आतां शय्यादान सांगतो -
अथशय्यादानं हेमाद्रौभविष्ये तस्माच्छय्यांसमासाद्यसारदारुमयींदृढां दंतपत्रचितांरम्यांहेमपट्टैरलंकृतां हंसतूलीप्रतिच्छन्नांशुभगंडोपधानिकां प्रच्छादनपटीयुक्तांगंधधूपादिवासितां तस्यांसंस्थापयेद्धैमंहरिंलक्ष्म्यासमन्वितं अत्रहरिस्थानेप्रेतं उच्छीर्षकेघृतभृतंकलशंपरिकल्पयेत् तांबूलंकंकुमक्षोदकर्पूरागरुचंदनं दीपिकोपानहौछत्रंचामरासनभाजनं पार्श्वेषुस्थापयेद्भक्त्यासप्तधान्यानिचैवहि शयनस्थस्यभवतियदन्यदुपकारकं भृंगारकरकाद्यंतुपंचवर्णवितानकं मंत्रस्तु यथानकृष्णशयनंशून्यंसागरजातया शय्याममाप्यशून्यास्तुतथाजन्मनिजन्मनि यस्मादशून्यंशयनंकेशवस्यशिवस्यच अर्धंतदेव दत्वैवंतस्यसकलंप्रणिपत्यविसर्जयेत् एकादशाहेपितथाविधिरेषप्रकीर्तितः विशेषंचात्रराजेंद्रकथ्यमानंनिशामय तेनोपभुक्तंयत्किंचिद्वस्त्रवाहनभाजनं यद्यदिष्टंचतस्यासीत्तत्सर्वंपरिकल्पयेत् तमेवपुरुषंहैमंतस्यांसंस्थापयेत्तदा पूजयित्वाप्रदातव्यामृतशय्यायथोदिता पाद्मे मृतकांतेद्वितीयेह्निशय्यांदद्यात्सलक्षणां कांचनंपुरुषंतद्वत्फलवस्त्रसमन्वितं संपूज्यद्विजदांपत्यंनानामणिविभूषितं उपवेश्यतुशय्यायांमधुपर्कंततोवदेत् रजतस्यतुपात्रेणदधिदुग्धसमन्वितं अस्थिलालाटिकंगृह्यसूक्ष्मंकृत्वासपायसं भोजयेद्दिजदांपत्यंविधिरेषसनातनः एषएवविधिर्दृष्टः पार्वतीयैर्द्विजोत्तमैः एतत्प्रतिग्रहेतत्रैवोक्तम् गृहीतायांतुतस्यांवैपुनः संस्कारमर्हति शय्यादानफलंभविष्ये स्वर्गेपुरंदरपुरेसूर्यपुत्रालयेतथा सुखंवसत्यसौजंतुः शय्यादानप्रभावतः आभूतसंप्लवंयावत्तिष्ठत्यातंकवर्जितमिति ।
हेमाद्रींत भविष्यांत - " साडाच्या लांकडाची दृढ ( मजबूत ) अशी शय्या ( पलंग ) तयार करावी . तिला हस्तिदंतांचीं पत्रें बसवावीं . सोन्याच्या पट्ट्या माराव्या . ती शुभ्र वस्त्रानें आच्छादित असावी . तिच्या बाजूचे दंड चांगले गुळगुळीत असावे . उशी चांगली असावी . वरती पलंगपोस घातलेला असवा . गंध , धूप यांचा तिला वास द्यावा . लक्ष्मीसहित हरीची मूर्ति सुवर्णाची करुन त्या शय्येवर ठेवावी . ही मूर्ति ठेवणें इतरवेळीं आहे . अकराव्या दिवशीं हरिमूर्तीच्या स्थानीं प्रेताची मूर्ति ठेवावी . उशाकडे तुपाचा भरलेला कलश ठेवावा . तांबूल , केशर वाटलेलें , कापूर , अगरु , दिवा , जोडा , छत्री , चवरी , आसन , पात्र हीं मोठ्या भक्तीनें शय्येवर बाजूस ठेवावीं . आणि सप्त धान्यें ठेवावीं . शयनावर असतां जें इतर कांहीं अवश्य पाहिजे असतें म्ह० झारी , कमंडलु इत्यादिक तें असावें . आणि पांचरंगी चांदवा त्या शय्येला असावा . त्या शय्यादानाचा मंत्र - ‘ यथा न कृष्णशयनं शून्यं सागरजातया । शय्या ममाप्यशून्यास्तु तथा जन्मनि जन्मनि । यस्मादशून्यं शयनं केशवस्य शिवस्य च । शय्या ममाप्यशून्यास्तु तथा जन्मनि जन्मनि । ’ याप्रमाणें ब्राह्मणाला सर्व देऊन नमस्कार करुन विसर्जन करावें . हा विधि इतर वेळीं शय्यादानाचा सांगितला आहे , तसाच अकराव्या दिवशीं देखील शय्यादानाचा हाच विधि आहे . हे राजा ! अकराव्या दिवशीं विशेष आहे तो सांगतों श्रवण कर ! मृत झालेल्यानें जें कांहीं वस्त्र , वाहन , पात्र वगैरे उपभुक्त असेल तें आणि त्याला जें जें इष्ट असेल तें सारें ब्राह्मणाला द्यावे . तोच मृत झालेला पुरुष सुवर्णाचा करुन त्या वेळीं त्या शय्येवर स्थापन करावा . त्याची पूजा करुन व ब्राह्मणाची पूजा करुन जशी सांगितली आहे तशी मृतशय्या द्यावी . " पद्मपुराणांत - " मृताशौचाच्या शेवटीं दुसर्या दिवशीं सांगितलेल्या लक्षणांनीं युक्त अशी शय्या द्यावी . सुवर्णाचा पुरुष करुन फल , वस्त्रें यांनीं सहित तो द्यावा . ब्राह्मणाचे दंपतींची पूजा करुन नानाप्रकारच्या मण्यांनीं त्यांना भूषित करुन शय्येवर बसवून तदनंतर मधुपर्क रुप्याच्या पात्रानें दधिदुग्धयुक्त द्यावा . प्रेताचे ललाटाचें अस्थि ( हाड ) घेऊन बारीक चूर्ण करुन तें पायसांत टाकून ब्राह्मणाचे दंपतीला भोजन घालावें . हा विधि सनातन आहे . हाच विधि पर्वतीय ब्राह्मणश्रेष्ठांनीं सांगितला आहे . " या शय्येचा प्रतिग्रह केला असतां तेथेंच सांगितलें आहे - " ती शय्या घेतली असतां पुनः संस्कार करण्याला पात्र होतो . " शय्यादानाचें फल सांगतो भविष्यांत - " शय्यादानाच्या प्रभावानें तो प्राणी स्वर्गामध्यें इंद्राचे नगरींत , तसाच यमाच्या घरीं सुखानें वास करितो . भूतांचा प्रलय होई तावत्कालपर्यंत दुःखांनीं रहित होत्साता राहतो . "