स्वतःस फार मोठा भविष्यवादी समजणारा एक गृहस्थ रस्त्यात उभा राहून भविष्य सांगत असे व हरवलेली वस्तू कुठे सापडेल ते सांगत असे. एके दिवशी असाच तो आपले काम करीत असता एक थट्टेखोर मनुष्य तेथे आला व घाबर्याघाबर्या म्हणाला, 'अहो अहो, धावा धावा, तुमच्या घराला आग लागली आहे. चला, चला लौकर.' हे शब्द ऐकताच ज्योतिषीबुवा घाबरून आपल्या घराकडे धूम पळत सुटले. त्यांच्यापाठोपाठ तो थट्टेखोर मनुष्य व इतर लोकही धावत निघाले. घरी येऊन पहातात तो आगबिग काही नसून घर चांगले व्यवस्थित उभे होते. मग तो खोडकर मनुष्य त्यांना म्हणाला, 'अहो' ज्योतिषीबुवा, लोकांच्या नशिबातलं तुम्हाला एवढं कळतं तर स्वतःच्या नशिबातलं कसं कळलं नाही?