मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
प्रेतसंस्काराविषयीं काल

तृतीय परिच्छेद - प्रेतसंस्काराविषयीं काल

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .

आतां प्रेतसंस्काराविषयीं काल सांगतो -

अथप्रेतसंस्कारेकालः हेमाद्रौगार्ग्यः प्रत्यक्षशवसंस्कारेदिनंनैवविशोधयेत् ‍ आशौचमध्येसंस्कारेदिनंशोध्यंतुसंभवे आशौचविनिवृत्तौचेत्पुनः संस्क्रियतेमृतः संशोध्यैवदिनंग्राह्यमूर्ध्वसंवत्सराद्यदि प्रेतकार्याणिकुर्वीतश्रेष्ठंतत्रोत्तरायणं कृष्णपक्षश्चतत्रापिवर्जयेत्तुदिनत्रयं वाराहे चतुर्थाष्टमगेचंद्रेद्वादशेचविवर्जयेत् ‍ प्रेतकृत्यंव्यतीपातेवैधृतौपरिघेतथा करणेविष्टिसंज्ञेचशनैश्चरदिनेतथा त्रयोदश्यांविशेषेणजन्मतारात्रयेतथा जन्मदशमैकोनविंशानिजन्मताराः भारते नक्षत्रेतुनकुर्वीतयस्मिञ्जातोभवेन्नरः नप्रौष्ठपदयोः कार्यंतथाग्नेयेचभारत दारुणेषुचसर्वेषुप्रत्यरेचविवर्जयेत् ‍ काश्यपः भरण्यार्द्रामघाश्लेषामूलंद्विचरणानिच प्रेतकृत्येतिदुष्टानिधनिष्ठाद्यंचपंचकं फल्गुनीद्वितयंरोहिण्यनूराधापुनर्वसू अषाढेद्वेविशाखाचभानिद्विचरणानिच ज्योतिर्नारदः चतुर्दशीतिथिंनंदांभद्रांशुक्रारवासरौ सितेज्ययोरस्तमयंद्व्यंघ्रिभंविषमांघ्रिभं शुक्लपक्षंचसंत्यज्यपुनर्दहनमुत्तमं वसूत्तरार्धतः पंचनक्षत्रेषुत्रिजन्मसु पौष्णब्रह्मर्क्षयोश्चैवदहनात्कुलनाशनं अस्यापवादमाहतत्रैववैजवापः प्रेतस्यसाक्षाद्दग्धस्यप्राप्तेत्वेकादशेहनि नक्षत्रतिथिवारादिशोधनीयंनकिंचन युगमन्वादिसंक्रांतिदर्शेंप्रेतक्रियायदि दैवादापतितातत्रनक्षत्रादिनशोधयेत् ‍ विश्वप्रकाशेपि गुरुभार्गवयोर्मौढ्येपौषमासेमलिम्लुचे नातीतः पितृमेधः स्याद्गयांगोदावरींविना दानमपितत्रैवोक्तं भद्रायांभूमिदानंस्यात्रिपादर्क्षेहिरण्यदः वारेषुतत्तद्वर्णंतुवासोदानंविधीयते धनिष्ठापंचकमृतेपंचरत्नानिदापयेत् ‍ एकाशीतिपलंकांस्यं तदर्धंवातदर्धकं नवषटत्रिपलंवापिदद्याद्विप्रायशक्तितइत्यलंप्रसंगेन ।

हेमाद्रींत गार्ग्य - " प्रत्यक्ष शवाचा संस्कार करावयाचा असतां दिवस शोधूं नये . अशौचामध्यें संस्कार कर्तव्य असतां चांगला दिवस सांपडत असेल तर घ्यावा . आशौचाची निवृत्ति झाल्यावर जर मृताचा संस्कार कर्तव्य असेल तर दिवस शोधूनच घ्यावा . एक वर्ष होऊन गेल्यावर संस्कार कर्तव्य असेल तर उत्तरायण व कृष्णपक्ष घ्यावा . त्या कृष्णपक्षांतही तीन दिवस वर्ज्य करावे . " वाराहांत - " राशीस चवथा , आठवा आणि बारावा चंद्र असतां प्रेतकृत्य वर्ज्य करावें . तसेंच व्यतीपात , वैधृति , परिघ , विष्टिकरण , शनिवार , त्रयोदशी , हीं वर्ज्य करावीं . जन्मनक्षत्र , व त्यापासून दहावें आणि एकोणिसावें नक्षत्र प्रेतकृत्याविषयीं विशेषेंकरुन वर्ज्य करावें . " भारतांत - " जन्मनक्षत्र , पूर्वाभाद्रपदा , उत्तराभाद्रपदा , कृत्तिका , हीं व सारीं दारुण नक्षत्रें ( मूळ , आश्लेषा , ज्येष्ठा , आर्द्रा ), आणि प्रत्यरतारा हीं वर्ज्य करावीं . " काश्यप - " भरणी , आर्द्रा , मघा , आश्लेषा , मूळ , द्विपाद नक्षत्रें ( मृग , चित्रा , धनिष्ठा ), आणि धनिष्ठादि पंचक हीं प्रेतकृत्याविषयीं अतिदुष्ट आहेत . पूर्वा , उत्तरा , रोहिणी , अनुराधा , पुनर्वसु , पूर्वाषाढा , उत्तराषाढा , विशाखा , आणि द्विपाद नक्षत्रें हीं वर्ज्य करावीं . " ज्योतिर्नारद - " चतुर्दशी , नंदा ( प्रतिपदा , षष्ठी , एकादशी ), भद्रा ( द्वितीया , सप्तमी , द्वादशी ) ह्या तिथि ; शुक्र व भौमवार ; शुक्र गुरु यांचें अस्त ; द्विपाद नक्षत्रें ; व विषमपाद नक्षत्रें आणि शुक्लपक्ष ; हीं वर्ज्य करुन पुनः दाह करावा . धनिष्ठानक्षत्राचें उत्तरार्ध व शततारकादि चार नक्षत्रें , तीन जन्मनक्षत्रें ( जन्मनक्षत्र , त्यापासून दहावें व एकोणिसावें नक्षत्र ), रेवती , रोहिणी या नक्षत्रांवर दाह केला असतां कुलाचा नाश होतो . पुनर्दाहादि निषिद्ध नक्षत्रादिकांचा अपवाद सांगतो तेथेंच बैजवाप - " प्रत्यक्ष प्रेताचें दहन केलें असतां अकराव्या दिवशीं त्याचे कर्माविषयीं नक्षत्र , तिथि , वार यांचा कोणताही निषेध नाहीं . आणि दैववशेंकरुन युगादि मन्वादि तिथि , संक्रांति , दर्श यांचे ठायीं जर प्रेतक्रिया पडेल तर नक्षत्रादिकांचा विचार करुं नये . " विश्वप्रकाशांतही - " गुरुशुक्रांचें अस्त , पौषमास , मलमास , यांचेठायीं अतीत प्रेतक्रिया , गया व गोदावरी यांवांचून इतर ठिकाणीं होत नाहीं . " दानही तेथेंच सांगितलें आहे - " भद्रातीथींचेठायीं मृत असतां भूमिदान करावें . त्रिपाद नक्षत्रावर मृत असतां सुवर्ण द्यावें . निषिद्ध वारांचेठायीं मृत असतां त्यांच्या त्यांच्या वर्णांचें वस्त्र द्यावें . धनिष्ठापंचकावर मृत असतां पंचरत्नें द्यावीं . एक्याऐशीं पलें ( ८० गुंजा म्ह० १ कर्ष . ४ कर्ष म्ह० १ पल . ) किंवा त्याच्या अर्धै अथवा चतुर्थांश , किंवा नऊ पलें , सहा पलें अथवा तीन पलें परिमित कांसें ब्राह्मणाला यथाशक्ति द्यावें . ’’ आतां आशौचप्रसंगानें इतर सांगणें पुरे करितों .

जीवंताचें प्रेतकर्म केलें असतां सांगतो -

हेमाद्रौवृद्धमनुः अमृतंमृतमाकर्ण्यकृतंयस्यौर्ध्वदेहिकं प्रायश्चित्तमसौस्मार्तंकृत्वाग्नीनादधीतच जीवन्यदिसमागच्छेद्धृतकुंभेनिमज्ज्यतं उद्धृत्यस्नापयित्वास्यजातकर्मादिकारयेत् ‍ द्वादशाहंव्रतचर्यात्रिरात्रमथवास्यतु स्नात्वोद्वहेततांभार्यामन्यांवातदभावतः अग्नीनाधायविधिवद्व्राव्यस्तोमेनवायजेत् ‍ अथेंद्राग्नेनपशुना गिरिंगत्वाचतत्रतु इष्टिमायुष्मतींकुर्यादीप्सितांश्चक्रतूंस्ततः अनाहिताग्नेस्तुचरुः मृतवार्ताश्रवणेत्वाश्वलायनः सुरभयएवयस्मिन्जीवेमृतशब्दइति यस्यतुजीवतएवमृतिवार्तांश्रुत्वास्त्रियासहगमनंकृतं तदातद्वैधमेव भर्तुर्मरणज्ञानस्यैवनिमित्तत्वात् ‍ प्रमादस्यगौरवेणायुक्तत्वाच्चेतिकेचित् ‍ तन्न मरणज्ञानस्यनिमित्तत्वेतीतानागतयोरपितत्त्वापत्तेः भर्तुर्वैधदाहाभावेनतस्याः सहगमनाभावाच्च तस्मादाशौचवज्ज्ञातमरणस्यैवनिमित्तत्वं न चात्रतदस्ति परंकाम्यंमरणमस्तु अतआत्महननदोषोस्तीतितातपादाः ।

हेमाद्रींत वृद्धमनु - " जीवंत असून मृत झाला असें बांधवांनीं ऐकून ज्याचें और्ध्वदेहिक ( अंत्यकर्म ) केलें असेल त्यानें स्मार्त प्रायश्चित्त करुन अग्नीचें आधान करावें . बांधवांनीं अंत्यकर्म केल्यावर तो आला असतां त्याला घृतकुंभांत बुडवून बाहेर काढून स्नान घालून त्याचे जातकर्मादि संस्कार करावे . बारा दिवस ब्रह्मचर्यव्रत करावें , अथवा त्रिरात्र करावें . नंतर समावर्तन करुन त्या पहिल्या भार्येशीं विवाह करावा , तिच्या अभावीं इतर भार्येशीं विवाह करावा . यथाविधि अग्नीचें आधान करावें . अथवा व्रात्यस्तोमानें यजन करावें . अथवा इंद्राग्निदेवतांचा पशुयाग करावा . पर्वतावर जाऊन आयुष्मती इष्टि करावी . नंतर ईप्सित यज्ञ करावे . " अनाहिताग्नीला चरुयाग सांगितला आहे . नमृताचें मृतवार्ताश्रवण झालें तर सांगतो आश्वलायन - " जो जीवंत असतां त्याविषयीं मृतशब्द हा कामधेनूच आहे . " जो पुरुष जीवंत असतांच त्याची मरणवार्ता श्रवणकरुन पत्नीनें सहगमन केलें तर तें सहगमन विधिविहितच आहे . कारण , भर्त्याचें मरणज्ञान हें सहगमनाला निमित्त आहे . पतीच्या ठिकाणीं व शास्त्राच्या ठिकाणीं तिचें गौरव असल्यामुळें प्रमादानें सहगमन झालें असें म्हणणें अयुक्तही आहे , असें केचित् ‍ म्हणतात , तें बरोबर नाहीं . कारण , मरणाचें ज्ञाननिमित्त , असें झालें असतां मरण झाल्यावर कांहीं दिवसांनीं त्याचें ज्ञान झालें असतां त्या ठिकाणीं , आणि मरणाच्या पूर्वीं मरणज्ञान झालें असतां त्या ठिकाणींही मरणज्ञानाला निमित्तत्व प्राप्त होईल ! आणि भर्त्याचा विधिविहित दाह नसल्यामुळें तिच्या सहगमनाचा अभावही आहे . तस्मात् ‍ आशौचाप्रमाणें जाणलेलें जें मरण तेंच सहगमनाला निमित्त आहे . तें जाणलेलें मरण एथें नाहीं . म्हणून सहगमन नाहीं . दुसरें कामनिक मरण असो . म्हणून तिला आत्महत्येचा दोष आहे , असें आमचे तातपाद ( वडील ) सांगतात .

तथासर्पसंस्कारेकृतेत्रिरात्रमाशौचंतद्विधिंचाहशौनकः अथवक्ष्यामिसर्पस्यसंस्कारविधिमुत्तमं सिनीवाल्यांपौर्णमास्यांपंचम्यांवापिकारयेत् ‍ कृतसर्पवधोविप्रः पूर्वजन्मनिवायदि वधंप्रख्यापयेत्पापीचरेत्कृच्छ्रांश्चतुर्दश विप्रायलोहदंडंचतन्मूल्यंवापिदापयेत् ‍ मूल्यमाह निष्कत्रयंद्विनिष्कंवानिष्कमेकंकनीयसं अनुमत्यादिकर्तृणांनिष्कमर्धंतदर्धकं इदंस्वर्णरुप्ययोः शक्त्याज्ञेयं संस्कारमाह प्रियंगुव्रीहिगोधूमैस्तिलपिष्टेनवापुनः कृत्वासर्पाकृतिंशूर्पेनिधायप्रार्थयेदहिं एहिपूर्वमृतः सर्पअस्मिन्पिष्टेसमाविश संस्कारार्थमहंभक्त्याप्रार्थयामिसमाहितः वस्त्रोपवीतगंधाद्यैः संपूज्यचहरेद्बहिः कुर्यात्संस्कारसंकल्पंप्राणायामपुरः सरं यज्ञोपवीतिनाकार्यंसर्पसंस्कारकर्मतु लौकिकाग्निंप्रतिष्ठाप्यसमिदाधानमाचरेत् ‍ ततोग्नेरग्निदिग्भागेभूमिंसंप्रोक्ष्यवारिभिः चितिंकृत्वाथसंस्तीर्यकुशैराग्नेयकाग्रकैः पर्युक्ष्याग्निंपरिस्तीर्यपरिषिच्यसमर्चयेत् ‍ कृत्वेध्माधानमाघारौचक्षुषीचयथाविधि सर्पंगृहीत्वायत्नेनचितिमारोपयेत्सुधीः स्रुवेणजुहुयादाज्यमग्नौव्याह्रतिभिस्त्रिभिः सर्पास्येजुहुयादाज्यं व्याह्रत्याचसमग्रया आज्यशेषंस्रुवेणैवसर्पदेहेनिषेचयेत् ‍ चमसस्थैर्जलैः सर्पंव्याह्रत्याभ्युक्ष्यपाणिना अग्नेरक्षाणइत्यनयासर्पायाग्निंप्रदापयेत् ‍ उपतिष्ठेद्दह्यमानंनमोस्तुसर्पमंत्रतः ज्ञानतो‍ऽज्ञानतोवापिकृतः सर्पवधोमया पूर्वजन्मनिवासर्पतत्सर्वंक्षंतुमर्हसि क्षीराज्येनततश्चाग्निंप्रोक्ष्यव्याह्रतिभिर्जलैः नास्थिसंचयनंकुर्यात्स्नात्वाचम्यगृहंव्रजेत् ‍ ब्रह्मचर्यादिकंकार्यंत्रिरात्राशौचमिष्यते सचैलंतुचतुर्थेन्हिस्नात्वाविप्रान्समर्चयेत् ‍ सर्पोनंतस्तथाशेषः कपिलोनागएवच कालिकः शंखपालश्चभूधरश्चेतिनामभिः गंधपुष्पाक्षतैर्धूपदीपाद्यैरर्चयेद्दिजान् ‍ घृतपायसभक्ष्यैश्चद्विजानष्टौतुभोजयेत् ‍ एवंकृतेविधानेनसर्पसंस्कारकर्मणि सर्पहिंसाकृतात्पापान्मुच्यतेनात्रसंशय इति इतिसर्पसंस्कारः ।

तसेंच सर्पाचा संस्कार केला असतां त्रिरात्र आशौच आणि त्याचा विधि सांगतो शौनक - " आतां सर्पाचा उत्तम संस्कारविधि सांगतों - तो संस्कार चंद्रदर्शनयुक्त अमावास्येस , पौर्णमासीचे दिवशीं किंवा पंचमीस करावा . ज्यानें सर्पाचा वध ह्याजन्मीं किंवा पूर्वजन्मीं केला असेल त्यानें तो केलेला वध लोकांस सांगून त्या योगानें आपण पातकी असें समजून चवदाकृच्छ्र प्रायश्चित्त करावें . ब्राह्मणाला लोहदंड किंवा लोहदंडाचें मूल्य द्यावें . " मूल्य सांगतो - " लोहदंडाचें मूल्य तीन निष्क उत्तम , दोन निष्क मध्यम , व एक निष्क कनिष्ठ हें मूल्य प्रत्यक्ष सर्प मारणाराला समजावें . मारण्याविषयीं अनुमति वगैरे देणाराला एक निष्क , अर्धा निष्क अथवा पाव निष्क लोहदंडाचें मूल्य समजावें . " हें मूल्य सुवर्णाचें किंवा रुप्याचें आपल्या शक्तीनें जाणावें . संस्कार सांगतो - " राळे , व्रीहि , गोधूम , किंवा तीळ यांच्या पिठानें सर्पाची आकृती करुन शूर्पांत ठेऊन सर्पाची प्रार्थना करावी . प्रार्थनेचा मंत्र - ‘ एहि पूर्वमृतः सर्प अस्मिन् ‍ पिष्टे समाविश । संस्कारार्थमहं भक्त्या प्रार्थयामि समाहितः ’ अशी प्रार्थना करुन वस्त्र , उपवीत , गंध इत्यादि उपचारांनीं त्याची पूजा करुन बाहेर न्यावा . नंतर प्राणायाम करुन संस्काराचा संकल्प करावा . सर्पसंस्कार कर्म यज्ञोपवीतीनें करावें . नंतर लौकिकाग्नीची प्रतिष्ठा करुन समिधा द्यावी . तदनंतर अग्नीचे आग्नेयी दिशेस उदकानें भूमीचें प्रोक्षण करुन चिति करुन आग्नेयी दिशेस अग्रें करुन कुश पसरावे . नंतर अग्नीचें परिसमूहन , परिस्तरण , पर्युक्षण करुन पूजन करावें . नंतर इध्माधान , आघारहोम व चक्षुषीहोम यथाविधि करुन यत्नानें ( जपून ) तो सर्प घेऊन चितीवर ठेवावा . नंतर अग्नीमध्यें स्त्रुवानें तीन व्याह्रतींनीं आज्यहोम करावा . नंतर सर्पाच्या मुखांत समस्त व्याह्रतीनें आज्यहोम करावा . स्रुवानेंच शेष आज्य सर्पाच्या देहावर घालावें . चमसपात्रांतील उदकांनीं व्याह्रतिमंत्रानें सर्पावर अभ्युक्षण करुन ‘ अग्नेरक्षाण ’ ह्या ऋचेनें सर्पाला अग्नि द्यावा . तो सर्प जळत असतां ‘ नमोस्तु सर्प० ’ ह्या मंत्रानें त्याचें उपस्थान करावें . तदनंतर ‘ ज्ञानतोऽज्ञानतो वापि कृतः सर्पवधो मया । पूर्वजन्मनि वा सर्प तत्सर्वं क्षंतुमर्हसि ’ अशी प्रार्थना करुन तदनंतर दूध घृतानें व उदकानें व्याह्रतींनीं अग्नीचें प्रोक्षण करुन अस्थिसंचयन करुं नये , तर स्नान करुन आचमन करुन घरीं यावें , ब्रह्मचर्यादि नियम करावे . तीन दिवस आशौच धरावें . चवथ्या दिवशी वस्त्रसहित स्नान करुन ब्राह्मणांची पूजा करावी . सर्प , अनंत , शेष , कपिल , नाग , कालिक , शंखपाल , भूधर या नांवानीं गंध , पुष्प , अक्षता , धूप , दीप , इत्यादि उपचारांनीं ब्राह्मणांची पूजा करावी . घृत , पायस , भक्ष्य ( लाडू वगैरे ), या पदार्थांनीं आठ ब्राह्मणांना भोजन घालावें . सर्पाचें संस्कारकर्म ह्या विधानानें केलें असतां सर्पहिंसेपासून उत्पन्न झालेल्या पापापासून मुक्त होतो , यांत संशय नाहीं . "

इति सर्पसंस्कार .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP