स्त्रीगीत - गाणे रंगाचे
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
बघूं या रंगाचा सोहळा ।
सखे श्रीरंग रंगी नाहला ॥धृ॥
सात रंगाच्या सात घागरी
घेउनि गोप-सुंदरी
चालल्या ग यमुनेतीरी
भिजविला हरीचा शेला ॥१॥
केशरी गर्द जांभळा
हिरवा नि तांबडा निळा
अशा रंगाच्या भरुनी चुळा
गोप गोपिच्यांवर उडविल्या ॥२॥
आला वसंत ऋतु फुलवाला
आंबेमोहर बाई घमघमला
उपवनी मोगरा फुलला
गळा घालुनि फुलांच्या माळा ॥३॥
कुंजवनांत हरी खेळतो
देवादिकांस हेवा वाटतो
वर्णावा काय थाट तो
पाहुं या हरीच्या लीला ॥४॥
चहुकडे गुलाल उधळिला
रंगित गाठ्या शोभल्या
मेवा मिठाईचा ढिग लुटविला
तो प्रसाद घेऊ चला ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP