स्त्रीगीत - पाळणा कृष्णाचा
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
लाडक्या श्रीकृष्ण बाळा
जो जो रे कृष्ण गोपाळा
जो जो रे जो जो, जो जो रे जो जो ॥धृ॥
बांधिला पाळणा चौखांबावरी
पानांची फुलांची केली कुसरी
यशोदेसी आनंद झाला ॥१॥
माता प्रेमाने अंगाई गाते
डोळ्यांत शब्दांत कौतुक दाटे
सजवा ग सयांनो याला ॥२॥
रेशमी कुंची शिविली साची
बाळलेणी घाला सोन्यामोत्याची
पांघरा याजला शेल ॥३॥
हलवा झुलवा प्रेमाने याला
याचेच कौतुक हो गोकुळाला
सकलांचा ताईत झाला ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP