स्त्रीगीत - डोहाळे
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
डोहाळे पुरवूं । सखिचे । डोहाळे पुरवूं
आनंदाचा सुदिन गमतसे तिजसी चला रिझवू ॥धृ॥
वंशवेल ही आज बहरते
नव्या जिवाची चाहुल येते
दारी सुखाची नौबत झडते
हर्षभरे गाऊं ॥१॥
थट्टा करिती नणंदाजावा
सुरस फळे ही आणिला मेवा
आवडतो कां बाई बघावा
काय आणिक आणवुं ॥२॥
चांदण्यातली मौज लुटावी
निसर्ग शोभा तशी बघावी
कां बागेतिल फुले खुडावी
वेणीवर माळू ॥३॥
पानांचा हिंदोळा हिरवा
मखर फुलांचा करुनि बरवा
वनराणी परी हिजवा सजवा
डोळाभर पाहू ॥४॥
आशिर्वाद हा तुज थोरांचा
पुत्र सद्गुणी व्हावा साचा
भूषण होइल जो वंशाचा
प्रभुचरणी विनवु ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : October 21, 2012
TOP