स्त्रीगीत - मुंज मुलास
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
पडला मांडव दारी
बाई आमच्या मोहनची मुंज घरी ॥धृ॥
मोहनच्या आईला नाही वेळ
कामाची सगळी धांदल
निवडणं टिपण करा वळवट वळा
सुरु झाली तय्यारी ॥१॥
आजा आजी होशीचे पुण्याहून आले
आई बाबा दोघेहि नागपुरहून आले
आत्या सुलु नलुताई, तशा आल्या आक्काताई
जमली मंडळी सारी ॥२॥
जायचं बरं का गुरुगृही विद्या मिळवाया
शिस्तबध्द ब्रह्मचर्य व्रत आचराया
दिक्षा घेउन घाला यज्ञोपविताला
शास्त्राज्ञा ही खरी ॥३॥
सोनारदादा आले करा अंगठी पोची
शिंपीदादा शिवतील कोट टोपी साचा
बांधा मुंडावळी, हाती घ्या झोळी
भिक्षांदेहि बरी ॥४॥
करायचा बरं का आता चटमट गोटा
खाऊला कपड्यांना आता नाही तोटा
प्रेमे गीत गाऊ, आशिर्वाद देऊ
टाकु अक्षता शिरी ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP