स्वर अंतरंगाचे - स्वातंत्र्यदिन
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
या स्वातंत्र्यदिनी आठवूया तळपती लेखणी ॥ध्रृ॥
लोकमान्याची सिंहगर्जना
आग्रलेंखाचा तिखट राणा
इंग्रजापुढे करारी बाणा
जळफळूनी गोरा उठला पण हे स्वाभिमानी ॥१॥
पेपरात लेख चमकले
इंग्रजाला अवाहन केले
काना कोपर्यात नाद चाले
भारतीय भू बनली रणसमर विरांगणी ॥२॥
महात्माजीचा असहकार
सत्याग्रह स्वदेशी वापर
स्वार्थ त्यागाचाच अविष्कार
चौधारीनेच झाले इंग्रज सुलतानी आस्मानी ॥३॥
चलेजावची घोषणा केली
नेतेमंडळी सामील झाली
गोरे सरकार पछाडली
मैदानातून गोरे पळू लागले, मागे लेखणी ॥४॥
झाशीची राणी वीरभारती
जाबु, गेनू बोस असे किती
स्वातंत्र्यासाठी दिली आहुती
स्वातंत्र्यप्राप्ती झाली, आज आम्ही सुखी समाधानी ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : February 01, 2023
TOP