स्त्रीगीत - मुंजीचं गाणं
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
अंशुची मुंज करुं तयारी आनंद आईला
होतसे आनंद आजीला
निवडण टिपण वळूं वळवटे मातृभोजनाला
रंगित पाट, ताट चांदीचे मांडु या बटुला
सार्याजणी भरवूं घास तयाला बघु या सुखसोहळा ॥१॥
उपनयनाचा मंगलक्षण हा दीक्षा गुरुची घ्या
बारा वर्शे विद्येचे व्रत भक्तिने आचरा
वडिल मंडळी जमली सारी आशिष देण्याला ॥२॥
नेसा पंचा हाती झोळी दंडहि पळसाचा
अग्निसाक्षीने मुहूर्त केला यज्ञोपविताचा
स्वाध्यायाने सजवा अपुल्या भविष्य काळाला ॥३॥
मिळे वारसा सद्बुध्दिचा अंशुमान तुजला
विद्यालंकृत होउनि व्हावे भूषण स्वकुलाला
प्रशस्त मंगल आशिर्वच हे आजीचे तुजला ॥४॥
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP