स्त्रीगीत - पाळणा मुलाचा
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
निज निज राजसा लडिवाळा रे झोके तुज देते
लाडक्या अंगाई गाते ॥धृ॥
फुटे पालवी तरुवराला
आनंदाचा सुदिन उगवला
पुत्र जन्मती मातेलागी प्रेमाचे भरते ॥१॥
पहिला वहिला आमुचा नातू
मम पितरांचा आहे पणतू
अपुर्व ऎसे भाग्य तयांचे मजलागी गमते ॥२॥
वंशदीप हा मातृगृहीचा
मंगलताईचा हा भाचा
'सुधीर' शेखर झाले काका मोद बहु वाटे ॥३॥
बाळाला ह्या पहावयाला
मंजु निरु दोघी आत्या
आनंदाने किलबिल करिती सौख्य अहा फुलते ॥४॥
भाग्यवंत हा बाळ होऊ दे
जगदंबे तूं शक्ति बुध्दि दे
कुलदैवत तूं अससि आमुचे रक्षी सर्वाते ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP