मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|स्त्रीगीते|
पाळणा मुलाचा

स्त्रीगीत - पाळणा मुलाचा

मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.


(चाल लाडक्या राणीला लागले डोहाळे)
लाडक्या बाळाला । झोके देते ताई
कर तूं अंगाई । बाळराजा ॥१॥
साजिरं गोजिरं । बाळ कौतुकाचं
सुंदर भाग्याच आहे गुणी ॥२॥
भालवर तीट । काजळाचे बोट
गाली गालबोट । राजसाच्या ॥३॥
वंशाचा लौकिक । वाढव तूं कीर्ती
कर्तव्याची पूर्ती । करुनिया ॥४॥
हाससि नादत । खेळसी डौलात
उद्याच्या स्वप्नांत । रंगसी का ॥५॥
तुझ्या कर्तुत्वाचे । आईला भुषण
भाग्याचे निधान । होई बाळा ॥६॥
शुभ आशिर्वाद । प्रेमे देते ताई
दीर्घायुषी होई । भाऊराजा ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : October 22, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP