आतां रोदनाविषयीं सांगतो -
अथरोदने समोत्तमवर्णयोः संचयनात्पूर्वंसचैलस्नानमूर्ध्वमाचमनं हीनवर्णेषुतुसंचयात्प्राक्सचैलमूर्ध्वं स्नानमात्रं विप्रस्यक्षत्रवैश्यविषयेतुब्राह्मे अस्थिसंचयनेविप्रोरौतिचेत्क्षत्रवैश्ययोः तदास्नातः सचैलस्तुद्वितीयेहनिशुध्यति कृतेतुसंचयेविप्रः स्नानेनैवशुचिर्भवेत् क्षत्रस्यवैश्येप्येवं शूद्रेतुसंचयात्प्राक् विप्रस्यत्रिरात्रं क्षत्रवैश्ययोर्द्विरात्रं ऊर्ध्वंतुद्विजानामेकाहः शूद्रस्यशूद्रेस्पर्शंविनासंचयात्पूर्वमेकाहः ऊर्ध्वंसज्योतिरितिमाधवीयेज्ञेयम् शुद्धितत्त्वेपारस्करस्तु अस्थिसंचयनादूर्ध्वंमासंयावद्दिजातयः दिवसेनैवशुध्यंतिवाससांक्षालनेनच सजातेर्दिवसेनैवत्र्यहात्क्षत्रियवैश्ययोरित्युक्तं सपिंडानांरोदननिर्हारादावदोषइत्युक्तंप्राक् विज्ञानेश्वरस्तु मृतस्यबांधवैः सार्धंकृत्वातुपरिदेवनम् वर्जयेत्तदहोरात्रंदानश्राद्धादिकर्मचेतिपारस्करोक्तेः सर्वत्रैकरात्रमाह ।
समान वर्णाच्या व उत्तम वर्णाच्या प्रेताविषयीं अस्थिसंचयनाच्या पूर्वी रोदन केलें असतां वस्त्रसहित स्नान करावें. अस्थिसंचयनानंतर रोदन केलें असतां आचमन करावें. हीन वर्णाच्या प्रेताविषयीं अस्थिसंचयनाच्या पूर्वी रोदन केलें असतां वस्त्रसहित स्नान करावें. अस्थिसंचयनानंतर करील तर स्नान मात्र करावें. ब्राह्मणाला क्षत्रिय - वैश्याविषयीं तर सांगतो ब्राह्मांत - “ क्षत्रिय व वैश्य यांचेविषयीं अस्थिसंचयन करावयाचें असतां ब्राह्मण जर रोदन करील तर वस्त्रसहित स्नान करुन दुसर्या दिवशीं शुद्ध होतो. संचयन केलें असतां ब्राह्मण रोदन करील तर स्नानानेंच शुद्ध होईल. ” वैश्याविषयीं क्षत्रियालाही असेंच समजावें. शूद्राविषयीं अस्थिसंचयनाच्या पूर्वी रोदन केलें असतां ब्राह्मणाला तीन दिवस. क्षत्रिय वैश्यांना दोन दिवस आशौच. अस्थिसंचयनानंतर शूद्राविषयीं रोदन करणार्या ब्राह्मणादिकांना एक दिवस आशौच. शूद्राविषयीं शूद्र स्पर्श केल्यावांचून अस्थिसंचयनाच्या पूर्वी रोदन करील तर एक दिवस अस्थिसंचयनानंतर रोदन करील तर सज्योति आशौच. असें माधवीयांत जाणावें. शुद्धितत्वांत पारस्कर तर - “ अस्थिसंचयनानंतर एक मास होईपर्यंत कधींही ब्राह्मणादिक रोदन करितील तर एक दिवस आशौच धरुन वस्त्रांचें क्षालन करुन शुद्ध होतील. सजातीय प्रेताविषयीं रोदन करील तर एका दिवसानेंच शुद्ध होतात. क्षत्रिय व वैश्य यांच्याविषयीं रोदन करील तर तीन दिवसांनीं शुद्ध होईल ” असें सांगतो, असें सांगितलें आहे. सपिंडांना रोदन, निर्हरण इत्यादिकांविषयीं दोष नाहीं, असें पूर्वीं सांगितलें आहे. विज्ञानेश्वर तर - “ मृताच्या बांधवांसहवर्तमान रोदन केलें असतां त्या दिवशीं दान, श्राद्ध इत्यादि कर्म वर्ज्य करावें ” ह्या पारस्कर वचनावरुन सर्वांविषयीं एक दिवस आशौच सांगतो.