स्वर अंतरंगाचे - आई
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
आईच्या मायेचा तराणा चादरीचा ताना बाना ॥ध्रृ॥
तो दाता काही काळ प्रकाश देऊन
त्या रजनीच्या ओठीत टाकुन गेला
तरीही जी स्वयंभू तेजस्वी, प्रेमळ
तिने या देहालाच दीप बनवून
उबारा दिला जो पुरेल अनंतकाळ
आई नावाचे दीप दिसतात उजेड देताना ॥१॥
जो शीतल चांदणें देण्यासाठी आला
तो सुधाकर पार ढगाआड गेला
तरीही आईने मायेच्या चांदण्यात
हातचा पाळणा करुनी झुलवून
चंदन बनून झिजली रात्रंदिन
तोच सुगंध दिसतो विश्वात दरवळताना ॥२॥
पांढरपेशे नि बागायतदाराची
खोटी दानन दिसत होती भोवती
तेव्हा आईने रक्ताचे पाणी करुन
वृक्ष बनवुनी जिरायत रोपाला
कर्तव्याने फुलण्याला मार्ग दाविला
तीच मूर्ती आता कार्याची फुले वहाण्या दिसेना ॥३॥
एक दिवस चोवीस तास अंधार
एक दिवस भुताटकीचा कहर
अशा काही रात्री आल्या तरीही
तत्त्वापासुन ढकली नाही थोडी ही
गात राहिली ती माझ्यासाठीं अंगाई
तेव्हा होतो अनभिन्न आता आतुरली दर्शना ॥४॥
सवित्या असाच प्रकाश देईल
चंद्रमा चांदण्याने न्हाऊ घालील
काळजाचा निवारा अमर राहील
समई जळदच रोषणी देईल
वृक्ष असाच सावली देत राहील
आईच्या मायेचा अंत भविष्यालाही सापडेना ॥५॥
काहीच्या घरी अखंड दिवाळी चाले
कुठी ती तीनचार दिसाची पाहुणी
कधीतरी एकदा चूल फुलायची
तेव्हा तेव्हा आई अर्धपोटी राहुन
स्वाभिमानाची दिपवाळी करायची
दिपवाळीचा सण कायमचा गेला आई जाताना ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2023
TOP