आतां क्षयाहश्राद्ध ( सांवत्सरिक ) सांगतों -
अथक्षयाहश्राद्धं तत्स्वरुपमाहहेमाद्रौव्यासः मासपक्षतिथिस्पष्टेयोयस्मिन् म्रियतेहनि प्रत्यब्दंतुतथाभूतंक्षयाहंतस्यतंविदुः नारदीये पारणेमरणेनृणांतिथिस्तात्कालिकीस्मृता अत्रचांद्रंमानंज्ञेयं आब्दिकेपितृकार्येचचांद्रोमासः प्रशस्यतइतिगर्गोक्तेः मलमासमृतस्यतुसौरं मलमासमृतानांतुसौरंमानंसमाश्रयेदितिहेमाद्रावुक्तेः एतन्मृतमासस्यैवाधिक्येज्ञेयं ब्राह्मे प्रतिसंवत्सरंकार्यंमातापित्रोर्मृतेहनि पितृव्यस्याप्यपुत्रस्यभ्रातुर्ज्येष्ठस्यचैवहि अपुत्रस्येतिभ्रात्राप्यन्वयः ज्येष्ठस्येतिकनिष्ठस्यानावश्यकत्वार्थं मदनरत्नेभविष्ये सर्वेषामेवश्राद्धानांश्रेष्ठंसांवत्सरंमतम् तथा भोजकोयस्तुवैश्राद्धंनकरोतिखगाधिप मातापितृभ्यांसततंवर्षेवर्षेमृतेहनि सयातिनरकंघोरंतामिस्रंनामनामतः तच्च नानास्मृतिष्वेकोद्दिष्टंपार्वणंचोक्तं आद्यमाहयमः सपिंडीकरणादूर्ध्वंप्रतिसंवत्सरंसुतैः मात्रापित्रोः पृथक्कार्यमेकोद्दिष्टंमृतेहनि व्यासः एकोद्दिष्टंतुकर्तव्यंपित्रोश्चैवमृतेहनि एकोद्दिष्टंपरित्यज्यपार्वणंकुरुतेनरः अकृतंतद्विजानीयाद्भवेच्चपितृघातकः अंत्यमाहशातातपः सपिंडीकरणंकृत्वाकुर्यात् पार्वणवत्सदा प्रतिसंवत्सरंश्राद्धंछागलेनोदितोविधिः यः सपिंडीकृतंप्रेतंपृथक् पिंडेनियोजयेत् विधिघ्नस्तेनभवतिपितृहाचोपजायते अत्रौरसक्षेत्रजयोः पार्वणंदत्तकादीनामेकोद्दिष्टमित्येकः पक्षः साग्नेः पार्वणंनिरग्नेरेकोद्दिष्टमित्यपरः तद्दूषणंमिताक्षरादौज्ञेयं कल्पतरुस्तुसाग्न्योरौरसक्षेत्रजयोः पार्वणं निरग्निकयोस्त्वेकोद्दिष्टमित्याह अपरार्केप्येवं दत्तकादयोदशपुत्रास्तुसाग्नयोनिरग्नयश्चैकोद्दिष्टमेवकुर्युः प्रत्यब्दंपार्वणेनैवविधिनाक्षेत्रजौरसौ कुर्यातामितरेकुर्युरेकोद्दिष्टंसुतादशेति जातूकर्ण्योक्तेः यदातुदत्तकस्यपितादर्शेमहालयेवामृतस्तत्रपार्वणैकोद्दिष्टयोर्विकल्पः वस्तुतस्तुसर्वेषांपार्वणैकोद्दिष्टयोर्व्रीहियववद्विकल्पः सचदेशाचाराव्द्यवस्थितइतिसर्वनिबंधसिद्धांतः अतएवपृथ्वीचंद्रोदयेवृद्धपराशरः मातापित्रोः पृथक्कार्यमेकोद्दिष्टंमृतेहनीत्युक्त्वाह देशधर्मंसमाश्रित्यवंशधर्मंतथापरे सूरयः श्राद्धमिच्छंतिपार्वणंचक्षयान्ह्यपीति तच्चकेवलपितृणां नसपत्नीकानामितिहेमाद्रिः अत्रमातामहानकार्याः कर्षूसमन्वितंमुक्त्वातथाद्यंश्राद्धषोडशं प्रत्याब्दिकंचशेषेषुपिंडाः स्युः षडितिस्थितिरितिकात्यायनोक्तेः कर्षूसमन्वितंसपिंडनं यैरेकोद्दिष्टंक्रियतेतेषामपिक्कचित् पार्वणमेव अमावास्यांक्षयोयस्यप्रेतपक्षेथवापुनः पार्वणंतस्यकर्तव्यंनैकोद्दिष्टंकदाचनेति शंखोक्तेः ।
क्षयाहाचें स्वरुप सांगतो हेमाद्रींत व्यास - " मास , पक्ष , तिथि यांनीं स्पष्ट केलेल्या ज्या दिवशीं जो मनुष्य मृत होतो त्या मनुष्याचा प्रतिवर्षीं तसा मास , पक्ष , तिथि , यांनीं स्पष्ट केलेला तो दिवस क्षयाह , असें सांगतात . " नारदीयांत - " मनुष्यांच्या उपवासाच्या पारणेविषयीं आणि मरणाविषयीं तिथि घ्यावयाची ती त्या कालीं असलेली समजावी . " येथें चांद्रमान समजावें . कारण , " सांवत्सरिक पितृकार्याचे ठायीं चांद्रमास प्रशस्त आहे " असें गर्गवचन आहे . मलमासांत मृत झालेल्याचें सौरमान समजावें . कारण , " मलमासांत मृतांचें सौरमान ग्रहण करावें " असें हेमाद्रींत वचन आहे . हें मान ज्या मासांत मृत असेल तो अधिक असतां समजावें . ब्राह्मांत - " प्रतिवर्षीं मातापितरांच्या मृतदिवशीं श्राद्ध करावें . पुत्ररहित अशा पितृव्याचें ( चुलत्याचें ) व पुत्ररहित ज्येष्ठभ्रात्याचेंही प्रतिवर्षीं श्राद्ध करावें . " या वचनांत ज्येष्ठ भ्रात्याचें असें सांगितल्यावरुन कनिष्ठाचें श्राद्ध अवश्यक नाहीं , असें सूचित होतें . मदनरत्नांत भविष्यांत - " सर्वश्राद्धांमध्यें सांवत्सरिक श्राद्ध श्रेष्ठ सांगितलें आहे . तसेंच भोजन करणारा जो मनुष्य मातापितरांचें प्रतिवर्षीं मृतदिवशीं श्राद्ध करीत नाहीं , तो तामिस्त्रनांवाच्या भयंकर नरकास जातो . " तें प्रतिसांवत्सरिक श्राद्ध अनेक स्मृतींमध्यें एकोद्दिष्ट आणि पार्वण असें दोन प्रकारचें सांगितलें आहे . पहिलें ( एकोद्दिष्ट ) सांगतो यम - " पुत्रांनीं सपिंडीकरणानंतर प्रतिवर्षीं मृतदिवशीं मातापितरांचें वेगवेगळें एकोद्दिष्ट श्राद्ध करावें . " व्यास - " मातापितरांचें मृतदिवशीं एकोद्दिष्ट करावें . जो मनुष्य एकोद्दिष्टं वर्ज्य करुन पार्वण करितो , त्यानें तें केलेलें श्राद्ध न केल्यासारखें समजावें , व तो मनुष्य पितृघातक होतो . " दुसरें ( पार्वण ) सांगतो शातातप - " सपिंडीकरण करुन प्रतिवर्षीं सदा पार्वणाप्रमाणें श्राद्ध करावें , हा विधि छागलानें सांगितला आहे . जो मनुष्य सपिंडीकरण केलेल्या प्रेतास पृथक् पिंडाचे ठायीं योजील , तो मनुष्य त्या कर्मानें विधिनाशक व पितृघातक होतो . " येथें औरस व क्षेत्रज या दोन पुत्रांनीं पार्वण करावें , आणि दत्तक इत्यादि पुत्रांनीं एकोद्दिष्ट करावें , हा एक पक्ष . साग्निकानें पार्वण व निरग्निकानें एकोद्दिष्ट हा दुसरा पक्ष . ह्या दोन्ही पक्षांना दोष आहे , तो मिताक्षरा इत्यादि ग्रंथांतून जाणावा . कल्पतरु तर - साग्निक अशा औरस - क्षेत्रजांनीं पार्वण करावें , आणि निरग्निकांनीं एकोद्दिष्ट करावें , असें सांगतो . अपरार्कांतही असेंच आहे . दत्तक इत्यादि दहा प्रकारचे पुत्र साग्निक असोत किंवा अग्निरहित असोत , त्यांनीं एकोद्दिष्टच करावें . कारण , " क्षेत्रज व औरस दोन पुत्रांनीं प्रतिवर्षीं पार्वणविधीनें श्राद्ध करावें . इतर दहा प्रकारच्या पुत्रांनीं एकोद्दिष्ट करावें " असें जातूकर्ण्याचें वचन आहे . जेव्हां दत्तकाचा पिता दर्शाचे ठायीं किंवा महालयांत मृत असेल तेव्हां येथें पार्वणाचा व एकोद्दिष्टाचा विकल्प समजावा . वास्तविक म्हटलें तर सर्वांना पार्वण व एकोद्दिष्ट यांचा विकल्प आहे . जसा श्रौतांत हवनीयद्रव्याविषयीं व्रीहि व यव यांचा विकल्प सांगितला आहे तद्वत . त्या पार्वण - एकोद्दिष्टाच्या विकल्पाची देशाचारावरुन व्यवस्था समजावी , म्हणजे ज्या देशीं पार्वणाचा आचार असेल त्या देशीं पार्वण आणि ज्या देशांत एकोद्दिष्टाचा आचार असेल तेथें एकोद्दिष्ट समजावें , हा सर्व निबंधांचा सिद्धांत आहे . म्हणूनच पृथ्वीचंद्रोदयांत वृद्धपराशर - " मातापितरांचें मृतदिवशीं वेगवेगळें एकोद्दिष्ट करावें " असें बोलून सांगतो - " देशधर्माचा तसाच कुलधर्माचा आश्रय करुन इतर विद्वान् मृतदिवशीं देखील पार्वणश्राद्ध इच्छितात . " तें सांवत्सरिकश्राद्ध केवळ पिता इत्यादि तिघांचें समजावें . सपत्नीकांचें समजूं नये , असें हेमाद्रि सांगतो . या श्राद्धांत मातामह नाहींत . कारण , " कर्षूयुक्त ( सपिंडीकरण ), षोडशमासिकें आणि प्रतिसांवत्सरिक हीं वर्ज्य करुन इतर श्राद्धांचे ठायीं सहा पिंड होतात , अशी शास्त्रमर्यादा आहे " असें कात्यायनवचन आहे . जे एकोद्दिष्ट करितात त्यांनाही क्कचित् ठिकाणीं पार्वण आहेच . कारण , " अमावास्येस किंवा पितृपक्षांत जो मृत झाला त्याचें पार्वण करावें , एकोद्दिष्ट करुं नये " असें शंखवचन आहे .
एवंसंन्यासिनोपि एकोद्दिष्टंयतेर्नास्तित्रिदंडग्रहणादिह सपिंडीकरणाभावात् पार्वणंतस्यसर्वदेतिप्रचेतसोक्तेः वायवीये संन्यासिनोप्याब्दिकादिपुत्रः कुर्याद्यथाविधि महालयेतुयच्छ्राद्धंद्वादश्यांपार्वणंहितत् पृथ्वीचंद्रोदयेवृद्धपराशरः संग्रामेसंस्थितानांचप्रेतपक्षेशशिक्षये तेषांपार्वणमेवोक्तंक्षयाहेपिचसत्तमैः चंद्रक्षयानाशकसंयुगेषुयः प्रेतपक्षेमृतवान् सपिंडः सपिंडितानामपिचाब्दिकानिभवंतितेषामिहपार्वणानि तथा भ्रातुर्ज्येष्ठस्यकुर्वीतज्येष्ठोभ्रातानुजस्यच दैवहीनंतुतत्कुर्यादितिधर्मविदब्रवीत् दैवहीनमेकोद्दिष्टं ज्येष्ठोभ्रातानाद्यगर्भजः तथाचतत्रैवशातातपः अनाद्यगर्भज्येष्ठोपिभ्रातासद्भिर्निगद्यते ऋतेसपिंडनात्तस्यनैवपार्वणमाचरेत् आद्यगर्भेतुपार्वणमेकोद्दिष्टंवेत्यर्थः मातुस्तुहेमाद्रौकात्यायनः प्रत्यब्दंयोयथाकुर्यात् पुत्रः पित्रे सदाद्विजः तथैवमातुः कर्तव्यंपार्वणंचान्यदेववा यत्तुतेनैवोक्तं सपिंडीकरणादूर्ध्वंपित्रोरेवहिपार्वणं पितृव्यभ्रातृमातृणामेकोद्दिष्टंसदैवत्विति तत्सापत्नमातृपरं यत्तुवृद्धपराशरः अपुत्रस्यपितृव्यस्यतत् पुत्रोभ्रातृजोभवेत् सएवास्यतुकुर्वीतपिंडदानादिकक्रियां पार्वणंतेनकार्यंस्यात्पुत्रवद्भ्रातृजेनतु पितृस्थानेतुतंकृत्वाशेषंपूर्ववदुच्चरेदिति तत् पितृवद्देशाचारवव्द्यवस्थितमितिपृथ्वीचंद्रः श्राद्धदीपकलिकायांचतुर्विंशतिमतेतु पितृव्यभ्रातृमातृणांज्येष्ठानांपार्वणंभवेत् एकोद्दिष्टंकनिष्ठानांदंपत्योः पार्वणंमिथः अपुत्रस्यपितृव्यस्यभ्रातुश्चैवाग्रजन्मनः मातामहस्यतत्पत्न्याः श्राद्धंपार्वणवद्भवेदित्युक्तं तत्पत्न्याः कर्तृत्वेपिपार्वणमेव सर्वाभावेस्वयंपत्न्यः स्वभर्तृणाममंत्रकं सपिंडीकरणंकुर्युस्ततः पार्वणमेवचेतिलौगाक्षिस्मृतेः ततः पत्न्यापिकुर्वीतसापिंड्यं पार्वणंतथेतिसुमंतूक्तेश्चेतिनिर्णयामृतेउक्तं अन्येत्वेतत्पाक्षिकपार्वणपरमाहुः अतएव भर्तुः श्राद्धंतुयानारीमोहात्पार्वणमाचरेत् नतेनतृप्यतेभर्ताकृत्वातुनरकंव्रजेदितिवचनंक्षयाहेपाक्षिकैकोद्दिष्टप्रशंसार्थं नपार्वणनिषेधार्थमित्युक्तंत्रिस्थलीसेतौभट्टचरणैः स्वभर्तृप्रभृतित्रिभ्यइत्यनेनविरोधाच्च ।
याप्रमाणें संन्याशाचेंही पार्वण समजावें . कारण , " संन्याशानें त्रिदंडग्रहण केल्यामुळें सपिंडीकरणाचा अभाव असल्यानें त्याला एकोद्दिष्ट नाहीं , त्याचें सर्वदा पार्वण करावें " असें प्रचेतसाचें वचन आहे . वायवीयांत - " संन्याशाचेंही सांवत्सरिकादिश्राद्ध पुत्रानें यथाविधि करावें . महालयांत करावयाचें तें द्वादशीस पार्वण करावें . " पृथ्वीचंद्रोदयांत वृद्धपराशर - " युद्धामध्यें मृत झालेल्यांचें पितृपक्षांत अमावास्येस पार्वणच सांगितलें आहे व मृतदिवशीं देखील पार्वणच करावें . अमावास्येस , अनशन ( अभक्षण ) व्रताचे ठायीं , युद्धांत , आणि पितृपक्षांत जे सपिंड मृत असतील त्यांचीं सपिंडीकरणें झालीं असतांही सांवत्सरिकें पार्वणें होतात . तसेंच ज्येष्ठ भ्रात्याचें कनिष्ठानें व कनिष्ठभ्रात्याचें ज्येष्ठभ्रात्यानें दैवहीन ( एकोद्दिष्ट ) श्राद्ध करावें , असें धर्मवेत्ता सांगता झाला . " येथें ज्येष्ठभ्राता द्वितीयादिगर्भापासून झालेला समजावा . कारण , तसेंच तेथें शातातप सांगतो - " द्वितीयादिगर्भापासून झालेलाही ज्येष्ठभ्राता म्हटला आहे . त्याचें सपिंडीकरणावांचून पार्वण करुं नये . " पहिल्या गर्भाचें तर पार्वण किंवा एकोद्दिष्ट , असा इत्यर्थ होय . मातेचें श्राद्ध तर हेमाद्रींत कात्यायन सांगतो - " जो पुत्र पित्याचें प्रतिवर्षीं जसें करील तसेंच मातेचें पार्वण किंवा एकोद्दिष्ट करावें . " आतां जें त्यानेंच ( कात्यायनानेंच ) सांगितलें कीं , " सपिंडीकरणानंतर मातापितरांचेंच पार्वण करावें . चुलता , भ्राता , माता यांचें सदा एकोद्दिष्टच करावें " या वचनांत मातेचें एकोद्दिष्ट सांगितलें तें सापत्नमातृविषयक होय . आतां जें वृद्धपराशर सांगतो कीं , " भ्रात्याचा पुत्र तोच पुत्ररहित अशा पितृव्याचा पुत्र होतो ; त्याच भ्रातृपुत्रानें पितृव्याची पिंडदान वगैरे क्रिया करावी ; पुत्राप्रमाणें भ्रात्याच्या पुत्रानें पार्वण करावें . पितृस्थानीं पितृव्याचा उच्चार करुन इतर उच्चार पूर्वींप्रमाणें ( पित्याप्रमाणें ) करावा . " असें पार्वण सांगितलें त्याची देशाचाराप्रमाणें व्यवस्था समजावी , असें पृथ्वीचंद्र सांगतो . श्राद्धदीपकलिकेंत चतुर्विंशतिमतांत तर - " पितृव्य , भ्राता , माता , हीं कर्त्यापेक्षां वयानें अधिक असतील तर त्यांचें पार्वण होतें . कनिष्ठ असतील तर एकोद्दिष्ट . पतीनें स्त्रियेचें व स्त्रियेनें पतीचें परस्पर पार्वण करावें . पुत्ररहित असा पितृव्य , ज्येष्ठभ्राता , मातामह आणि मातामही यांचें श्राद्ध पार्वणाप्रमाणें होतें " असें सांगितलें आहे . तें पत्नीनें करावयाचें असलें तरी पार्वणच . कारण , " सर्वांच्या अभावीं पत्नींनीं आपापल्या भर्त्याचें सपिंडीकरण अमंत्रक करावें , तदनंतर पार्वणच करावें " असें लौगाक्षिस्मृतिवचन आहे . " इतरांच्या अभावीं पत्नीनेंही सापिंड्य व तसेंच पार्वण करावें " असें सुमंतूचें वचन आहे , असें निर्णयामृतांत सांगितलें आहे . इतर ग्रंथकार तर हें वचन एकपक्षीं पार्वणविषयक आहे , असें सांगतात . म्हणूनच " जी स्त्री अविचारानें भर्त्याचें पार्वणश्राद्ध करील , त्या श्राद्धानें भर्ता तृप्त होत नाहीं व तसें पार्वण करुन ती नरकास जाईल " हें वचन मृतदिवशीं एकपक्षीं एकोद्दिष्टाचे प्रशंसेसाठीं आहे , पार्वणाच्या निषेधासाठीं नाहीं असें त्रिस्थलीसेतूंत नारायणभट्टांनीं सांगितलें आहे . आणि जर पार्वणनिषेधासाठीं म्हटलें तर " स्त्रियेनें आपला भर्ता , त्याचा पिता व पितामह या तिघांना श्राद्ध द्यावें " या वचनाशीं विरोधही येतो .
अपुत्राणांचाहहेमाद्रावापस्तंबः अपुत्रायेमृताः केचित् स्त्रियोवापुरुषाश्चये तेषामपिचदेयंस्यादेकोद्दिष्टंनपार्वणं मित्रबंधुसपिंडेभ्यः स्त्रीकुमारिभ्यएवच दद्याद्वैमासिकंश्राद्धंसांवत्सरमतोन्यथा पारिजातेतु अन्यथापार्वणमित्युक्त्वासर्वत्रपार्वणमित्युक्तं एकोद्दिष्टवाक्यानितुतीर्थमहालयपराणीत्युक्तं पृथ्वीचंद्रोदयेवृद्धगार्ग्यः मातुः सहोदरायाचपितुः सहभवाचया तयोश्चनैवकुर्वीतपार्वणंपिंडनादृते प्रचेताः सपिंडीकरणादूर्ध्वमेकोद्दिष्टंविधीयते अपुत्राणांचसर्वेषामपत्नीनांतथैवच अपत्नीनांब्रह्मचार्यादीनां मार्कंडेयपुराणे प्रतिसंवत्सरंकार्यमेकोद्दिष्टंनरैः स्त्रियाः मृताहनियथान्यायंनृणांयद्वदिहोदितं नृणामितिदृष्टांतात् गोविप्रहतपाखंड्यादीनांसपिंडनाभावेपिसांवत्सरमेकोद्दिष्टंकार्यमेवेतिशूलपाणिः अत्रिवृद्धवसिष्ठौ सपिंडीकरणादूर्ध्वंयत्रयत्रप्रदीयते भ्रात्रेभगिन्यैपुत्रायस्वामिनेमातुलायच पितृव्यगुरवेश्राद्धमेकोद्दिष्टंनपार्वणं यत्तुजातूकर्ण्यः पितृव्यभ्रातृमातृणामपुत्राणांतथैवच मातामहस्यासुतस्यश्राद्धादिपितृवद्भवेदिति तदावश्यकत्वार्थंनतुपार्वणार्थमितिहेमाद्रि युक्तंत्वेवम् मातुः पितरमारभ्यत्रयोमातामहाः स्मृताः तेषांतुपितृवच्छ्राद्धंकुर्युर्दुहितृसूनवइतिपुलस्त्योक्तेर्मातामहस्यपार्वणमेव तत्साहचर्यात् पितृव्यादौतथा पितृव्यभ्रातृमातृणामेकोद्दिष्टंनपार्वणमितिक्षयाहोक्तोपक्रमेपुलस्त्योक्तेश्चविकल्पः केचित्त्वापस्तंबादिवाक्यानि व्युत्क्रमाच्चप्रतीतानांनैवकार्यासपिंडतेत्यस्यपितृव्यादिपरत्वादकृतसपिंडनपितृव्यादिपराणीत्याहुः मातासपत्नमाता एकोद्दिष्टंतुकनिष्ठपरमिति पृथ्वीचंद्रोदयेप्येवम् विशेषस्त्वधिकारिनिर्णयेप्रागुक्तः केचित् पुत्रांतराभावेपिपितामहवार्षिकमप्यावश्यकम् पुत्राभावेचतत् पुत्रः पत्नीमातातथापिता वित्ताभावेपिसच्छिष्यः कुर्यात्तस्यौर्ध्वदेहिकमितिमार्कंडेयपुराणादित्याहुस्तन्न पौत्रेणैकादशाहादिकर्तव्यंश्राद्धषोडशमितिकातीयेविशेषोक्तेः ।
पुत्ररहितांना सांगतो हेमाद्रींत आपस्तंब पुत्ररहित जे कोणी स्त्रिया किंवा पुरुष मृत असतील त्यांचेंही श्राद्ध करावें , तें एकोद्दिष्ट . पार्वण करुं नये . मित्र , बंधु , सपिंड , स्त्रिया , कुमारी यांचें मासिकश्राद्ध करावें . आणि सांवत्सरिक एकोद्दिष्ट करावें . " पारिजातांत तर अन्यथा म्हणजे पार्वण असें सांगून सर्वत्र पार्वण , असें सांगितलें . एकोद्दिष्ट करावें म्हणून जीं वाक्यें आहेत तीं तीर्थश्राद्ध , महालय यांच्या विषयीं आहेत , असें सांगितलें आहे . पृथ्वीचंद्रोदयांत वृद्धगार्ग्य - " मावशी व आत्या यांचें श्राद्ध सपिंडीकरणावांचून पार्वण करुं नये . " प्रचेता - पुत्ररहित व अपत्नीक ( ब्रह्मचारी इत्यादिक ) यांचें सपिंडीकरणानंतर एकोद्दिष्ट करावें . " मार्केंडेयपुराणांत - " पुरुषांनीं स्त्रियांचें प्रतिवर्षीं मृतदिवशीं यथाविधि एकोद्दिष्ट करावें . जसें पुरुषांचें मृतदिवशीं श्राद्ध सांगितलें आहे तद्वत् . " या वचनांत ‘ नृणां ’ म्हणजे पुरुषांचें , या दृष्टांतावरुन गाई , ब्राह्मण यांनीं मारलेले व पाखंडी इत्यादिकांचें सपिंडीकरण नसलें तरी प्रतिसांवत्सरिक एकोद्दिष्ट करावेंच , असें शूलपाणि सांगतो . अत्रि आणि वृद्धवसिष्ठ - " भ्राता , भगिनी , पुत्र , स्वामी , मातुल , पितृव्य , गुरु यांना सपिंडीकरणानंतर ज्या ज्या ठिकाणीं श्राद्ध द्यावयाचें त्या त्या ठिकाणीं एकोद्दिष्ट द्यावें . पार्वण देऊं नये . " आतां जें जातूकर्ण्य सांगतो कीं , " पितृव्य , भ्राता , माता हे पुत्ररहित असतां आणि अपुत्र मातामह यांचें श्राद्धादिक पित्याप्रमाणें होईल " असें तें अवश्य करावें इतक्यासाठीं आहे . पार्वणासाठीं नाहीं , असें हेमाद्रि सांगतो . युक्त म्हटलें म्हणजे असें आहे कीं , " मातेचा पिता आरंभ करुन तिघे ( मातेचा पिता , पितामह व प्रपितामह ) मातामह म्हटले आहेत , त्यांचें श्राद्ध कन्यापुत्रानें पित्याप्रमाणें करावें . " या पुलस्त्यवचनावरुन मातामहाचें पार्वणच करावें . जातूकर्ण्यवचनांत मातामहांबरोबर पितृव्यादिक असल्यामुळें त्यांचें ( पितृव्यादिकांचें ) तसेंच करावें . आणि " पितृव्य , भ्राता , माता यांचें एकोद्दिष्ट करावें , पार्वण करुं नये " असेंही क्षयाहाच्या उपक्रमांत ( निर्णयारंभीं ) पुलस्त्यवचन असल्यामुळें पार्वणाचा विकल्प होतो . केचित् ग्रंथकार तर - पूर्वोक्त आपस्तंब वृद्धगार्ग्य इत्यादिकांचीं एकोद्दिष्ट विधायक वचनें " व्युत्क्रमानें ( उलट - म्हणजे वडील जीवंत असतां कनिष्ठ मरणें . या क्रमानें ) मृत असतील त्यांचें सपिंडीकरण करुं नये " हें वाक्य पितृव्य , भ्राता , माता इत्यादिविषयक असल्यामुळें ज्यांचें सपिंडीकरण झालेलें नाहीं , अशा पितृव्यादिविषयक ( आपस्तंबादिवचनें ) आहेत , असें सांगतात . ह्या वरील वचनांत माता म्हणजे सापत्नमाता समजावी . एकोद्दिष्ट तर कनिष्ठविषयक आहे . पृथ्वीचंद्रोदयांत असेंच आहे . विशेष तर अधिकारिनिर्णयांत पूर्वीं सांगितला आहे . केचित् ग्रंथकार - पुत्र नाहीं , पौत्र आहे , अशा स्थलीं त्या पौत्राला पितामहाचें सांवत्सरिकही आवश्यक आहे . कारण , " पुत्राच्या अभावीं पौत्रानें , पत्नीनें , मातेनें , पित्यानें , आणि द्रव्याच्या अभावीं देखील सच्छिष्यानें मृताचें और्ध्वदेहिक करावें , " असें मार्कंडेयपुराणवचन आहे , म्हणून सांगतात . तें बरोबर नाहीं . कारण , " पौत्रानें एकादशाहादिक षोडश श्राद्धें करावीं " या कातीयांत विशेष ( षोडश श्राद्धें , असा ) सांगितला आहे .