स्त्रीगीत - गाणे तिळगुळाचे
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
संक्रातीच्या शुभसमयी या
परस्परांना वाण वाटूं या ॥धृ॥
नाते जोडूं सभ्दावाचे
वाण देऊ या स्नेहप्रीतीचे
प्रतीक आहे तिळगुळ ज्याचे
अवित गोडी त्याची सेवूं या ॥१॥
धागे गुंफू नाजुक स्नेहल
सौहार्दाचा सुंदर परिमल
जनभृंगाला त्यांत रमवूं या॥२॥
स्नेहपूर्ण हृदयाची पणती
लावूं प्रीतीच्या निर्मल ज्योती
प्रेमे उजळूं मंगल आरती
प्रकाश सार्या जगती भरूं या ॥३॥
पूर्ण जाहले एक आवर्तन
सूर्य करितसे आज संक्रमण
तैसे करुं या सर्वहि आपण
सुविचाराचे व्रत आचरुं या ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP