एकदा एका उकीरड्यात दोन कोंबड्यांचे युद्ध जुंपले. एका कोंबड्याने दुसर्या कोंबड्याला खूप जखमी केले. त्या कोंबड्याला आपल्या कर्तबगारीबद्दल इतका गर्व वाटला की, एका खोपटावर बसून 'मी लढाई जिंकली', 'मी लढाई जिंकली' असे तो मोठमोठ्याने ओरडू लागला. त्याचवेळी आकाशातून एक गरुड चालला होता. त्याने पाहिले, आणि मारून खाण्यासाठी झडप घालून पकडले. हा सर्व प्रकार तो दुसरा कोंबडा पहात होता. तो अगदी ऐटीत बाहेर पडला व मजेने फिरू लागला.
तात्पर्य - एवढ्यातेवढ्या यशाने कधी फुगून जाऊ नये, कारण कोणाचे नशीब केव्हा फिरेल काही सांगता येत नाही.