स्त्रीगीत - डोहाळे
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
पुरवूं सखिचे या डोहाळे
आज करू या सुख सोहाळे ॥धृ॥
लेक लाडकी कौतुकाची
ओटी भरा ग आज तियेची
स्त्रीजन्माचे सार्थक झाले ॥१॥
देहलता बघ ही रसरसली
नवगर्भाची कांती खुलली
मोदभराने मानस डोले ॥२॥
उपवनी जाऊं निसर्ग पाहूं
चंदेरी चांदण्यात नाहूं
सौंदर्याने जग हे नटले ॥३॥
हिरवा शालू चुडाहि हिरवा
पानांचा हिंदोळा हिरवा
वेणीमध्ये हार माळले ॥४॥
सौभाग्यवती पतिंची कांता
पुत्रवती तू होशील आता
मातृत्वाचे सूख आगळे ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : October 21, 2012
TOP