स्त्रीगीत - अमृत महोत्सव
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
साफल्य सुभग हे जीवनास लाभले
ह्या अमृतोत्सवी श्रेयस तुम्ही पाहिले ॥धृ॥
आयुव्रताची हीच सांगता
कर्तव्याची होइ पूर्तता
संसार चित्र तुम्ही कौशल्ये रेखिले ॥१॥
शरीर संपदा लाभे उत्तम
निर्मळ मन, मुखि प्रभुचे नाम
आनंद सरोवर भरूनिया राहिले ॥२॥
वंशतरुची हो अभिवृध्दि
संकल्पाला लाभे सिध्दि
चिरवांछित सारे सुखेनैव गवसले ॥३॥
केस पांढरे जरी डोईचे
हिरवे रंगहि तरी मनाचे
उत्साह पाहुनि तारुण्यहि लाजले ॥४॥
श्रीफळ उपमा तुम्हा योजिते
सुफळ सुपारी पत्नी गमते
शुभकार्यी सदोदित स्थान प्राप्त जाहले ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP