मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
कुष्ठीमृताविषयीं

तृतीय परिच्छेद - कुष्ठीमृताविषयीं

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


कुष्ठीमृताविषयीं सांगतो -
कुष्ठिमृतौतुयमः मृतस्यकुष्ठिनोदेहंनिखनेद्गोष्ठभूमिषु वासरत्रितयंपश्चादुद्धृत्यान्यत्रतंदहेत् नगंगाप्लवनंकार्यंनिक्षेपेविधिरुच्यते षडब्दव्रतपूर्णेनविधिनांत्यंक्रतुंचरेत् ततोस्थिसंचयंतस्यगंगायांप्रक्षिपेत्सुधीः मासिमासिततः कुर्यान्मासिश्राद्धानिपार्वणान् इत्येतत् कुष्ठिमरणेकथितंशास्त्रकोविदैः शुद्धितत्त्वेभविष्ये श्रृणुकुष्ठगणंविप्रउत्तरोत्तरतोगुरुं विचर्चिकातुदुश्चर्माचर्चरीयस्तृतीयकः विकर्चूर्व्रणताम्रौचकृष्णश्वेतेतथाष्टकमित्युक्त्वा मृतेतुप्रापयेत्तीर्थमथवातरुमूलकं नपिंडंनोदकंकार्यंनचदानक्रियांचरेत् षण्मासीयस्त्रिमासीयोमृतः कुष्ठीकदाचन यदिस्नेहाच्चरेद्दाहंयतिचांद्रायणंचरेत् अकृतप्रायश्चित्तकुष्ठ्यादिदाहेइदंप्रायश्चित्तं अतएवकुनख्यादिवत्कुष्ठिनोपिद्वादशरात्रंशूलपाणिनोक्तं अतएवान्यदीयकुष्ठिनोमरणांतमाशौचमुक्तंकौर्मे क्रियाहीनस्यमूर्खस्यमहारोगिणएवच यथेष्टाचरणस्याहुर्मरणांतमशौचकम् महारोगास्तु वातव्याध्यश्मरीकुष्ठमेहोदरभगंदराः अर्शांसिग्रहणीत्यष्टौमहारोगाः प्रकीर्तिताइति ।

यम - “ कुष्ठी मृत असतां त्याचें प्रेत गाईच्या गोठ्यांत पुरुन तीन दिवस ठेवावें. नंतर काढून दुसर्‍या ठिकाणीं त्याचा दाह करावा. कुष्ठ्याचें प्रेत गंगेंतून वाहवूं नये, त्याच्या अस्थिनिक्षेपाविषयीं विधि सांगतों - त्याचें षडब्दप्रायश्चित्त पूर्ण करुन विधीनें प्रेतसंस्कार करावा. तदनंतर त्याचें अस्थिसंचयन करुन गंगेंत त्या अस्थि टाकाव्या. तदनंतर महिन्यामहिन्याला मासिकश्राद्धें पार्वणविधीनें करावीं. असा हा प्रकार कुष्ठिमरणाविषयीं शास्त्रवेत्त्यांनीं सांगितला आहे. ” शुद्धितत्त्वांत भविष्यांत - “ उत्तरोत्तर अधिक दोषी असे कुष्ठाचे प्रकार सांगतों, श्रवण कर. विचर्चिका, दुश्चर्मा, चर्चरीय, विकर्चू, व्रणकुष्ठ, ताम्रकुष्ठ, कृष्णकुष्ठ आणि श्वेतकुष्ठ, अशीं आठ कुष्ठें आहेत. ” असें सांगून पुढें सांगतो - “ या आठांपैकीं कुष्ठरोगी मृत असतां त्याचा देह तीर्थांत टाकावा; अथवा वृक्षाच्या खालीं पुरावा. त्याला पिंड देऊं नये, उदक देऊं नये व त्याच्या उद्देशानें दानही करुं नये. सहा महिने किंवा तीन महिने कुष्ठ असलेला रोगी जर मृत होईल व त्याचा स्नेहानें कोणी दाह करील तर दाहकर्त्यानें यतिचांद्रायण प्रायश्चित्त करावें. ” ज्या कुष्ठ्यादिरोग्यानें प्रायश्चित्त केलें नसेल त्याच्या दाहाविषयीं हें प्रायश्चित्त समजावें. सर्व कुष्ठ्यांच्या दाहाविषयीं हें प्रायश्चित्त नाहीं म्हणूनच कुनखी ( नखें कुजलेला ) याच्या दाहाप्रमाणें कुष्ठ्याच्या दाहाविषयीं देखील बारा दिवसांचें ( प्राजापत्य ) प्रायश्चित्त शूलपाणीनें सांगितलें आहे. म्हणूनच दुसर्‍याच्या कुष्ठिरोग्याचे मरणांत आशौच सांगितलें आहे, कूर्मपुराणांत - “ क्रियारहित, मूर्ख, महारोगी आणि यथेच्छ आचरण करणारा यांचें मरणात आशौच सांगतात. ” महारोग तर - “ वातव्याधि, अश्मरी ( मूतखडा ), कुष्ठ, मेह, उदर, भगंदर, मुळव्याध, संग्रहणी हे आठ मह रोग सांगितले आहेत. ”

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP