-
स्त्री. १ एकाचे नुकसान , नाश होऊन , प्रयत्न इ० विफळ होऊन दुसर्यास अकल्पित , अनायासे होणारा लाभ ; दुसर्याची झालेली चैन , भर . त्याने कपाळकूट करुन पैसा मिळविला पण शेवटी चोरांची धण झाली . २ समृद्धि ; संपन्नता . धन पहा . ३ इच्छा . ( क्रि० पुरणे ). धणी ( - स्त्री . ) पहा . [ सं . धन = द्रव्य , धणी पहा . ] ( वाप्र . )
-
०करणे होणे आपसांतील दुहीमुळे तिसर्याचा विनाकारण लाभ , फायदा होणे .
-
०घेणे मनसोक्त , पोटभर खाणे ; ( खाद्य इ० कांचा ) समाचार घेणे . एकाने मोठमोठे लाडवांचे तुकडे करुन गट्ट केले , दुसर्याने चटण्या , सांभारी यांची धण घेतली . - बाळ .
-
०पुरणे इच्छा तृप्त होणे ; संतोष , समाधान होणे .
Site Search
Input language: