स्त्रीगीत - दादाची मुंज
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
दादाच्या मुंजीची मजा वाटते
छोटी मी करवली काम करते ॥धृ॥
दादाला बांधु कां मुंडावळी
ताटाभोवती काढुं कां रांगोळी
इकडून तिकडून मिरवते ॥१॥
रेशमी परकर पायात चाळ
गळ्यात घातली मोत्याची माळ
हातात मानाचा करा धरते ॥२॥
भावांनो, पाहुण्यांने लाडु पेढे खा
चहा, काँफी सरबत मागून घ्या
आलेल्या सगळ्यांचा आग्रह करते ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP