आतां आशौचांत नियम सांगतो -
अथाशौचेनियमाः याज्ञवल्क्यः इतिसंश्रुत्यगच्छेयुर्गृहंबालपुरः सराः विदश्यनिंबपत्राणिनियताद्वारिवेश्मनः आचम्याग्न्यादिसलिलंगोमयंगौरसर्षपान् प्रविशेयुः समालभ्यकृत्वाश्मनिपदंशनैः प्रवेशनादिकंकर्मप्रेतसंस्पर्शिनामपि क्रीतलब्धाशनाभूमौस्वपेयुस्तेपृथक् क्षितौ इदंचाद्येह्नि वसिष्ठः आद्येप्रस्तरेगृहमनश्नंतआसीरन्क्रीतोत्पन्नेनवावर्तेरन् शुद्धितत्त्वेबैजवापः शमीमालभंतेशमीपापंशमयत्विति अश्मानमश्मेवस्थिरोभूयासमिति अग्निमग्निर्नः शर्मयच्छत्विति ज्योतिषअंतरागामजमुपस्पृशंतः क्रीत्वालब्ध्वावान्यगेहादेकान्नमलवणमेकरात्रंदिवाभुंजीरंस्त्रिरात्रंचकर्मोपरमणं क्रीताद्यशनमुपवासाशक्तस्य आश्वलायनस्तु नैतस्यांरात्र्यामन्नंपचेरंस्त्रिरात्रमक्षारालवणाशिनः स्युर्द्वादशरात्रंवेत्याह अशक्तौरत्नाकरेआपस्तंबः भार्याः परमगुरुसंस्थायांचाकालभोजनानिकुर्वीरन् यदामृतिः परदिनेतावत्कालमित्यर्थः बृहस्पतिः अधः शय्यासनादीनामलिनाभोगवर्जिताः अक्षारलवणान्नाः स्युर्लब्धक्रीताशनास्तथा भोगोभ्यंगतांबूलादिः क्षाराः परिभाषायामुक्ताः यत्तुमार्कंडेयपुराणे तैलाभ्यंगोबांधवानामंगसंवाहनंचयत् तेनचाप्यायतेजंतुर्यच्चाः श्नंतिस्वबांधवाः प्रथमेह्नितृतीयेचसप्तमेनवमेतथा वस्त्रत्यागंबहिः स्नानंकृत्वादद्यात्तिलोदकमिति तदंत्यदिनपरं आशौचांते तिलकल्कैः स्नातागृहंप्रविशेयुरितिविष्णूक्तेः विष्णुपुराणेत्वस्थिसंचयनोर्ध्वंभोगोप्युक्तः शय्यासनोपभोगस्तुसपिंडानामपीष्यते अस्थिसंचयनादूर्ध्वसंयोगस्तुनयोषिताम् ।
याज्ञवल्क्य - " याप्रमाणें सांत्वनवचनें श्रवण करुन बालकाला पुढें करुन घरीं जावें . घराच्या द्वारांत उभें राहून निंबपत्रें चावून आचमन करुन अग्नि , उदक , गोमय , पांढरे सर्षप यांना स्पर्श करुन दगडावर पाय ठेऊन घरांत प्रवेश वगैरे करावा . हें कर्म प्रेताला स्पर्श करणारे त्यांचेंही आहे . अन्न विकत घेऊन भोजन करावें . आणि भूमीवर पृथक् पृथक् शयन करावें . " हें अन्न विकत घेऊन भोजन करणें पहिल्या दिवशीं समजावें . कारण , वसिष्ठ - " प्रथम दिवशीं घरांत उपवास करुन दर्भशय्येवर राहावें . अथवा विकत घेतलेलें अन्न भक्षण करुन राहावें . " शुद्धितत्त्वांत बैजवाप - ‘ शमी पापं शमयतु ’ या मंत्रानें शमीला स्पर्श करितात . ‘ अश्मेव स्थिरोभूयासं ’ या मंत्रानें दगडाला स्पर्श करितात . ‘ अग्निर्नः शर्म यच्छतु ’ यानें अग्नीला स्पर्श करितात . ज्योति मध्येंकरुन गाई व बोकड यांना स्पर्श करुन अन्न विकत घेऊन किंवा दुसर्याच्या घरांतून मिळवून एक प्रकारचें अन्न लवणरहित एक दिवस दिवसा भोजन करुन रहावें . तीन दिवस सारीं कर्मै बंद करावीं . " अन्न विकत घेऊन वगैरे भोजन करणें हें उपवासाविषयीं अशक्त असेल त्याविषयीं आहे . आश्वलायन तर - " त्यांनीं त्या दिवशीं घरांत अन्न शिजवूं नये . तीन दिवस क्षार व लवणरहित अन्न भोजन करावें . अथवा बारा दिवस क्षार लवणरहित भोजन करुन असावें " असें सांगतो . वर सांगितल्याप्रमाणें राहण्याची शक्ति नसेल तर सांगतो - रत्नाकरांत आपस्तंब - " परमगुरु ( भर्ता इत्यादिक ) मृत असतां भार्यादिकांनीं कालीं भोजन करुं नये . म्हणजे ज्या वेळीं मृत असेल त्याच्या दुसर्या दिवशीं त्या वेळपर्यंत भोजन करुं नये . " बृहस्पति - " भूमीवर निजावें व बसावें . दीन व मलिन असावें . अभ्यंग , तांबूल इत्यादिकांचा उपभोग करुं नये . क्षार व लवणरहित अन्न भोजन करावें . तसेंच दुसर्याकडून मिळालेलें व विकत घेतलेलें अन्न भक्षण करावें . " क्षार व्रतप्रकरणाचे परिभाषेंत प्रथमपरिच्छेदांतं सांगितले आहेत . आतां जें मार्कंडेयपुराणांत - " बांधवांचा तैलाभ्यंग व जें अंगाचें संवाहन आणि जें बांधव भक्षण करितात त्या योगानेंही मृत झालेला जीव वृद्धिंगत होतो . पहिल्या दिवशीं , तिसर्या दिवशीं , सातव्या व नवव्या दिवशीं वस्त्रांचा त्याग व बाहेर स्नान करुन तिलोदक द्यावें " या वचनांत तैलाभ्यंग वगैरे सांगितला तो शेवटच्या ( आशौचसमाप्तीच्या ) दिवशीं समजावा . कारण , " आशौचाचे शेवटीं तिलांचा कल्क अंगास लावून स्नान करुन घरांत प्रवेश करावा . " असें विष्णुवचन आहे . विष्णुपुराणांत तर - स्थिसंचयनोत्तर शय्यादिभोगही सांगितला आहे . " अस्थिसंचयनानंतर सपिंडांना शय्या , आसन इत्यादिकांचा भोगही इष्ट आहे . स्त्रीसंग तर इष्ट नाहीं . "
भारते तिलान्ददतुपानीयंदीपंददतुजाग्रतु ज्ञातिभिः सहभोक्तव्यमेतत्प्रेतेषुदुर्लभं मनुः मांसाशनंचनाश्नीयुः शयीरंश्चपृथक् क्षितौ देवजानीयेकारिकायां लवणक्षारमाषान्नापूपमांसानिपायसं वर्जयेदाह्रतान्नेषुबालवृद्धातुरैर्विना उपवासोगुरौप्रेतेपत्न्याः पुत्रस्यवाभवेत् मरीचिः प्रथमेह्नितृतीयेचसप्तमेदशमेतथा ज्ञातिभिः सहभोक्तव्यमेतत्प्रेतेषुदुर्लभं भोजनंचदिवैव दिवाचैवतुभोक्तव्यममांसंमनुजर्षभेतिविष्णुपुराणात् क्रीत्वालब्ध्बावादिवान्नमश्नीयुरितिपारस्करोक्तेश्च मदनरत्नेहारीतः पाणिषुमृन्मयेषुपर्णपुटकेषुवाश्नीरन् देवजानीयेब्राह्मे आशौचमध्येयत्नेनभोजयेच्चस्वगोत्रजान् अंत्यदिनेतुमदनरत्नेब्राह्मेः यस्ययस्यतुवर्णस्ययद्यत्स्यात्पश्चिमंत्वहः सतत्रगृहशुद्धिंचवस्त्रशुद्धिंकरोत्यपि अंत्यकर्मकालीनवस्त्रयोस्तुतत्रैवोक्तं ग्रामाद्वहिस्ततोगत्वाप्रेतस्पृष्टेतुवाससी अंत्यानामाश्रितानांचत्यक्त्वास्नानंकरोत्यथेति शंखः दानंप्रतिग्रहोहोमः स्वाध्यायः पितृकर्मच प्रेतपिंडक्रियावर्ज्यमाशौचेविनिवर्तते काठकगृह्ये यत्रप्राणोत्क्रमस्तत्रान्वहंमहाबलिंकुर्यादितिपारस्करः तदानीमेववस्त्रंतंडुलंदीपंकांस्यभाजनंप्रेतायदद्यात् आशौचप्रकाशेभरद्वाजः वासोन्नंचजलंकुंभंप्रदीपंकांस्यभाजनं नग्नप्रच्छादनेश्राद्धेब्राह्मणायनिवेदयेत् भृगुः तिलोदकंतथापिंडान्नग्नप्रच्छादनादिकं रात्रौनकुर्यात्संध्यायांयदिकुर्यान्निरर्थकम् ।
भारतांत - ‘ प्रेतांना तिल व पाणी द्यावें . दीप द्यावा . जागावें . ज्ञातींसह भोजन करावें . हें प्रेतांना दुर्लभ आहे . ’ मनु - " आशौचांत मांस भक्षण करुं नये . व भूमीवर वेगवेगळें शयन करावें . " देवजानीयांत कारिकेंत - " बालक , वृद्ध , रोगी यांवांचून इतरांनीं दुसर्याकडून आणलेल्या अन्नामध्यें देखील लवण , दूध , माषान्न ( उडदांचें अन्न ), अपूप , मांस , पायस , हीं वर्ज्य करावीं . पिता मृत असतां पत्नी व पुत्र यांना उपवास सांगितला आहे . " मरीचि - " प्रथम दिवशीं , तिसर्या दिवशीं , सातव्या व दहाव्या दिवशीं ज्ञातीसह भोजन करावें . हें प्रेतांना दुर्लभ आहे . " भोजन दिवसासच सांगितलें आहे . " दिवसासच मांसवर्जित भोजन करावें " असें विष्णुपुराणवचन आहे . आणि " दुसर्याकडून विकत घेऊन किंवा मिळालेलें अन्न दिवसा भोजन करावें " असें पारस्करवचनही आहे . मदनरत्नांत हारीत - " हातावर अन्न घेऊन किंवा मातीच्या पात्रांत अथवा पानाच्या पत्रावळींत अन्न घेऊन भक्षण करावें . " देवजानीयांत ब्राह्मांत - " आशौचामध्यें प्रयत्नानें आपल्या गोत्रजांना भोजन घालावें . " शेवटच्या दिवशीं तर सांगतो मदनरत्नांत ब्राह्मांत - " ज्या ज्या ब्राह्मणादि वर्णाचा जो जो दिवस आशौच समाप्तीचा असेल त्या दिवशीं त्यानें गृहशुद्धि आणि वस्त्रांची शुद्धि करावी . " अंत्यकर्मकालीं असलेल्या वस्त्रांविषयीं तेथेंच सांगितलें आहे - " तदनंतर आशौचसमाप्तिदिवशीं गांवाच्या बाहेर जाऊन प्रेताला स्पृष्ट झालेलीं वस्त्रें आणि पुढचीं धारण केलेलीं वस्त्रें टाकून देऊन नंतर स्नान करावें . " शंख - " दान , प्रतिग्रह , होम , वेदाध्ययन आणि प्रेतक्रियेवांचून इतर पितृकर्म हीं आशौचांत निवृत्त ( बंद ) होतात . " काठकगृह्यांत - " ज्या ठिकाणीं प्राणोत्क्रमण झालें असेल त्या ठिकाणीं दररोज महाबलि करावा . " पारस्कर - " त्या वेळींच वस्त्र , तंदुल , दीप , आणि कांस्यपात्र हीं प्रेताला द्यावीं . " आशौचप्रकाशांत भरद्वाज - " वस्त्र , अन्न , उदक , कुंभ , दीप , कांस्यपात्र हीं नग्नप्रच्छादन श्राद्धाचे ठायीं ब्राह्मणाला द्यावीं . " भृगु - " तिलोदक , पिंड , नग्नप्रच्छादनादिक कर्म , हीं रात्रीं व संध्याकाळीं करुं नयेत ; केलीं तर निरर्थक होतील . "