स्त्रीगीत - विहिण
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
विहीणीबाई काळजी वृथा
मुळी न करावी आपण आता ॥धृ॥
कन्या धन जे होते आपुले
विश्वासाने आम्हा दिधले
सांभाळू प्रेमाने सगळे
गृहलक्ष्मी ही स्वगृही येता ॥१॥
आज नवे हे जुळता नाते
आनंदाला येई भरते
सौख्याच्या मी शिखरी नांदते
संसाराचे सार्थक होता ॥२॥
आपुल्या सम मी आहे माता
कन्येसम हिज लाविन ममता
भेद न कांही स्नुषा अन् सुता
समदृष्टिने नित्य पाहता ॥३॥
विहीणी विहीणी आपण बहिणी
संगम आज कुलांचा दोन्ही
स्नेह वाढू दे अधिकांशानी
भाग्याची ही होवो सरिता ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 21, 2012
TOP