स्त्रीगीत - पाळणा कृष्णाचा
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
जो जो बाळा लाडक्या नंद नंदना रे । मनमोहना रे
हलविते यशोदामाता पाळणा रे ॥धृ॥
पंचामृतासहित यांस न्हाणियले
देवस्वरूप सगुण आंत निजवियले ॥१॥
रेखियली भालावरी तीत ग
डोळा काजळ गाली गालबोट ग ॥२॥
कुंची शिविली यांस जरी पदराची
गोंडे रेशमी झालर वर मोतियाची ॥३॥
गळा ताईत मनगट्या माणकांच्या
पायी पैंजण सांखळ्या सोनियाच्या ॥४॥
मोतीसरांनी विणियला पाळणा हा
हिरे जडिताचे खांब शोभताती अहा ॥५॥
परब्रह्म साजिरे सुकुमार हे
डोळाभरुनि देखता मन भरले गे ॥६॥
वर्ण श्यामल नाम ठेवा 'कृष्ण' हे
साखर वाटा ग सयांनो गीत गाउनि हे ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP