मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
पितर

तृतीयपरिच्छेद - पितर

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां पितर सांगतो -

अथपितरः हेमाद्रौमात्स्यदेवलौ नामगोत्रंपितृणांतुप्रापकंहव्यकव्ययोः अग्निष्वात्तादयस्तेषामाधिपत्येव्यवस्थिताः नाममंत्रास्तदादेशाभवांतरगतानपि प्राणिनः प्रीणयंत्येवतदाहारत्वमागतान् ‍ देवोयदिपिताजातः शुभकर्मानुयोगतः तस्यान्नममृतंभूत्वादेवत्वेप्यनुगच्छति गांधर्वेभोगरुपेणपशुत्वेचतृणंभवेत् ‍ श्राद्धान्नं वायुरुपेणनागत्वेप्युपतिष्ठति पानंभवतियक्षत्वेराक्षसत्वेतथामिषम् ‍ दनुजत्वेतथामद्यंप्रेतत्वेरुधिरोदकम् ‍ मनुष्यत्वेन्नपानादिनानाभोगकरंभवेत् ‍ अत्रपित्रादिशब्दैर्जनकादीनामेवदेवतात्वमुच्यते नवस्वादीनाम् ‍ असावेतत्तेइतियजमानस्यपित्रेइतिशतपथश्रुतेः यस्यपिताप्रेतः स्यात्सपित्रेपिंडंनिधायेतिविष्ण्वादिस्मृतेश्च यत्तुमनुदेवलौ वसवः पितरोज्ञेयारुद्राज्ञेयाः पितामहाः प्रपितामहास्तथादित्याः श्रुतिरेषासनातनी यच्च याज्ञवल्क्यः वसुरुद्रादितिसुताः पितरः श्राद्धदेवताइति तदभेदध्यानार्थं यानितुहेमाद्रौनंदिपुराणे विष्णुः पितास्यजगतोदिव्योयज्ञः सएवच ब्रह्मापितामहोज्ञेयोह्यहंचप्रपितामहइति यच्चभविष्ये अनिरुद्धः स्वयंज्ञेयः प्रद्युम्नश्चपितास्मृतः संकर्षणस्तज्जनकोवासुदेवस्तुतत्पिता स्वयंकर्ता यत्तुतत्रैव प्रथमोवरुणोज्ञेयः प्राजापत्यस्तथापरः तृतीयोग्निः स्मृतः पिंडोह्येषपिंडविधिः स्मृतः यच्चमनुः सोमपानामविप्राणांक्षत्रियाणांहविर्भुजः वैश्यानामाज्यपानामशूद्राणांतुसुकालिनः यच्चादित्यपुराणे मासाश्चपितरोज्ञेयाऋतवश्चपितामहाः संवत्सरः प्रजानांचसुष्ठ्वेकः प्रपितामहः यच्चनंदिपुराणे अग्निष्वात्ताब्राह्मणानांपितरः परिकीर्तिताः राज्ञांबर्हिषदोनामविशांकाव्याः प्रकीर्तिताः सुकालिनस्तुशूद्राणांव्यामाम्लेच्छांत्यजातिषु अत्रावाहनादिषुपित्रादयः समुच्चयेनविकल्पेनवायथाचारंतत्तद्देवतारुपेणवाच्याइतिहेमाद्यादयः ॥

हेमाद्रींत मात्स्य व देवल - " पितरांस हव्य कव्य ( अन्नादिक ) प्राप्त करुन देणारें त्यांचें नाम व गोत्र आहे . पितरांचे अधिकारी ( न्याय मनसुबा वगैरे व्यवस्था करणारे ) अग्निष्वात्तादि पितर आहेत . नाममंत्र हे त्या अग्निष्वात्तादिकांचे आदेश ( आज्ञा ) होत . ते नाममंत्र दुसर्‍या जन्मांत गेलेल्या देखील प्राण्यांस संतुष्ट करितात . कारण , नाममंत्राच्या योगानें तें श्राद्धान्न त्यांचा आहाररुप होतें , तें येणेंप्रमाणें - जर पिता आपल्या पुण्यकर्माच्या योगानें देव झाला , तर त्याला दिलेलें श्राद्धान्न तें अमृत होऊन देवपणींही त्याला प्राप्त होतें . गंधर्व झाला असेल तर श्राद्धान्न भोगरुपानें प्राप्त होतें . पशु झाला असेल तर तृण होऊन त्याला प्राप्त होतें . सर्प झाला असेल तर श्राद्धान्न वायुरुपानें प्राप्त होतें . यक्ष झाला असतां श्राद्धान्न पान होतें . राक्षस झाला असतां मांस होतें . दैत्य झाला असतां मद्य होतें . प्रेत झाला असतां रक्तोदक होतें . मनुष्य झाला असतां तें श्राद्धान्न अन्नपानादि अनेक भोग देणारें होतें . " ह्या श्राद्धप्रकरणीं पिता इत्यादि शब्दांनीं जनकादिकांनाच देवतात्व सांगितलें आहे . वसु , रुद्र इत्यादिकांना देवतात्व नाहीं . कारण " हा पिंड , हें उदक तुला , हें सांगणें यजमानाच्या पित्याला " अशी शतपथश्रुति आहे . आणि " ज्याचा पिता मृत असेल त्यानें आपल्या पित्याला पिंड देऊन " अशी विष्णु इत्यादिकांची स्मृतिही आहे . अतां जें मनु देवल सांगतात - " वसु हे पितर , रुद्र हे पितामह , आणि आदित्य हे प्रपितामह जाणावे , अशी सनातन श्रुति आहे . " आणि जें याज्ञवल्क्य सांगतो - " वसु , रुद्र , आदित्य हे श्राद्धदेवता पितर आहेत " तें मनु देवल याज्ञवल्क्य यांचें सांगणें , पित्रादिकांचे ठायीं वस्वादिकांच्या अभेदाचें ध्यान करण्यासाठीं आहे . आतां जीं वचनें - हेमाद्रींत नंदिपुराणांत - " ह्या जगाचा पिता विष्णु , तोच दिव्य यज्ञ आहे . ब्रह्मा पितामह , आणि मी ( शिव ) प्रपितामह होय . " आणि जें भविष्यांत - " अनिरुद्ध हा आपण ( यजमान ), प्रद्युम्न हा पिता , संकर्षण हा पितामह , आणि वासुदेव हा प्रपितामह . " आतां जें तेथेंच सांगतो - " पिंडाविषयीं प्रथम ( देवता ) वरुण , दुसरा प्राजापत्य , तिसरा अग्नि , हा पिंडांचा विधि म्हटला आहे . " आणि जें मनु - " ब्राह्मणाचे पितर सोमप , क्षत्रियांचे पितर हविर्भुज , वैश्यांचे पितर आज्यप , शूद्रांचे पितर सुकालि . " आणि जें आदित्यपुराणांत - " मास हे पितर , ऋतु हे पितामह , संवत्सर हा सर्व प्रजांचा एक प्रपितामह होय . " आणि जें नंदिपुराणांत - " ब्राह्मणांचे पितर अग्निष्वात्त , राजांचे पितर बर्हिषद , वैश्यांचे पितर काव्य , शूद्रांचे पितर सुकालि , म्लेच्छ व अंत्यज यांचे पितर व्याम होत . " त्या नंदिपुराणादिवचनाची व्यवस्था - श्राद्धांत आवाहनादिकांत - पित्रादिकांचा उच्चार करुन त्या त्या पितरांच्या देवतारुपानें देशाचारकुलाचाराप्रमाणें समुच्चयानें विष्णु , प्रद्युम्न इत्यादिकांचा उच्चार करावा , अथवा विकल्पानें विष्ण्वादिकांचा उच्चार करावा , असें हेमाद्री प्रभृति ग्रंथकार सांगतात .

हेमाद्रौबाह्मे पार्वणंकुरुतेयस्तुकेवलंपितृहेतुकम् ‍ मातामह्यंनकुरुतेपितृहासप्रजायते धौम्यः पितरोयत्रपूज्यंतेतत्रमातामहाध्रुवम् ‍ अविशेषेणकर्तव्यंविशेषान्नरकंव्रजेत् ‍ अस्यापवादमाहकात्यायनः कर्षूसमन्वितंमुक्त्वातथाद्यंश्राद्धषोडशम् ‍ प्रत्याब्दिकंचशेषेषुपिंडाः स्युः षडितिस्थितिः कर्षूसमन्वितंसपिंडीकरणम् ‍ दर्शादौसपत्नीकानामेवदेवतात्वम् ‍ स्वेनभर्त्रासमंश्राद्धंमाताभुंक्तेसुधासमं पितामहीचस्वेनैवतथैवप्रपितामहीति तत्रैवोक्तेः चंद्रिकायांचतुर्विंशतिमते क्षयाहंवर्जयित्वैकंस्त्रीणांनास्तिपृथक् ‍ क्रिया केचिदिच्छंतिनारीणांपृथक् ‍ श्राद्धंमहर्षयः अन्वष्टकासुवृद्धौचगयायांचक्षयेहनि अत्रमातुः पृथक् ‍ श्राद्धमन्यत्रपतिनासहेतिकात्यायनोक्तेश्च अस्यनिर्मूलतांवदंतोगौडास्त्वज्ञाएव अत्रभागइत्यध्याहारः अन्यथासपतिकायैमात्रेइतिप्रयोगापत्तेः अत्रमातृशब्दोजनन्यामेवमुख्यः तेनसपत्नमातृभ्योनदद्यात् ‍ एवंपितामह्यादिशब्दैः पितृजनन्यादयएवोच्यंतेइतितत्सपत्नीभ्योनदेयमितिहेमाद्रिः कारुण्येनतुमहालयादौदेयमितिसएव ।

हेमाद्रींत ब्राह्मांत - " जो मनुष्य केवळ पिता , पितामह , प्रपितामह यांचेंच पार्वण करितो , मातामहादिकांचें करीत नाहीं , तो पितृघातक होतो . " धौम्य - " ज्या ठिकाणीं पितरांची पूजा करावयाची त्या ठिकाणीं मातामहांचीही पूजा करावी . पितर व मातामह यांत भेद करील तर नरकास जाईल . " ह्याचा अपवाद सांगतो कात्यायन - " कर्षूनें युक्त असलेलें श्राद्ध , ( सपिंडीकरण ) पहिलीं षोडशश्राद्धें ( मासिकें ) आणि प्रतिसांवत्सरिक श्राद्ध हीं वर्ज्यकरुन इतर श्राद्धांमध्यें पिंड सहा करावे , अशी शास्त्रमर्यादा आहे . " दर्शादि श्राद्धांमध्यें पित्रादिकांना सपत्नीकांनाच देवतात्व आहे , म्हणून माता इत्यादिकांना पृथक् ‍ पिंड नाहीं . कारण , " माता आपल्या पतीबरोबर अमृताप्रमाणें श्राद्ध भक्षण करिते , पितामही आपल्या पतीबरोबर व प्रपितामही आपल्या पतीबरोबर सेवन करिते . " असें त्याच ठिकाणीं हेमाद्रींत उक्त आहे . चंद्रिकेंत चतुर्विशतिमतांत - " एक संवत्सर दिवस ( सांवत्सरिक ) वर्ज्य करुन स्त्रियांना पृथक् ‍ श्राद्ध नाहीं , कोणी महर्षि स्त्रियांना पृथक् ‍ ( वेगळें ) श्राद्ध आहे असें म्हणतात . अन्वष्टका ( भाद्रपद कृष्ण नवमीस वगैरे होणार्‍या ), वृद्धिश्राद्ध , गया , आणि मृतदिवस इतक्या ठिकाणीं मातेला पृथक् ‍ ( वेगळा ) भाग आहे . इतर ठिकाणीं पतीसहवर्तमान मातेला श्राद्ध प्राप्त होतें " असें कात्यायनवचनही आहे . हें वचन निर्मूल असें म्हणणारे गौड तर अज्ञच आहेत . " अत्र मातुः पृथक् ‍ " ह्या वचनांत ‘ भागः ’ असा अध्याहार करावा . म्हणजे वेगळा भाग आहे असा अर्थ समजावा . असा अर्थ केला नाहीं तर मातेला प्राधान्य बोधित होऊन ‘ सपतिकायै मात्रे ’ असा प्रयोग प्राप्त होईल . ह्या वरील वचनांत मातृशब्दानें जननीच घ्यावी , असें आहे म्हणून सापत्न मातेला श्राद्ध देऊं नये . याप्रमाणें पितामही इत्यादि शब्दांनीं पित्रादिकांच्या जननीच घ्यावयाच्या आहेत म्हणून त्यांच्या सपत्नींना देऊं नये , असें हेमाद्रि सांगतो . महालयादिकांत दयेनें सापत्नमाता इत्यादिकांस द्यावें , असें तोच ( हेमाद्रि ) सांगतो .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP