एक बोकड एका तुटलेल्या कड्यावर चरत उभा होता. तेव्हा एका सिंहाने त्याला पाहिले व तो त्याला म्हणाला, 'अरे, इतक्या उंचावर उभे राहण्यात धोका आहे. त्यापेक्षा मी जिथे उभा आहे तिथे आलास तर तुला छान हिरवंगार गवत खायला मिळेल.'
तेव्हा बोकडाने उत्तर दिले, ' आपल्या सूचनेबद्दल आभारी आहे. पण आपण माझ्या पोटाची काळजी करीत आहात की स्वतःच पोट माझ्या मासाने भरण्याच्या विचारात आहात ते मला चांगलं समजतं.'
तात्पर्य - शत्रूने कितीही हिताच्या गोष्टी सांगितल्या तरी शहाण्याने त्यावर विश्वास ठेवू नये.