहुतभक्षणनिमित्तम् अन्नंपाणितलेदत्तंपूर्वमश्नंत्यबुद्धयः पितरस्तेनतृप्यंतिशेषान्नंनलभंतिते यच्चपाणितलेदत्तंयच्चान्यदुपकल्पितं एकीभावेनभोक्तव्यंपृथग्भावोनविद्यतेइतिबह्वृचपरिशिष्टात् हेमाद्रावप्याचमनेहेत्वर्थवादउक्तः
पाण्यास्योहिद्विजः स्मृतइति भाष्येत्वाचांतेषुभक्षितेषु चमुभक्षणेभक्षणोत्तरंचनाचमनं अग्निसाम्यात् पूर्वनिषेधस्तुसपिंडीकरणेज्ञेयः ददातिचोदितत्वात् नत्वत्र जुहोतिचोदितत्वादित्युक्तं नत्वेतद्बहुसंमतं यत्तुबौधायनेन
तस्मिंस्तुप्राशितेदद्याद्यदन्नंप्रकृतंभवेदितिभक्षणमुक्तं तत्तच्छाखीयानामेवेतिहेमाद्रिः तत्रैवयमः पित्र्यपाणिहुताच्छेषंपितृपात्रेषुनिक्षिपेत् अग्नौकरणशेषंतुनदद्याद्वैश्वदेविके एतदग्निहोमेषिसमं कर्कस्तुसूत्रेहुत शेषंदत्वेत्यविशेषात् सर्वविप्रेषुदद्यादित्याह तत्रैववृद्धवसिष्ठः पित्र्यविप्रकरेहुत्वाशेषंपात्रेषुनिक्षिपेत् पिंडेभ्यः शेषयेत्किंचिन्नदद्याद्वैश्वदेविके ।
पाणिहोमाविषयीं प्रश्नादिक सांगतो अपरार्कांत शौनक - " अनग्निकानें आज्य ग्रहण करुन पूर्वीप्रमाणें ( अग्नौकरणाप्रमाणें ) ‘ भवत्स्वेवाग्नौकरणं ’ इत्यादि प्रश्न करावा व ब्राह्मणांनीं अनुज्ञाही द्यावी . " आश्वलायन - " जर हातावर होम केला तर ब्राह्मणांनीं हातावरचें अन्न पात्रांवर ठेऊन उठून आचमन करुन बसल्यावर भोजनासाठीं पात्रांवर दुसरें अन्न वाढून झाल्यावर होम शेष राहिलेलें अन्न पात्रांवर वाढावें . व ब्राह्मण तृप्त होऊन शेष पात्रावर राहील असें अन्न वाढावें . " येथें आश्वलायननांनीं आचमन सांगितलें हें नैमित्तिक आहे . हातावर हवन केलेल्या अन्नाचें भक्षण करुन त्या भक्षणनिमित्तक आचमन नव्हे ; कारण , " हातावर दिलेलें अन्न अबुद्धि ( अज्ञानी ) असतील ते पूर्वीं भक्षण करितात . त्यांच्या त्या भक्षणानें पितर तृप्त होऊन पुढें दिलेलें अन्न पितरांस प्राप्त होत नाहीं . जें हातांवर दिलेलें अन्न तें व जें दुसरें दिलेलें अन्न तें एकत्र करुन भोजन करावें ; त्या दोन्हीं अन्नांचें पार्थक्य करुं नये " असें बह्वृचपरिशिष्टानें पूर्वीं अन्नभक्षण निषिद्ध केलें आहे . हेमाद्रींतही आचमनाविषयीं हेतुमूलक अर्थवाद ( स्तुतिरुप ) सांगितला आहे , तो असा - " ब्राह्मणाचा हात हेंच मुख असें सांगितलें आहे . " भाष्यांत तर - ‘ आचांतेषु ’ या सूत्रांतील पदाचा अर्थ - ब्राह्मणांनीं अन्न भक्षण केलें असतां दुसरें अन्न वाढावें , असा आहे . ‘ आचांतेषु ’ यांत ‘ चमु ’ धातूचा अर्थ भक्षण आहे . भक्षण केल्यावर आचमन नाहीं . कारण , ब्राह्मण अग्निसमान आहे . पूर्वीं ( बह्वृचपरिशिष्टांत ) उक्त जो भक्षणाचा निषेध तो सपिंडीकरणांत समजावा . कारण , सपिंडीकरणांत ‘ ददाति ’ ह्या पदानें ब्राह्मणाच्या हातावर अन्न देण्यास सांगितलें आहे तें भक्षण करुं नये . या ठिकाणीं ‘ जुहोति ’ या पदानें होम सांगितला आहे म्हणून तें भक्षण करावें , असें ( भाष्यांत ) सांगितलें . हें मत बहुतांला संमत नाहीं . आतां जें बौधायनानें " हातावरचें अन्न प्राशन केलें असतां जें अन्न भोजनासाठीं केलेलें असेल तें द्यावें " असें भक्षण सांगितलें तें बौधायनशाखी असतील त्यांनाच समजावें , असें हेमाद्रि सांगतो . तेथेंच यम - " पित्र्य ब्राह्मणांच्या हातांवर होम करुन शेष असलेलें अन्न पित्र्यपात्रांवर द्यावें . अग्नौकरणाचें शेष विश्वेदेवब्राह्मणांच्या पात्रांवर देऊं नये . " हें सांगणें अग्निहोमाविषयींही समान आहे . कर्काचार्य तर - " सूत्रांत ‘ हुतशेष देऊन ’ असें सामान्य सांगितलें आहे म्हणून सर्व ब्राह्मणांच्या पात्रांवर द्यावें " असें सांगतो . तेथेंच वृद्धवसिष्ठ - " पित्र्यब्राह्मणांच्या हातांवर होम करुन शेष राहिलेलें अन्न किंचित् पिंडांला देऊन बाकीचें पित्र्य ब्राह्मणांच्या पात्रांवर द्यावें , विश्वेदेवांच्या पात्रांवर देऊं नये . "