कोळी व त्याचे दैव

इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत.

Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteristics and moral.


कोळी व त्याचे दैव

एकदा एका कोळ्याने जाळे टाकून मासे पकडण्याचा खूप प्रयत्‍न केला. परंतु त्याला एकही मासा मिळाला नाही. तेव्हा त्याने निराश होऊन आपले सामान गोळा केले व तो घरी जाण्यास निघाला. तोच एक भला मोठा मासा आपोआप उडी मारून त्याच्या टोपलीत येऊन पडला. ते पाहून त्या कोळ्याला खूप आनंद झाला.

तात्पर्य - पुष्कळ प्रयत्‍नांनी एखादी गोष्ट सिद्धीस जात नाही, पण एखादेवेळी आपोआप घडते.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-10T06:23:37.2500000