स्त्रीगीत - गाणे रामजन्माचे
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
रघुकुलदीपक आज जन्मती
सनई चौघडे झडती नौबती ॥धृ॥
सुदिन सखे हा आज सुमंगल
पुनित झाले अवघे भूतल
आनंदाचा दाटे परिमल
होई कौसल्या पुत्रवती ॥१॥
अयोध्यापुरी ही शृंगारा
घराघरावर गुढया उभारा
साखर वाटा अवघ्या नगरा॥२॥
शुध्द नवमी ही चैत्रामधली
मध्यान्हाची घटिका आली
ऎशा ह्या शुभमंगल काली
श्रीविष्णू अवतरती जगती ॥३॥
तेजाने तिमिरास जिंकले
ज्ञानाने अज्ञान नाशिले
असुर मर्दण्या सुरपति आले
प्रेमभराने करुं आरती ॥४॥
त्रैलोक्याचा नाथ बाळहा
विश्वाचा पाळणा हालवा
राजीवलोचन राम जोजवा
गाऊं या अंगाई त्याप्रती ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP