मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|स्त्रीगीते| गाणे कृष्णजन्माचे स्त्रीगीते घाण्याची ओवी घाण्याची ओवी गौरीहर मंगलाष्टके अभिनंदन विवाह मंगल विहिण विहिण पाठवणी नव्या सुनेचे स्वागत डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा व्रतबंध मंगलाष्टके मुंज मुलास मुंजीचं गाणं मुंजीचं गाणं दादाची मुंज मंगलाष्टके खेळाचे गाणे गाणे तिळगुळाचे गाणे रामजन्माचे रामाचा पाळणा गाणे कृष्णजन्माचे गाणे कृष्ण जन्माचे पाळणा कृष्णाचा पाळणा कृष्णाचा गाणे रंगाचे गोपाल काला नवरात्राचे गाणे कोजागिरी - फेराचे गाणे वास्तुशांतीचे गीत वास्तु समारंभ एकसष्टीचे गीत अमृत महोत्सव सुवर्ण पुष्पे स्त्रीगीत - गाणे कृष्णजन्माचे मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे. Tags : lokgeetstrigeetओवीलोकगीतस्त्रीगीत गाणे कृष्णजन्माचे Translation - भाषांतर मध्यरात्र काळोखी वद्य अष्टमी तिथीमथुरेला कृष्णनाथ आज सखे । जन्मती ॥धृ॥कारागृह कंसाचे लखलखले त्या क्षणीवाटुनि ये मोद अतिव देवकीच्या लोचनीजगन्नाथ अंकावर घेई देवकी सती ॥१॥बालरूप पाहुनिया वसुदेवहि हर्षलापाटीमध्ये बाळकृष्ण ममतेने निजविलादेववाणी होई त्वरित गोकुळी न्या श्रीपती ॥२॥माथ्यावर घेउनिया चाले वसुदेव पुढेयमुना मी ओघवती पाहुनिय चरण अडे ॥३॥चाल :- मी कालिंदी श्रीकृष्णाची श्यामल वत्सल कांता ।चरण चुराया लगबग तिथवर धावत गेले असता ॥पदस्पर्शाने मोहित झाले नजर वळे खालती ।मामंजी वसुदेव पाहुनि लाजुनि गेले पुरती ॥आली तैसी त्याच पाउली माघारी सखी वळले ।बाई गौळणी काय सांगु तुज वृत्त असे तै घडले॥लोक समजती श्रीकृष्णांनी अघटित ऎसे केले ।की यमुनेचे जीवन तत्क्षणी वाहुनिया गेले ॥ N/A References : N/A Last Updated : October 22, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP