स्त्रीगीत - मुलीचा पाळणा
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
निजविते गाउनिया आई
लाडके छकुले अंगाई ॥धृ॥
रुप तुझे लडिवाळ चिमुकले
लुक लुक करिती चिमणे डोळे
भुरभुर उडते जावळ काले
हर्ष मनी होई ॥१॥
भाग्यवती ही पहिली वहिली
कौतुकाची राजस बाळी
आनंदाची खाणच गमही
शोभा अवघ्या गृही ॥२॥
मातृत्वाचे सौख्य आगळे
तुझ्यामुळे गे मला लाभले
पाहुनि तुजला धन्य जाहले
स्वप्नपूर्ती होई ॥३॥
बालपणी घे झोप सुखाने
हास खेळ बाहु स्वच्छंदाने
वंशाचे तव नांव उजळणे
ध्यानी धरा बाई ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP