स्त्रीगीत - पाळणा मुलाचा
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
रे थांब लाडक्या बाळा
भरविते घांस मी तुजला ॥धृ॥
तुज कुशीत मी वाढविले
चिमुकले घांस भरवियले
आद्यगुरु प्रेमळ बनले
कवतुक करूं दे आजला ॥१॥
हा घांस अति मोलाचा
मातेच्या शुभ इच्छेचा
स्नेहशील वात्सल्याचा
बलवंत करिल पुत्राला ॥२॥
गुरुगृही आता तूं जावे
विद्यार्जन पूर्ण करावे
ब्रह्मचर्य व्रत आचरावे
मान दे गुरुवचनाला ॥३॥
सर्वत्र गुणांची कीर्ती
विद्येची तैशी महती
विद्वान गुणी हो जगती
मज तोची सुखाचा सोहळा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP