मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
श्राद्धदिवशींचें कृत्य

तृतीयपरिच्छेद - श्राद्धदिवशींचें कृत्य

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां श्राद्धदिवशींचें कृत्य सांगतो -

अथश्राद्धदिनकृत्यम् ‍ चंद्रोदयेउशनाः गोमयोदकैर्भूमिभाजनशौचंकुर्यात् ‍ पराशरः कांजिकंदधितक्रंचशृतंवाशृतमेवच पूर्वमेवनदातव्यमेकोद्दिष्टेथपार्वणे हेमाद्रौपराशरः गृहाग्निशिशुदेवानां ब्रह्मचारितपस्विनाम् ‍ तावन्नदीयतेकिंचिद्यावत्पिंडान्ननिर्वपेत् ‍ कौर्मे तिलानवकिरेत्तत्रसर्वतोबंधयेदजान् ‍ तत्रैवदेवलः तथैवयंत्रितोदाताप्रातः स्नात्वासहांबरः आरभेतनवैः पात्रैरन्नारंभंचबांधवैः अत्रात्मनेपदात्स्वयमेवपाकः कार्यः अशक्तौपत्न्या तदभावेबांधवैः ततस्तानिपपाचाशुसीताजनकनंदिनीतिपाद्मलिंगादिति हेमाद्रिः श्राद्धदीपकलिकायामाश्वलायनः समानप्रवरैर्मिश्रैः सपिंडैश्चगुणान्वितैः कृतोपकारिभिश्चैवपाककार्यंप्रशस्यते व्यासः गृहिणीचैवसुस्नातापाकंकुर्यात्प्रयत्नतः निष्पन्नेषुचपाकेषुपुनः स्नानंसमाचरेत् ‍ पृथ्वीचंद्रोदयेब्राह्मे रजस्वलांचपाखंडांपुंश्चलींपतितांतथा त्यजेच्छूद्रांतथावंध्यांविधवांचान्यगोत्रजाम् ‍ व्यंगकर्णीचतुर्थाहः स्नातामपिरजस्वलाम् ‍ वर्जयेच्छ्राद्धपाकार्थममातृपितृवंशजाम् ‍ मातृपितृवंशजभिन्नांत्यजेदित्यर्थः स्मृतिसारे नपाकंकारयेत्पुत्रीमन्यांवाप्यन्यगोत्रजाम् ‍ मृतवंध्यांचगर्भघ्नींगर्भिणींचैवदुर्मुखीं ।

चंद्रोदयांत उशना - " गोमय व उदक यांनीं भूमी , पात्रें इत्यादिकांची शुद्धि करावी . " पराशर - " एकोद्दिष्टांत व पार्वणश्राद्धांत कांजी , दहीं , तक , आणि पक्क ( शिजविलेलें ) व अपक्क यांपैकीं कोणताही पदार्थ श्राद्ध होण्याच्या पूर्वीं कोणास देऊं नये . " हेमाद्रींत पराशर - " श्राद्धदिवशीं जोंपर्यंत पिंडदान केलें नाहीं तोंपर्यंत गृहांतील अग्नि , बालक , देवता , ब्रह्मचारी ( मधुकरी ), तपस्वी यांना कांहीं देऊं नये . " कौर्मांत - " श्राद्धभूमीवर तीळ टाकावे , चहूंकडे बोकड बांधावे . " तेथेंच देवल - " श्राद्धकर्त्यानें प्रातः कालीं नियमित होऊन सचैल स्नान करुन नवीं शुद्ध पात्रें घेऊन बांधवांसहवर्तमान अन्नाच्या पाकाला आरंभ करावा . " ह्या वचनांत ‘ आरभेत ’ हें ( क्रियापद ) आत्मनेपद असल्यामुळें स्वतः पाक करावा , असें होतें . स्वतः करण्यास अशक्ति असेल तर पत्नीनें करावा . तिच्या अभावीं बांधवांनीं करावा . कारण , " तदनंतर जनकाची कन्या सीता अन्नाचा पाक लवकर करिती झाली " ह्या पद्मपुराणांतील वचनानें स्त्रियांस पाकाधिकार सुचविलेला आहे . असें हेमाद्रि सांगतो . श्राद्धदीपकलिकेंत आश्वलायन - " सपिंड , सप्रवर , गुणी व उपकार केलेले अशा मनुष्यांनीं पाक करणें प्रशस्त आहे . " व्यास - " स्त्रियेनें स्वच्छ स्नान करुन मोठ्या यत्नानें उत्तम पाक करावा , सर्व पाक सिद्ध झाल्यावर पुनः स्नान करावें . " पृथ्वीचंद्रोदयांत ब्राह्मांत - " रजस्वला , पाखंडी , जारिणी , पतित , शुद्रा , वांझोटी , अन्य गोत्रांतली विधवा , जीचे कर्ण व्यंग आहेत ती , रजस्वला चतुर्थ दिवशीं स्नान केलेली , जी मातृवंशांतील किंवा पितृवंशांतील नव्हे ती , ह्या स्त्रिया श्राद्धपाकाविषयीं वर्ज्य कराव्या . " स्मृतिसारांत - " कन्या , अन्यगोत्रांतील स्त्री , मृतवंध्या ( जीचीं मुलें वांचत नाहींत ती ), गर्भहत्या करणारी , गर्भिणी , व दुर्मुखी यांच्याकडून पाक करवूं नये . "

आतां पाकाविषयीं भांडीं सांगतो -

पाकभांडानितुहेमाद्रौनागरखंडे सौवर्णान्यथरौप्याणिकांस्यताम्रोद्भवानिच मार्तिक्यान्यपिभव्यानिनूतनानिदृढानिच तत्रैवादित्यपुराणे पचेदन्नानिसुस्नातः पात्रेषुशुचिषुस्वयं स्वर्णादिधातुजातेषुमृन्मयेष्वपिवाद्विजः अच्छिद्रेष्वविलिप्तेषुतथानुपहतेषुच नायसेषुनभिन्नेषुदूषितेष्वपिकर्हिचित् ‍ पूर्वंकृतोपयोगेषुमृन्मयेषुनतुक्कचित् ‍ वायुपुराणे नकदाचित्पचेदन्नमयस्थालीषुपैतृकं अयसोदर्शनादेवपितरोपिद्रवंतिहि कालाय संविशेषेणनिंदंतिपितृकर्मणि फलानांचैवशाकानांछेदनार्थानियानितु महानसेपिशस्त्राणितेषामेवहिसन्निधिः इष्यतेनेतरस्यात्रशस्त्रमात्रस्यदर्शनं श्राद्धदेशेतुविदुषापितृणांतृप्तिमिच्छता महानसेपियुक्तानामपिकार्यंनदर्शनम् ‍ तत्रैव पचमानस्तुभांडेषुभक्त्याताम्रमयेषुच समुद्धरतिवैघोरात्पितृन् ‍ दुःखमहार्णवात् ‍ तैजसानामभावेतुपिठरेमृन्मयेपिच नवेशुचौप्रकुर्वीतपाकंपित्रर्थमादरात् ‍ तत्रैवादिपुराणे पक्कान्नस्थापनार्थेतुशस्यंतेदारुजान्यपि दर्व्यादीन्यपिकार्याणियज्ञियैरपिदारुभिः यमः विवाहेप्रेतकार्येचमातापित्रोः क्षयेहनि नवभांडानि कुर्वीतयज्ञकालेविशेषतः ।

हेमाद्रींत नागरखंडांत - " सोन्याचीं , रुप्याचीं , कांशाचीं , व तांब्याचीं पात्रें असावीं . नवीं दृढ ( न फुटणारीं ) चांगलीं अशीं मातीचींही पात्रें असावीं . " तेथेंच आदित्यपुराणांत - " द्विजानें स्वच्छ स्नान करुन शुद्ध अशा सुवर्णादि धातुपात्रांत अन्नांचा पाक स्वतः करावा , अथवा मृन्मयपात्रांत करावा . तीं पात्रें फुटकीं , इतर पदार्थानें लिप्त किंवा दूषित असूं नयेत . लोहपात्रें , फुटकीं , व दुष्ट अशा पात्रांत कधींही पाक करुं नये . पूर्वीं उपयोगांत आणलेल्या अशा मातीच्या पात्रांत कधींही पाक करुं नये . " वायुपुराणांत - " लोहपात्रांत पितृसंबंधी अन्नाचा पाक कधींही करुं नये ; कारण , लोहाच्या दर्शनानें पितर जातात . काळें लोखंड विशेषेंकरुन पितृकर्माविषयीं निंद्य आहे . फळें शाका हीं कापण्याकरितां जीं शस्त्रें पाकशाळेंत असतील तींच असूं द्यावीं , पितर तृप्त व्हावे असें इच्छिणारानें श्राद्धप्रदेशीं इतर शस्त्रांचें दर्शन होऊं देऊं नये . पाकशाळेंत असलेल्या शस्त्रांचेंही दर्शन होऊं देऊं नये . " तेथेंच सांगतो - " श्राद्धदिवशीं ताम्रमयपात्रांत भक्तीनें पाक करणारा घोरदुःखसागरापासून पितरांच्या उद्धार करितो . धातुपात्रांचा अभाव असतां नव्या शुद्ध अशा मृन्मयस्थालीमध्यें पितरांकरितां मोठ्या आदरानें पाक करावा . " तेथेंच आदिपुराणांत - " पक्क केलेलें अन्न ठेवण्यासाठीं लांकडाचीं पात्रेंही प्रशस्त आहेत . पळी वगैरे पात्रें देखील यज्ञिय ( यज्ञांत उक्त ) वृक्षांचीं करावीं . " यम - " विवाह , प्रेतकार्य , मातापितरांचा मृतदिवस यांचे ठायीं नवीं पात्रें करावीं . यज्ञकालीं विशेषेंकरुन नवीं करावीं . "

आतां पाक करण्याचा अग्नि सांगतो -

अथपाकाग्निः हेमाद्रौप्रजापतिः औपासनेनान्नसिद्धिरग्नौकरणमेवच पृथ्वीचंद्रोदयेंऽगिराः शालाग्नौतुपचेदन्नंलौकिकेवापिनित्यशः यस्मिन्नग्नौपचेदन्नंतस्मिन् ‍ होमोविधीयते मनुः वैवाहिकेग्नौकुर्वीतगृह्यंकर्मयथाविधि पंचयज्ञविधानंचपक्तिंचान्वाहिकींद्विजः श्राद्धस्यगृह्यत्वंचोक्तमपरार्केण अत्रविशेषः कर्म प्रदीपे प्रातर्होमंतुनिर्वर्त्यसमुद्धृत्यहुताशनात् ‍ शेषंमहानसेकृत्वातत्रपाकंसमाचरेत् ‍ पाकांतेग्निंतमाह्रत्यगृह्याग्नौतुपुनः क्षिपेत् ‍ ततोस्मिन्वैश्वदेवादिकर्मकुर्यादतंद्रितः तदभावेलौकिके ततः पचेयुरन्नानिनिर्वापानंतरंशनैः वैवाहिकेग्नावन्यत्रलौकिकेवापिसंयतइतिकलिकायांसंग्रहोक्तेः पित्रर्थंनिर्वापंकृत्वेत्यर्थः अतएवहेमाद्रौवायुपुराणे पित्रर्थंनिर्वपेद्भूमौकूर्चेवादर्भसंस्कृते तत्रैवपाद्ममात्स्ययोः अग्निमान्निर्वपेत्पैत्रंचरुंवासममुष्टिभिः पितृभ्योनिर्वपामीतिसर्वंदक्षिणतोन्यसेत् ‍ चरुग्रहणान्नशाकादावितिहेमाद्रिः पिंडपितृयज्ञार्थपाकविषयोयंनिर्वापइतितुयुक्तं अयंचेत्तरेषामस्ति ।

हेमाद्रींत प्रजापति - " औपासनाग्नीनें अन्नाचा पाक करावा व अग्नौकरणही त्यांतच करावें . " पृथ्वीचंद्रोदयांत अंगिरा - " अग्निशाळेंतील अग्नीवर अथवा लौकिकाग्नीवर नित्यपाक करावा . ज्या अग्नीवर पाक केला असेल त्याच अग्नीवर त्याचा होम करावा . " मनु - " गृह्यकर्म , पंचमहायज्ञ व दररोजचा पाक हें सर्व विवाहाग्नीवर यथाविधि करावें . " श्राद्ध हें गृह्यकर्म आहे असें अपरार्कानें सांगितलें आहे . येथें विशेष सांगतो कर्मप्रदीपांत - " प्रातः कालीं होम करुन नंतर त्या अग्नींतून अग्नि काढून चुलींत घालून त्याजवर पाक करावा . पाक झाल्यावर तो अग्नि पुनः गृह्याग्नींत नेऊन टाकावा . तदनंतर त्या अग्नींत वैश्वदेवादिकर्म निरालस्यपणानें करावें . " त्याच्या अभावीं लौकिकाग्नींत करावें . कारण , " पितरांच्या उद्देशानें निर्वाप करुन नंतर विवाहाग्नीवर हळूहळू पाक करावा . अथवा लौकिकाग्नीवरही पाक करावा " असें कलिकेंत संग्रहवचन आहे . म्हणूनच हेमाद्रींत वायुपुराणांत सांगतो - " भूमीवर किंवा दर्भाच्या कूर्चावर पितरांच्या उद्देशानें निर्वाप करावा . " तेथेंच पाद्मांत व मात्स्यांत - " साग्निकानें चरु करावयाच्या द्रव्याचा विषम मुष्टींनीं पितरांसाठीं ‘ पितृभ्यो निर्वपामि ’ ह्या मंत्रानें निर्वाप करावा . नंतर निर्वाप केलेलें सर्व द्रव्य दक्षिणेस ठेवावें . " या वचनांत ‘ चरु ’ असें पद आहे म्हणून शाकादिकांविषयीं निर्वाप नाहीं , असें हेमाद्रि सांगतो . पिंडपितृयज्ञाच्या पाकाविषयीं हा निर्वाप असें म्हणणें युक्त आहे . हा औपासनाग्नीवर पाक इतर शाखींना आहे .

आश्वलायनानांतु गुरुणाभिमृताअन्यतोवापक्षीयमाणा अमावास्यायांशांतिकर्मकुर्वीरन्नित्यादिसूत्रेणपचनाग्नेस्त्यागमुक्त्वाइहैवायमितरोजातवेदाइत्यर्धर्चेनशमीमयीभ्यामरणिभ्यामग्निंमंथयेत्सपचनाग्निर्भवतीतिसूत्रेवृत्तौचोक्तेः पचनाग्नावेवपाकः बौधायनेनाप्युक्तम् ‍ आह्रतपचनाग्निमौपासनंवाभिप्रव्रजंतीति स्मार्ताग्नौपाकस्त्वन्यशाखाविषयइतिकेचित् ‍ वस्तुतस्तुपूर्वोक्तस्यसर्वाधानविषयत्वंयुक्तम् ‍ शिष्टाचारेपिनपचनोदृश्यते अंडविलायामपिसर्वाधानपक्षेवैश्वदेवंश्राद्धंचपचनेकुर्यादन्यथौपासनेइत्युक्तं अग्नौकरणंतुप्रयोगपारिजातादिभिराब्दिकादिसर्वश्राद्धेषुपिंडपितृयज्ञव्यतिषंगोक्तेर्लौकिकेपचनेवापाकेकृतेपिगृह्याग्नौपक्कचरुणैवकार्यमितिप्रतिभाति मदनरत्नेप्येवम् ‍ विधुरोत्सन्नाग्न्यादेस्तुपृष्टोदिविविधानेनाग्निसंपादनमित्युक्तं हरिहरभाष्ये इतिपाकाग्निः ।

आश्वलायनांस तर " ज्यांचा गुरु ( पित्रादिक ) मृत असेल अथवा पुत्र , पशु , सुवर्ण इत्यादिक नष्ट झालीं असतील त्यांनीं अमावास्येस शांतिक कर्म करावें , तें असें - सूर्योदयाच्या पूर्वीं भस्मासहित अग्नि घेऊन ‘ क्रव्यादमग्निं प्रहिणोमि दूरं० ’ ह्या अर्ध ऋचेनें तो दक्षिण दिशेस टाकावा . " ह्या सूत्रानें पचनाग्नीचा त्याग सांगून नंतर ‘ इहैवायमितरोजातवेदा० ’ ह्या अर्धर्चेनें अपराह्णकालीं शमीच्या अरणींनीं अग्नीचें मंथन करावें , तो पचनाग्नि होतो . " असें गृह्यसूत्रांत व त्याच्या वृत्तींत सांगितलें आहे म्हणून , पचनाग्नीवरच त्यांचा पाक होतो . बौधायनानेंही सांगितलें कीं , " पचनाग्नि किंवा औपासनाग्नि घ्यावा . " स्मार्ताग्नीवर पाक हा इतर शाखाविषयक आहे असें केचित् ‍ म्हणतात . वास्तविक म्हटलें तर पूर्वोक्त जो पचनाग्नीवर पाक हा सर्वाधानविषयक आहे . शिष्टाचारांतही पचनाग्नि दिसत नाहीं . अंडविलाग्रंथांतही सर्वाधानपक्षीं वैश्वदेव आणि श्राद्ध हें पचनाग्नीवर करावें . अन्यथा औपासनाग्नीवर करावें , असें सांगितलें आहे . आश्वलायनास अग्नौकरण तर , प्रयोगपारिजातादिग्रंथकारांनीं आब्दिकादि सर्व श्राद्धांविषयीं पिंडपितृयज्ञव्यतिषंग सांगितला आहे म्हणून लौकिकाग्नीवर किंवा पचनाग्नीवर पाक केला असला तरी गृह्याग्नीवर पक्क केलेल्या चरुनेंच करावें , असें वाटतें . मदनरत्नांतही असेंच आहे . विधुर व उच्छिन्नाग्नि इत्यादिकांना ‘ पृष्टोदिवि० ’ ह्या विधीनें अग्निसंपादन हरिहरभाष्यांत सांगितलें आहे . याप्रमाणें पाकाग्नीचा निर्णय समजावा .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP