मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|स्त्रीगीते|
पाळणा मुलाचा

स्त्रीगीत - पाळणा मुलाचा

मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.


पाळणा डोलविते हलविते
बाळा गीत तुला गाते ॥धृ॥
पहिला वहिला पुत्रचि अससी
वंशाचा तूं दीपक गमसी
सौख्य निधानाची हो मातेसी
हेचि मनी चिंतिते ॥१॥
प्रीतीलतेवर पुष्प उमलले
दोन मनांचे भाव गुंतले
भाग्य जणु तव रुपे फुलले
भूषण मज वाटते ॥२॥
आजी, मामा, काका, आत्या
उत्सुक सारे तुझिया करिता
तोष देई तूं सकलहि आप्ता
शुभ आशिष देते ॥३॥
भाग्यवंत हो बुध्दिवंत हो
यत्नवंत, गुण्वंत तसा हो
शुध्द भाव मनी सदैव राहो
तुजसी हे सांगते ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 22, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP