आतां तिलतर्पणाचा निषेध सांगतो -
अथतिलतर्पणनिषेधः गार्ग्यः भानौभौमेत्रयोदश्यांनंदाभृगुमघासुच पिंडदानंमृदास्नानंनकुर्यात्तिलतर्पणं स्मृत्यर्थसारे विवाहव्रतचूडासुवर्षमर्धंतदर्धकं अर्धंतदेव वृद्धौसत्यांचतन्मासिनेत्याहुस्तिलतर्पणं हेमाद्रौमरीचिः सप्तम्यांरविवारेचगृहेजन्मदिनेतथा निशासंध्यासुपुत्रार्थीनकुर्यात्तिलतर्पणं यत्तु संग्रहे नंदायांभार्गवदिनेकृत्तिकासुमघासुच भरण्यांभानुवारेचगजच्छायाह्वयेतथा अयनद्वितयेचैवमन्वादिषुयुगादिषु पिंडदानंमृदास्नानंनकुर्यात्तिलतर्पणमिति तच्चिंत्यं पानीयमप्यत्रतिलैर्विमिश्रंदद्यात् पितृभ्यः प्रयतोमनुष्यइत्यादिविरोधात् अत्रापवादः पृथ्वीचंद्रोदये तीर्थेतिथिविशेषेचगंगायांप्रेतपक्षके निषिद्धेपिदिने कुर्याणंतिलमिश्रितं स्मृत्यर्थसारेपि तिथितीर्थंविशेषेषुकार्यंप्रेतेचसर्वदेति गोभिलः तिलाभावेनिषिद्धाहेसुवर्णरजतान्वितं तदभावेनिषिंचेत्तुदर्भमंत्रेणवापुनः पतितस्यतिलोदकंवक्ष्यामः ।
गार्ग्य - " रविवार , भौमवार , त्रयोदशी , नंदा ( १।६।११ या तिथि ), भृगुवार , मघानक्षत्र , यांचे ठायीं पिंडदान , मृत्तिकास्नान आणि तिलतर्पण करुं नये . " स्मृत्यर्थसारांत - " विवाह , उपनयन , चौल हे संस्कार झाले असतां अनुक्रमानें एक वर्ष , अर्धै वर्ष आणि तीन महिनेपर्यंत पिंडदानादिक करुं नयेत . वरील विवाहादिव्यतिरिक्त वृद्धिश्राद्ध झालें असतां त्या मासांत तिलतर्पण करुं नये , असें सांगतात . " हेमाद्रींत मरीचि - " सप्तमी , रविवार , घर , जन्मदिवस , रात्र , संध्याकाळ यांचे ठिकाणीं पुत्रार्थीनें तिलतर्पण करुं नये . " आतां जें संग्रहांत - " नंदा ( १।६।११ या तिथि ), भृगुवार , कृत्तिकानक्षत्र मघा , भरणी , भानुवार , गजच्छाया , दक्षिणायन व उत्तरायण , मन्वादिक , युगादिक , इतक्या ठिकाणीं पिंडदान मृत्तिकास्नान आणि तिलतर्पण करुं नये " असें सांगितलें , तें चित्यं ( उपेक्षणीय ) आहे . कारण , " येथें ( मन्वादिकांचे ठायीं ) मनुष्यानें पितरांना तिलमिश्रित पाणी तरी द्यावें " इत्यादि वचनाशीं विरोध येतो . निषेधापवाद पृथ्वीचंद्रोदयांत सांगतो - तीर्थाचे ठायीं , विशेष तिथि असतां , गंगेचे ठायीं , आणि पितृपक्षांत निषिद्ध दिवशीं देखील तिलमिश्रित तर्पण करावें . " स्मृत्यर्थसारांत - " विशेष तिथि आणि विशेष तीर्थ प्राप्त असतां आणि कोणी मृत असतां सर्वदा तिलतर्पण करावें . " गोभिल - " तिलांच्या अभावीं व निषिद्ध दिवशीं सोनें रुपें यांनीं युक्त उदकानें तर्पण करावें . सोनें रुपें यांच्या अभावीं दर्भ व मंत्र यांनीं उदक द्यावें . " पतिताला तिलोदक पुढें ( आशौचप्रकरणीं ) सांगूं .