स्त्रीगीत - पाळणा मुलाचा
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
लाडक्या रे बाळकृष्णा
भूषणा कुलभूषणा ॥धृ॥
मम मनातिल प्रेमगंगा
राजसा तुज न्हाणिते रे
कौतुकाची बाळलेणी
तुजवरी मी घालिते रे
मोहना, मनमोहना ॥१॥
मृदुल मृदु तूं स्नेहतंतु
बध्द करिसी रे आम्हाला
वसतसे हृदयांतरी मम
कुसुम कोमल हा जिव्हाळा
हास गाली हास ना ॥२॥
वैभवाच्या दालनाचे
दार वाटे उघडिले तू
फुलुनि येतिल जणु उद्याला
मन्मनीचे सर्व हेतु
लावुनि दे तोरणी ॥३॥
भावनांचे गीत तूं
संगीत माझ्या जीवनाचे
कोवळा अंकुर तूं जणुं
काव्य माझ्या प्रेयसाचे
किती करू कविकल्पना ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP