स्त्रीगीत - विहिण
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
आनंदाच्या ऐशा समयी मन कां व्याकुळते
सासरी लेक आज जाते ॥धृ॥
बहुमोलाची ठेव खरोखर
जिवापाड मी जपली आजवर
घालुनिया मायेची पाखर
करि आपुल्या निरविते ॥१॥
प्रेमळ आपण सासूबाई
सांगायला नको मुळिहि
वेडी माया स्वस्थ न राही
म्हणुनी पुन्हा विनविते ॥२॥
प्रेमाने वा कधि रागाने
शिकवा हिजला परोपरीने
जी गृहिणीस शोभते ॥३॥
व्यवहाराचे देणें घेणें
प्रसंग शोभा फक्त साधणें
जोडूं आधी स्नेहबंधने
हेच मनी चिंतिते ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 21, 2012
TOP