स्त्रीगीत - एकसष्टीचे गीत
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
साठ वर्षाच्या सीमेवरी
झाली जबाबदारी पुरी ॥धृ॥
कामनाहि सार्या
तुझ्या झाल्या पुर्या
नेत्री आनंदाश्रुंच्यासरी ॥१॥
खोड चंदनाचे
आधी झिजे साचे
येइ सुगंधाला माधुरी ॥२॥
वंशवेली अहा
कशी नटली पहा
कळ्या फुले ही पानांवरी ॥३॥
तृप्त गृहिणी ही
कीर्तीध्वजा पाही
ऎशा भाग्यासी नाही सरी ॥४॥
करिते समयासी
शुभ चिंतनासी
नांदा सौख्याचिया सागरी ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP