मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
शूद्रांचा श्राद्धविधि

तृतीयपरिच्छेद - शूद्रांचा श्राद्धविधि

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां शूद्रांचा श्राद्धविधि सांगतों -

शूद्रस्यतुसदामश्राद्धमेव सदाचैवतुशूद्राणामामश्राद्धंविधीयतइतिसुमंतूक्तेः पृथ्वीचंद्रोदयेमात्स्येपि एवंशूद्रोपिसामान्यंवृद्धिश्राद्धंचसर्वदा नमस्कारेणमंत्रेणकुर्यादामान्नवत्सदा तत्रैववृद्धपराशरः आमान्नेनतुशूद्रस्यतूष्णींतुद्विजपूजनं कृत्वाश्राद्धंतुनिर्वाप्यसजातीनाशयेदथ सएव आमंशूद्रस्यपक्कान्नंपक्कमुच्छिष्टमुच्यते हेमाद्रौभविष्ये धर्मेप्सवस्तुधर्मज्ञायदिशूद्राः प्रकुर्वते अग्नौकरणमंत्रश्चनमस्कारोविधीयते आवाहनादिकर्तव्यंयथाशूद्रेणतच्छृणु देवानांदेवनाम्नातुपितृणांनामगोत्रतः पिंडादीन्निर्वपेद्वीरनामतोगोत्रतस्तथा शूद्राणांगोत्राभावेपिकाश्यपंगोत्रंज्ञेयम् ‍ तस्मादाहुः सर्वाः प्रजाः काश्यप्यइतिश्रुतेः गोत्रनाशेतुकाश्यपइतिव्याघ्रपादोक्तेश्चेतिहेमाद्रिः एवमन्यत्रगोत्राज्ञानेएवंतर्पणादिषुज्ञेयम् ‍ तत्रैवभविष्ये शूद्रस्तुगृहपाकेननपिंडान्निर्विपेत्तथा सक्तुमूलंफलंतस्यपायसंवाभवेत्स्मृतम् ‍ गौतमः अनुमतोस्यनमस्कारोमंत्रइति देवताभ्यः पितृभ्यश्चेत्ययंनमस्कारमंत्रइतिकेचित् ‍ विज्ञानेश्वरोप्येवमाह हेमाद्रिस्तु शूद्रोप्यमंत्रवत्कुर्यादनेनविधिनाबुधइतिमात्स्येमंत्रनिषेधान्नाममंत्रेणेत्याह पृथ्वीचंद्रोदयेस्कांदे राजकार्येनियुक्तस्यबंधनिग्रहवर्तिनः व्यसनेषुचसर्वेषुश्राद्धंविप्रेणकारयेत् ‍ यत्तुभारतेराजधर्मेषु यवनाः किरातागांधाराश्चीनाः शबरबर्बराः शकास्तुषाराः कंकाश्चपह्लवाश्चांध्रमद्रकाइत्युक्त्वा ब्रह्मक्षत्रप्रसूताश्चवैश्याः शूद्राश्चमानवाः कथंधर्मांश्चरिष्यंतिसर्वेविषयवासिनः इतिचोक्त्वा वेदधर्मक्रियाश्चैवतेषांधर्मोविधीयते पितृयज्ञास्तथाकूपाः प्रपाश्चशयनानिच दानानिचयथाकालंद्विजेभ्योविसृजेत्सदा तथा दक्षिणासर्वयज्ञानांदातव्याभूतिमिच्छता पाकयज्ञामहार्हाश्चकर्तव्याः सर्वदस्युभिरितिम्लेच्छादीनांश्राद्धविधानम् ‍ तदपिसजातीयभोजनद्रव्यदानादिपरंनतुश्राद्धपरमिति इतिश्रीनारायणभट्टसूरिसूनुरामकृष्णभट्टात्मजकमलाकरभट्टकृतेनिर्णयसिंधौअधिकारनिर्णयः ॥

शूद्राला तर सदा आमश्राद्धच आहे . कारण , " शूद्रांना तर सर्वकाळ आमश्राद्धच सांगितलें आहे . " असें सुमंतूचें वचन आहे . पृथ्वीचंद्रोदयां मात्स्यांतही सांगतो - " ह्याप्रमाणें शूद्रानेंही सर्वदा सामान्यश्राद्ध व वृद्धिश्राद्ध हें नमस्कारमंत्रानें , आमान्नानें सर्वकाळ करावें . " त्याच ठिकाणीं वृद्धपराशर - " शूद्रानें आमान्न देऊन ब्राह्मणांचें मंत्ररहित पूजन करुन श्राद्ध समाप्त करुन नंतर आपल्या ज्ञातीला भोजन घालावें . " तोच पराशर सांगतो - " शूद्राचें आमान्न म्हणजे पक्कान्न होय आणि पक्कान्न म्हणजे उच्छिष्ट म्हटलें आहे . " हेमाद्रींत भविष्यांत सांगतो - " धर्म जाणणारे व धर्माची इच्छा करणारे असले शूद्र जर श्राद्ध करीत असतील , तर त्यांना अग्नौकरणाविषयीं मंत्र नमस्कार सांगितला आहे . शूद्रानें आवाहनादिक कसें करावें , तें सांगतों , ऐक ! देवांचें आवाहनादिक देवांच्या नामानें करावें , आणि पितरांचें नामगोत्रानें करावें . नांवाचा व गोत्राचा उच्चार करुन पिंडादिक द्यावे . " शूद्रांना गोत्राचा अभाव असला तरी काश्यपगोत्र जाणावें . कारण , " सर्व प्रजा कश्यपाच्या आहेत असें सांगतात " अशी श्रुति आहे . " गोत्र नसेल त्या ठिकाणीं काश्यप समजावें . " अशी व्याघ्रपादाचीही उक्ति आहे , असें हेमाद्रि सांगतो . असेंच दुसर्‍या ठिकाणीं गोत्राचें ज्ञान नसेल तेथें समजावें . याचप्रमाणें तर्पणादिविषयीं समजावें . त्या ठिकाणींच भविष्यांत सांगतो - " शूद्रानें घरांत शिजविलेल्या अन्नानें पिंड देऊं नयेत . सातू ( जवांचें पीठ ), अथवा मूलें , फळें , पायस यांचे त्यानें पिंड द्यावे . " गौतम - " ह्या शूद्राला नमस्कारमंत्र सांगितला आहे . " देवताभ्यः पितृभ्यश्च ’ हा नमस्कारमंत्र असें केचित् ‍ म्हणतात . विज्ञानेश्वरही असेंच सांगतो . हेमाद्रि तर " शूद्रानेंही अमंत्रक ह्या ( पूर्वोक्त ) विधीनें करावें . " ह्या मत्स्यपुराणवचनांत मंत्राचा निषेध असल्यामुळें नाममंत्रानें करावें , असें सांगतो . पृथ्वीचंद्रोदयांत स्कांदांत - " राजकार्याविषयीं नियुक्त ( आज्ञा केलेला ), तसाच बंदींत , अटकाव इत्यादिकांत असलेला , व कोणत्याही संकटांत असलेला त्यानें श्राद्ध ब्राह्मणाकडून करवावें . " आतां जें भारतांत राजधर्मांत - " यवन , किरात , गांधार , चीन , शबर , बर्बर , शक , तुषार , कंक , पल्हव , आंध्र , मद्रक " असें सांगून " ब्राह्मण व क्षत्रिय यांपासून उत्पन्न झालेले तसेच वैश्य व शूद्र हे सर्व मनुष्य देशांमध्यें राहणारे आहेत , यांनीं कसे धर्म आचरण करावे ? " असेंही बोलून पुढें सांगतो - " वेदप्रोक्त धर्म व क्रिया हा त्यांना धर्म सांगितला आहे . तो असा - त्यांनीं पितृयज्ञ ( श्राद्धें ) करावे , विहिरी बांधाव्या , पाणपोई घालाव्या , धर्मशाळा बांधाव्या , ब्राह्मणांस योग्य कालीं सर्वदा दानें द्यावीं , तसेंच सर्व यज्ञांची दक्षिणा त्यांनीं द्यावी , महायोग्य असे जे पाकयज्ञ ते त्या सर्व दस्यूंनीं ( म्लेच्छादिकांनीं ) करावे " ह्या वचनानें म्लेच्छादिकांना श्राद्ध सांगितलें आहे तेंही आपआपल्या ज्ञातीला भोजन , द्रव्यदान वगैरे करावें अशा अर्थाचें आहे , असें समजावें . श्राद्ध करावें , अशा अर्थाचें समजूं नये .

इति श्रीनिर्णयसंधौ अधिकारनिर्णये भाषाटीका समाप्ता ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP