मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीराम विठ्ठल गायकवाड|

स्वर अंतरंगाचे - महात्मा गांधीजी

काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड


आला सवित्या तेजो पुंज घेऊनी देशात ॥ध्रृ॥

पूर्व दिशा उजळली सोनेरी किरणानी
पृथ्वीमाता उल्हासीत झाली नवझोतानी
भारतीय जनतेला मिळाली संजीवनी
दाही दिशा करती स्वागत ॥१॥

अमाणुसकीचा राक्षस होता मनावर
जशी अमावस्येची रात्र पसरे भूवर
अचेतन, कर्महीन होता आपला वीर
आली लकाकी आसमंतात ॥२॥

धर्मभेद जातीभेद हा कलंक हिंदुला
उच्चनीच भेद वरवर थेट शिगेला
हे नाहिसे करण्या प्रेषित अवतरला
जन्मले भारतीय अनंत ॥३॥

ही मातृदेवता दीनदलित बांधवाची
झोपडीतील कष्टकर्‍याच्या निजश्रमाची
लाथाडलेल्या दुखावलेल्या त्या हृदयाची
हे दीनाचे आध्यभगवंत ॥४॥

अन्याय कष्ट हालअपेष्टा केले सहन
दीनासाठी दैन्य पत्करले त्यागी महान
महात्माजी अवतारी अहिंसक अकीन
हे दु:खी जीवाचे देवदूत ॥५॥

बापूजीनी आदर्शातुनी धर्म शिकविला
राजनिती माणूसकीची जोड कर्तव्याला
असहकार सत्याग्रह महामंत्र दिला
उदेला इंद्रधनु देशात ॥६॥

यानी गोर्‍याला देमाय धरणीठाय केले
पाहु आम्ही हा आमुचा देश तुम्ही कोठले
चालते व्हा येथुनी ठामपणें बजावले
ते होते स्वातंत्र्याचे महंत ॥७॥

गतकालाचा इतिहास आमुच्या देशाला
आम्ही समर्थ आहोत आम्हा भीक कशाला
तुमचा बडेजाव आता नकोच आम्हाला
अशी होती बापूची हिम्मत ॥८॥

व्हावा भरतपुत्रावर सवतीमत्सर
त्याना खेचीले मांडिवरुनी जमिनीवर
तसे कित्येक आघात झाले बापूजीवर
हा तारा चमकला विश्वात ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP