स्त्रीगीत - डोहाळे
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
लाजूं नकोस बाले,
बाले मज एक गुपित कळले
कळले ग दो मनांचे ॥धृ॥
देहास क्लेश होती
अंगास येइ सुस्ती
चढली ग गर्भकांती
मोदात जीव डोले ॥१॥
खाण्यास नवनवीन
देती तुला करून
मेवा फळे आणून
तव कोड चालविले ॥२॥
सखया विनोद करिती
बागेत तुजसी नेती
गाऊन रिझविताती
तुजसाठी सर्व सोहळे ॥३॥
हिरवा सुरेख शालू
वेणीत हार माळू
हिरवा चुडाहि घालूं
उटी अत्तरास दिधले ॥४॥
होवो सुपुत्र तुजसी
जो भूषवी कुळासी
हे सांगणे प्रभुसी
शुभ हेची मजसी गमले ॥५॥
References : N/A
Last Updated : October 21, 2012
TOP